Skip to main content

कथा

मुल्ला नसीरुदीन

लेखक मन यांनी शुक्रवार, 02/12/2011 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसापूर्वीच मीमवर "मुल्ला नसरुद्दिनच्या कथा"(http://www.mimarathi.net/node/3298) पाहून पुन्हा लहानपणीचे दिवस आठवले. उन्हाळ्याचे सुट्ट्यात खेळून दमलो,थकलो, की घरी येउन मस्त कलंडून जात असू. कधी कधी एखाद्या शांत दुपारी निव्वळ आजूबाजूचे पस्ख्यांचे आवाज, शेजारच्या दाट झाडीत लपलेली वानरे,हळुवार येणारी झुळूक्,दूरून जाणार्‍या तांबड्या गायींच्या गळ्यातला घंटेचा नीरव शांततेला मंजूळ आवाज, व त्याला निरखणारे आमचे बालमन असा योग जुळून मस्त तंद्री लागे.

गफलत ! ( भाग १ )

लेखक चाफा यांनी बुधवार, 30/11/2011 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
पुराणाचा अभ्यास हा माझा एकेकाळचा छंद पण आता तोच माझ्या पोटापाण्याचा उद्योग झालाय. सध्या मला एक नाणावलेला पुराणवस्तु संशोधनकर्ता म्हणुन मान्यता मिळायची वेळ आलिये. पण मी नुसताच पुराणवस्तुंमधे गुंतुन पडलेला नाहीये. माझे आवडते मत म्हणजे ‘पुराणातली वांगी पुराणात ठेउ नका’ कारण त्यात बरचसं तथ्य असतं हे आता शास्त्रसुध्दा मान्य करत. निव्वळ दंतकथा म्हणुन आपण कानाडोळा करतो पण मुळात या दंतकथा तयार कशा होतात? आपल्याकडे म्हणतात ना ! ‘आग असल्या शिवाय धुर निघत नाही’ तसा विचार एकदा करुन पहा,............

बंक्या आणि भयकथा !

लेखक चाफा यांनी सोमवार, 28/11/2011 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
कै.श्री. नारायण धारप यांची क्षमा मागुन...... ********* "भयकथा लिहीणं म्हणजे एक विकॄतीच असते हं" दबक्या सुरात बंक्या म्हणाला. बंक्या म्हणजे आपला खास दोस्त. कॉलेजात असताना लेक्चर्स बंक करायचा म्हणुन आम्ही त्याला बंक्या म्हणत असु. आता ते नाव त्याला कायमचंच चिकटलय. दबक्या सुरात अश्यासाठी की जनरली यानंतर मी त्याला त्याचे थोबाड सांभाळण्याची सुचना देण्याची शक्यता होती पण आज आपला मुड चांगला होता म्हणुन आपलं विचारुन टाकलं " का बरं ? असं काय विकृत असतं भयकथांमधे?" " नाही कसं ? भयकथा नाSSSSSSSS त्या म्हणजेSSSSS एकदम हॉरर असतात" नाकावरचा अवजड चष्मा बोटाने सावरत बंक्या म्हणाला.

गावची गोष्ट !

लेखक चाफा यांनी गुरुवार, 24/11/2011 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
सुमो चौथ्यांदा बंद पडल्यावर कल्पेशने स्टियरींगवर बुक्की मारुन कानातुन आरपार जाईल अशी शिवी हासडली. आणि मागे वळत बाकी कंपुला आवाज दिला " चला बे, बाहेर निघा परत गाडी बंद पडली. साSSला, पनवतीच लागलीय मागे." . " कल्प्या, तरी सांगत होतो हा डब्बा नको म्हणुन! " तक्रारीच्या सुरात माणिक म्हणाला. माणिक म्हणजे कंपुचा तोफ़खाना फ़रक फ़क्त इतकाच की हा कंपुवरच भडीमार करायचा. " माणक्या, क्वालिस घेत होतो तर महाग पडेल म्हणालास. तेंव्हा तुला जोर आला होता नाही का?" अनिकेतने आपल्या तर्‍हेने राग काढला. " नायतर काय?

सहज

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा सहज असे वाटले कि स्वप्नांच्या गावी फिरून यावे .. थोडेसे आठवणींचे गाठोडे घेऊन एकटेच बाहेर पडावे .. निवांत स्वतः स्वतःला शोधून पाहावे. काही तरी जुने फिरून नव्याने मिळते का पाहावे .. नाही जरी मिळाले तरी जुने विश्व पुन्हा एकदा अनुभवावे .. म्हणून मग आठवणींचे गाठोडे उघडून बसले नि - त्यात कधी हरवून गेले माझे मलाच कळले नाही. स्वप्नांच्या गावी जाण्याची गरजच जणू उरली नाही. जुनीच स्वप्ने पुन्हयांदा नवी वाटू लागली. मला पण माझी भीती वाटू लागली. पण स्वप्नेच ती किती वेळ सुखावण्याची ताकद असणार त्यांच्यात ?? परिस्थितीचे भान दिल्याशिवाय ती तरी कशी सत्यातून जाणार ? मी पण मग हट्टाला पेटले.

वादळ

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज मला खूप मोकळं मोकळं वाटत होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून मनाची सुरु असलेली घालमेल संपली होती एकदाची !! गेले काही महिने जे आम्ही वेगळे राहत होतो त्याचं फलित आज एका कागदावर काळ्या अक्षरात माझ्याकडे आलं होतं. मला खरच हे हवं होतं का ? त्याने एकदा तरी मला विचारायला हवं होतं. पण तो त्याचा स्वभावच नव्हता. माझ्याही अंगवळणी पडलं होतं सगळं. मला नक्कीच नको होतं, हे असं अर्ध्यात डाव मोडून जाणं. पण डावच तो !! एकटी मी तरी कसा मांडू शकणार होते ? अन्यथा आत्ताच्या, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, मी त्याची वाट पहात राहिले नसते.

तहान !

लेखक चाफा यांनी सोमवार, 21/11/2011 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
बराच काळ लोटला तरी अजुनही ते त्याच जागी अडकलेले, काळाची अर्थात त्यांना पर्वा नव्हती पण ज्या साठी ते आतुरले होते ती गोष्ट.....? कधी सुटका होणार? कधी ? अनेक प्रश्न त्या अंधारात उमटले. उत्तरादाखल एकच वाक्य. `लवकरच, सुरुवात तर झालेलीच आहे माध्यम मिळण्याचाच अवकाश'........................ ********* मुंबई- गोवा महामार्गावर पनवेल आणि पेणच्या मधे डाव्या बाजुला एक नर्सरी दिसते ती पाहिलीत का कधी ? ती माझीच आहे.