कथा
माझी कलाकारी !
एकदा माझ्या डोक्यात एखादं पिल्लू शिरलं ना! की मला गप्प बसवत नाही, आणि हे महान कार्य त्यादिवशी पार पाडलं ते घरात आणलेल्या कापसाने. त्याचं असं झालं की घरात वाती वळायला आणलेल्या कापसाभोवती एक अर्धवट टरकावलेला लेख होता तो मी वाचला. हो ! असलं पुडीवरचं साहीत्य वाचायची मला जुनी खोड आहे. तर, त्या लेखाचा मतितार्थ इतकाच की `प्रत्येकाने आपल्यातल्या सुप्त कलाकाराला वाव करुन दिलाच पाहीजे'. बस्सSS इथे माझ्या सदा उत्साही मेंदुने उचल खाल्ली, आणि मी माझ्यात दडलेल्या त्या सुप्त कलाकाराला शोधायला सुरुवात केली.
सुरुवातीचाच ठेच लागल्यासारखा प्रकार झाला. काही केल्या मला माझ्यातले कलागुण आठवेनात !
म.न.पा.स एक पत्र
म.न.पा.स एक पत्र
प्रती म.न.पा.,
सादर प्रणाम,
सध्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आपल्यावर होणारे कामचुकारपणाचे आरोप रोज ऐकतो. ते मला फारसे रुचत नसल्याने आपणास आपल्या दिव्य कार्याची जाणीव करून देण्यासाठी मुद्दाम हा पत्रप्रपंच करत आहे.
सर्वप्रथम मी वैयक्तिकरीत्या आपले आभार मानू इच्छितो कारण केवळ आपल्या कर्तव्यनिष्ठेमुळे माझे दंतवैद्याकडे खर्ची पडू शकत असलेले रु. २०० मात्र बचत झाले.
मिसळपाव