Skip to main content

कथा

अदला बदली

लेखक अमोल मेंढे यांनी गुरुवार, 03/11/2011 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
" ए भाई किसीको तो पुछ लो" शेवटी माझा वैतागलेला मेंदु बोलला. रात्री १०.३० ची वेळ. शंभू, नरेश, राजु व मी मित्राच्या लग्नाला गेलो होतो. घरुनच निघायला उशीर झाल्यामुळे उशीरा पोहचणं स्वाभाविकच होतं. मुख्य रस्ता सोडुन गाडी कच्च्या रस्त्याला लागली आणि आमचे हाल व्हायला सुरुवात झाली. त्यात आमचा ड्रायव्हर त्याच्या बाजुची काच उघडी ठेवुन गाडी चालवत होता. ( काय तर म्हणे थंडीत गाडीच्या सगळ्या काचा बंद केल्या तर काचेवर धुकं जमा होऊन काहीच दिसत नाही. ) त्यामुळे आम्ही थंडी + धक्के असा दुहेरी मारा झेलत होतो. आठ वाजायला आले तेव्हा धुकं एवढं पडायला लागलं की काहीच दिसत नव्हतं.

स्वगत एका मध्यमवर्गीय गार्गीचे

लेखक विनीता देशपांडे यांनी गुरुवार, 03/11/2011 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
स्वगत एका मध्यमवर्गीय गार्गीचे मी गार्गी, माझ्या संसाराची चौकट चार चौघंसारखीच, नवरा विजय, मुलगा अक्षय आणि मुलगी अनया.या संसारातच माझ विश्व..समाधान आणि आनंद...........पण एक क्षण असा माझ्या आयुष्यात येईल अस कधीच वाटलं नव्हतं..... " माझी आजची संध्याकाळ रोज सारखीच होती. तसं संध्याकाळी घरी एकटं रहायचा खुप कंटाळा आला होता. पण करणार तरी काय ? जो तो आपआपल्या विश्वात रमलेला. मुलं ..कॉलेज, क्लास आणि मग मित्र-मैत्रीणीं -ते रात्रीच परत यायचे, आल्यावर ते आणि त्यांच कंप्युटर, नाही तर मोबाइलवर गप्पा.यामधुन ते वेळ काढुन माझी विचारपुस करत मग आमच्या थोड्याशा गप्पा.

जन्मठेप

लेखक नगरीनिरंजन यांनी गुरुवार, 03/11/2011 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
हजार पायांच्या गोमीसारखी लपलपत चाललेली ही लोकल आणि तिच्या अंगावरच्या असंख्य सूक्ष्म चिकट तंतूंसारखी तिला चिकटलेली लोचट आणि घामट माणसं. पायाखाली टचकन फुटणार्‍या शेंबड्या गोगलगायीसारखं आपलं लिबलिबीत आयुष्य गोंजारत निघालेली. त्या गिळगिळीत गोगलगायीने गळ्यापर्यंत गिळलेला एक रिटायरमेंटला आलेला म्हातारा गर्दीत उभा राहून शिवलीलामृत वाचतो आणि त्या गोगलगायीचं उरलेलं गिळणं सुखद व्हावं म्हणून गदगदत प्रार्थना करतो.

मी आणि जिनी !

लेखक चाफा यांनी शुक्रवार, 28/10/2011 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
कंटाळा आला म्हणुन संध्याकाळी सहज तळ्याकाठी बसलो होतो. हातानं सहजच चाळा म्हणुन सध्याचा भारताचा राष्ट्रीय खेळ ‘दगडफ़ेक’ करत होतो अर्थात तळ्यातच. रस्त्याचे डांबरीकरण झाले असल्याने दगडही मुबलक होते. बहुतेक याच कारणाने पुर्वीचे रस्ते मातीचे असतं, दगड मिळालाच नाही तर फ़ेकणार कसा? असो तर माझा खेळ रंगात आलेला असताना सहज म्हणुन मी एक दगड उजव्या बाजुला भिरकावला, आणि खळ्ळ ...... काहीतरी फ़ुटंलं पण ते कुणाचं डोकं नसावं नाहीतर कानातुन रक्त येईल अश्या शिव्या ऐकायला मिळाल्या असत्या. हे ही आजकाल कॉमन आहे. मुलं आई म्हणायच्या आतच ‘च्यायला’ म्हणायला शिकतात.