Skip to main content

कथा

हल्लीच्या भूतांचे हॉरर पिक्चर .......

लेखक कुलमयु यांनी शुक्रवार, 17/08/2012 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
सौ बरस गुज़रे रात हुए ! सौ बरस गुज़रे दिन हुए !. परवा मी रात्री टी.व्ही बघत होते... हॉरर पिक्चर लागला होता... तेव्हा मला सहजच भूत या विषयावर लिहावास वाटल ... पांढरी साडी , प्रमाणाबाहेर लांबसडक मोकळे केस सोडलेले ( कोणते तेल वापरत होते काय माहित ??? :D ) , फारसा मेकअप नसलेला (दिसायला सुंदर पण मेकअप बिघडलेला :P ) हातात मेणबत्ती घेऊन जाणारी (कुठे जाते ती कुणास ठाऊक ??) , मग तिच्या गाण्याच्या आवाजाच्या दिशेने जाणारा नायक अस काहीस तर काही तंत्रमंत्राचा वापर करून घालवण्याचा प्रयत्न (आता बघा हं!

मसीहा .....

लेखक मन यांनी रविवार, 05/08/2012 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट नगराचे ग्रह फिरले की काय कुणास ठाउक. नगर छोटं होतं, पण चांगलं होतं. लोक खाउन पिउन सुखी होते. पण हाय रे दैवा. ज्यानं रक्षा करावी म्हणून तलवार दिली त्याचेच डोके फिरले की काय. एकाएकी घोड्यावर बसून राजा बेभान होउन नगरातून हल्ली फेरी मारी. वाटेल त्याला राजाची तलवार कापून काढी. मागून येणारे त्याचे हत्ती नि लवाजमा नगर उध्वस्त करी. तो दिसला की आता लोक सैरावैरा पळू लागत. करणार काय. काही त्याच्याकडे ओरडून प्राणाची दूरूनच भीक मागत. पण हाय रे दैवा. त्याला ना कुणाचे काही ऐकू येइ ना कुणी त्याला रस्त्यात दिसे. त्याची तलवार मुक्त हस्ते आडवी तिडवी फिरे.

घोड्याची गोष्ट....

लेखक मन यांनी रविवार, 05/08/2012 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार पूर्वीची गोष्ट फार फार पूर्वी... अगदि माणूसही तिथे कधी गेला नसेल अशा निबिड,किर्र अरण्यातली गोष्ट आहे. ही आम्हा घोड्यांची गोष्ट आआहे.शाकाहारी चतुष्पादांची गोष्ट आहे. घनदाट जंगल होतं. दिवसाही धड सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचू शकत नसे इतकी दाट वनराई. सगळं कसं हिरवंगार. त्यावर जगणारे आम्ही खूप सारे घोडे, झेब्रे नि तत्सम कळप. आम्ही घोडे फारच सुखाने जगू असं काही नाही, त्यांचीही आपसात भांडणे होत. पण एकूणात खूप काही खायला मिळे. एकदम जंगलातलं वातावरण पालटलं. एकाएकी पिवळ्या रंगाचा कुणी, अंगावर काळे पट्टे असणारे एक मोठ्ठे मांजर की बोका जोरदार गर्जना करत आले.

बायोहजार्ड भाग १ /३

लेखक राजघराणं यांनी शुक्रवार, 03/08/2012 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
वसूने डाव्या कोपराने स्टेरलियम च्या बाटलीचे बटण दाबले. ते निळे द्रावण उजव्या हातात घेतले. प्रथम दोन्ही हातांची बोटे चोळली मग तळहात. मागची बाजू. आधीच उघडून ठेवलेले निर्जंतुक ग्लोव्ह्ज चिमटीने उचलून हातांवर चढवले. अ‍ॅक्सेस कंट्रोल पाशी बुब्बुळ दाखवले. पहिला दरवाजा उघडला. मग दुसरा दरवाजा उघडण्यासठी तिने पुन्हा अ‍ॅक्सेस कंट्रोल पाशी बुब्बुळ दाखवले. ती तिच्या कॅबिनेट मधे दाखल झाली. डॉ. वसुंधरा सुब्रमण्यम वय वर्षे ४३. अविवाहित. ती एम. बी. बी. एस.

द मरुन रोब

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 01/08/2012 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही दोघं पार्टीहून घरी आलो तर सासूबाई रडतायत, सासरे समजूत घालतायत आणि माझे आई वडील बघतायत असा नजारा होता. मला वाटलं, आजे सासूबाईंची तब्येत मधे फारच नाजूक होती त्यांनी बहुतेक व्हर्टिकल टेक-ऑफ घेतलेला दिसतोय. प्रसंगाचं गांभीर्य बघून मी सीरियसली विचारलं 'आहो, काय झालं? ' तर आई म्हणाली 'तुझ्यामुळे रडतायेत!'. मला जाम टोटल लागेना, मी प्रश्न रिपीट केला 'काय झालं? ' तर सासूमां म्हणाल्या 'तुम्ही ऐन उमेदीत अध्यात्माला लागलात, मला काळजी वाटतेय' 'कसली? ' 'तुम्ही सगळं सोडून जाल' 'कशाबद्दल? ' 'सगळे अध्यात्माला लागलेले संसार टाकून जातात, तुमचा बुद्ध नाही का तान्हं मूल आणि बायको सोडून गेला?