Skip to main content

कथा

"अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा" आणि "चांदोबा"

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 27/08/2011 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
"अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा" हे विष्णुशास्त्री व कृष्णशास्त्री चिपळूणकर या पिता-पुत्रांनी (यातील वडील कोण व मुलगा कोण, हे विसरलो - कृपया सांगावे) अनुवादित केलेले पुस्तक माझ्या लहानपणी घरात होते. ते नेहमी वाचायचो. फारच अद्भुत वाटायच्या त्या गोष्टी. मुख्य म्हणजे त्या आवृतीत कुणा इंग्रज चित्रकाराची फार छान चित्रे होती.

पाऊसगोष्ट तुझी माझी

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 27/08/2011 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
तू मजसोबत येशील अशी शक्यता वाटत नव्हती. पण तू पटकन गाडीवर माझ्यामागे सावरून बसलीस. तेव्हा खरे तर माझ्या मनात कल्लोळ उठला होता. तुझं तसं मजसमीप असणं जगावेगळं वाटत होतं. त्यात मौसम ‘घन उतरू आलं...’ अशा झिम्मड पावसाचा. तुला कुठे सोडायचं हे ठरलं नव्हतं. मी तर थेट तुझ्या घरापर्यंत साथसोबत केली असती पण तुझ्या मनात ते जलतरंग होते कुठे? नव्हतेच. मीच आपला सप्तरंगी स्वप्नायुष्य भन्नाटवेगे पळवत चाललो होतो... रस्ते म्हणजे खड्डेच की. तू माझ्यावर मागून आदळली नाहीस असं होणार नव्हतं. तरीपण तुझाही तोल सावरीत मी बेताने गाडी घेतली आणि माझं ते संयत वागणं पाहून त्या वरच्या मसीहाला माझी दया आलीच.

....

लेखक प्रियाली यांनी शनिवार, 27/08/2011 04:59 या दिवशी प्रकाशित केले.
...

...

लेखक प्रियाली यांनी शनिवार, 27/08/2011 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
...

तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन- "मेड इन सिंगापूर"

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 20/08/2011 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १३ आणि १४ औगस्ट २०११ रोजी सिंगापुरात तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. त्या संमेलनात सादर केलेली ही माझी कथा. मोलकरीण- ही एक मोठ्ठी समस्या आहे असे जगातल्या सगळ्याच गृहिणींचे मत असते. समस्येचे नाव जरी तेच असले तरी, प्रत्येक ठिकाणची डोकेदुखी मात्र वेगवेगळी असते. सिंगापूरला मोलकरीणीला ’मेड’ म्हणतात. भारतातल्या सारख्या ह्या मेड्स दोन चार तासापुरत्या येऊन आपापली कामे करून जात नाहीत. तुमची मेड ही कुटुंबातलाच एक मेंबर होऊन तुमच्या घरात रहाते. ही गुणी-अवगुणी मेड मिळविणे जेवढे कठीण, तेवढेच झेपणे आणि संभाळणे देखील. जाऊ द्या झाले!

सातवाहन आणि नाणेघाटातील शिलालेख. आता पूर्ण येथेच केला आहे.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 19/08/2011 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
नाणेघाटातला शिलालेख – आपल्यापैकी अनेकजण नाणे घाटात मुक्काम टाकतात. दरीतून वरती येणारे ढग कवेत घेतात, शूद्ध हवा छातीत भरून घेतात आणि त्या गुहेतल्या पवित्र आणि गुढ अशा वातावरणात निस्तब्ध होतात. त्या गुहेच्या दारात उभे राहून मग आपण खालून रस्त्याने येणार्‍या व्यापारांचा काफिला नजरे समोर आणू लागतो. दमलेले, तहानलेले ते जीव हळू हळू वर येत असतात आणि वर आल्यावर विश्रांतीसाठी आपली पथारी सोडतात, जेवणाचे डबे उघडतात आणि थंड पाणी पिऊन तृप्त होतात. सुखदु:खाच्या दोन गोष्टी बोलून पुढच्या मार्गाक्रमणाबद्द्ल चर्चा करतात.