Skip to main content

कथा

ग्रहण-४

लेखक स्पा यांनी सोमवार, 17/10/2011 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रहण-१ ग्रहण-२ ग्रहण-३ मला आता घरच्यांपासून काहीही लपवायचं नव्हत. नाश्त्याला बसलेले असताना.. मी सर्व हकीकत सांगून टाकली उर्मिलाचा चेहरा. भयाने पांढरा फाटक पडलेला .. आई पण हादरलेली.. बाबांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या.. मग कोणीच काही बोललं नाही. मग बाबाच म्हणाले, काल भाटे सांगत होते..

अंधेर नगरी चौपट राजा

लेखक जयनीत यांनी बुधवार, 12/10/2011 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
अंधेर नगरीत एका महान योगीराजांचे आगमन झाले . चौपट राजाने त्यांचे अगत्याने स्वागत केले . योगीराजांना भूत , वर्तमान , भविष्य त्रिकालात सर्वकाही बघू शकण्याची सिद्धी प्राप्त होती . राजाने त्यांना सन्मानपूर्वक दरबारात विराजित करून आपले भविष्य विचारले . योगीराज क्षणात समाधिस्थ झाले . जागृत होऊन त्यांनी राजाच्या कानात सांगितले " हे राजा लवकरच तुझा सर्वनाश अटळ आहे , प्रजा तुझ्या कुशासनाला कंटाळली आहे .

कोठे जाशी भोगा...!!

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 11/10/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
''थांबा थांबा.... हे...हे समोरचं होर्डिंग... वाढदिवसाच्या शुभेच्छांचं हो.... तो कोणाचा फोटो आहे?'' सिग्नल सुटत असताना आमच्या कारच्या खिडकीतून मला दिसलेलं ते क्षणभर दचकायला लावणारं होर्डिंग... सॉरी... होर्डिंगवरचा चेहरा.... ''ताई, हे तर आमच्या भागातले प्रसिद्ध राजकारणी आहेत हो मोठे! खूप वट आहे हां त्यांचा.... इथं बऱ्याच जमिनी, इमारती, शॉपिंग मॉल्स त्यांच्याच मालकीची आहेत. सगळीकडे होल्ड आहे म्हणे त्यांचा! कोणीही त्यांच्याकडे गेला की त्याचं काम झालंच म्हणून समजा.... दिलेला शब्द पडू देत नाहीत म्हणून रुबाब आहे बरं का त्यांचा...

फिल्म दि मेसेज

लेखक यकु यांनी रविवार, 09/10/2011 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
"दि मेसेज" या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून लिहिण्याचे मनात होते.