Skip to main content

कथा

अंधार

लेखक ढब्बू पैसा यांनी गुरुवार, 29/09/2011 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
खूपशा अंधार्‍या रात्री आणि दिवस सरत चालले आहेत. जीवघेणा अंधार व्यापून रहावा सगळीकडे असं वातावरण. प्रकाशाला घुसमट व्हावी आत शिरताना असे काळोखे कोपरे. जिथे मनाला जखम झाली ना तरी जखमेतून बाहेर पडतो आरक्त अंधार. हळू हळू नशा चढत जाते अंधाराची. उजेड धडका देत राहतो दाराखिडक्यांवर. एखाद्या चुकार फटीतून आलाच उजेड आत अंधाराशी लढाई जिंकून तरी मी सज्ज असतेच गडद काळं ठिगळ घेऊन. फटीला खिळा मारला की मग तगमग कमी होते. मग मी अशीच ठिगळं लावत फिरते घरभर, उजेडाची प्रत्येक शक्यता बंद करत. अंधार धमन्यांमधे वाहतो. श्वास उच्छवास अंधाराचेच होतात आणि मग मनातला सैतान छद्मीपणे हसत राहतो माझ्या धडपडीवर.

एक दिवस पंक्चरलेला

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/09/2011 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस पंक्चरलेला
गेलेल्या रविवारच्या दिवसाची ही सत्यकथा आहे. रविवार म्हणजे सुट्टी वैगेरे काही नाही. कारण मला साप्ताहीक सुटी शनिवारची असते. सध्या रात्रपाळी असल्याने रविवारी रात्री कामाला ११ वाजता जायचे होते. कालची सुटी असल्याने आदल्या रात्री झोप झालेली होती. त्यामुळे रविवारच्या सकाळी लवकर उठलो. रुग्णालयात भरती झालेले एक जवळच्या नातेवाईकांना दुपारी रजा देणार असल्याने त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी जायचे होते. कालपासून मुलगा 'सायकलमध्ये हवा भरून आणा' 'सायकलमध्ये हवा भरून आणा' अशी भुणभुण करत होता.