Skip to main content

कथा

एका अस्सल मर्दाची कहाणी

लेखक प्राध्यापक यांनी रविवार, 08/07/2012 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
बोरिस पलेवोय या सोविएत लेखकाच एक सुंदर पुस्तक "स्टोरी ऑफ रीयल मॅन"नुकतच वाचण्यात आल्,एका अस्सल देशभक्ताची ही कहाणी आहे,हि कादंबरी एका खर्‍या व्यक्तीरेखेवर बेतलेली आहे.तो व्यक्ती म्हणजे अलेस्केइ मेस्सेरेव्ह जन्म २० मे १९१६,रशियातील एका सामान्य कुटुंबातला.

"अ लॉट कॅन हॅपन ओव्हर कॉफी"

लेखक अमोघ शिंगोर्णीकर यांनी शनिवार, 07/07/2012 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी बर्‍याचजणांना CCD अर्थात कॅफे कॉफी डे माहीत असेलंच. म्हणजे आहेच. तर त्यांची जी टॅगलाईन आहे " A Lot Can Happen Over Coffee" बर्‍याच दिवसापसून डोक्यात भणभणत होती. म्हणजे असं की, काय नक्की सांगायच असेल यांना, असं काय काय घडू शकतं फक्त एका कॉफीवरून...... असे एक न एक अनेक विचार होते. पण कोणास माहीत होतं की, ते काय काय होतं हे जाणून घेण्यासाठी कोणीतरी असावं लागतं.. मी स्वतः आतापर्यंत कधीच तिथे गेलेलो नाही. त्या महागड्या कॉफ्या पिण्यापेक्षा आमच्यासारखी भटकी माणसे, एखाद्या टपरीवरच्या चहात स्वर्गसुख शोधतात.... आयुष्य अगदी सुरळीत चालू होतं. घर - नोकरी - मित्र - जोपासलेले छंद (चांगले)...

तुमचीच गोष्ट.... बिन नावाची!!

लेखक अमोघ शिंगोर्णीकर यांनी शुक्रवार, 06/07/2012 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण नुकताच संपलेला. सप्टेंबरमधला तो एक दिवस, वेळ सकाळी आठची. "तो" वडाळा स्टेशनवर उभा, आठची पनवेल पकडायला. जसे आपण सगळे इंजिनिअरिंग स्टुडंट्स म्हणवतो, तसाच तो हि नुकताच इंजिनिअरिंग स्टुडंट बनलेला. ट्रॅकजवळील गवताची पाती, नुकताच पडलेल्या उन्हामुळे स्वत:च्या हिरवट-पिवळ्या रंगांच्या दवबिंदूत चकचकीत अविष्कार दाखवित होती. तो फर्स्ट क्लासला उभा. तीन नंबर प्लॅट्फॉर्मवर ८.१० ची अंधेरी पनवेल आली. त्यांच्या समोर लेडीज फर्स्टक्लास आला. "ती" गोरीपान... नाजूक. उभ्या-उभ्याच त्याची नजर तिच्यावर खिळली. अचानक मोबाईलचे सिम ब्लॉक व्हावे तसे झाले. "ती" मात्र स्वत:च्याच धुंदीत.

आरसा

लेखक शुचि यांनी गुरुवार, 05/07/2012 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला माझ्या प्रेमाची पर्वाच नाही!" - लटक्या रागाने , आपले गोबरे गाल फुगवत या महीन्यात पाचव्यांदा तरी नंदिनी हे उद्गारली. यावेळेस मात्र मी जय्यत तयारीतच होतो. मी उठलो. मेजावरचा तिचा सुबक आरसा घेऊन तिच्याजवळ गेलो आणि आरसा तिला देत मिष्किलपणे म्हणालो - "बाईसाहेब, हा प्रश्न तुम्ही योग्य व्यक्तीला का बरे नाही विचारत? तुझ्या सर्व तक्रारी उपकचेरींना धाडण्याऐवजी, मुख्य कचेरीलाच धाड ना. तुझे सर्व भावनाप्रधान, संवेदनशील मुद्दे हाताळण्यास मला तरी बघ बुवा हीच व्यक्ती योग्य आणि जबाबदार वाटते.