मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बडबड

बिपिन कार्यकर्ते · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"ए हळू रे!" "काय हळू? अशीच मजा येते!" "म्हणून काय इतकी फास्ट चालवायची?" "नाही तर काय? ही काय बैलगाडी आहे का?" "ही बैलगाडी नाहीये... मात्र तू बैल आहेस हे नक्की!" "आणि तू माझी गाय" "पुरे! बाइक चालवताना जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!" "ब्वॉर्र! राह्यलं! पण जरा अजून जवळ सरक ना. घट्ट पकडून बस ना." "नक्को... आधीच तू सारखे ब्रेक मारतो आहेस ते काय कळत नाहीये का मला?" "हा हा हा" "जरा हळू रे... खूप स्पीड वाढवला आहेस... मला भिती वाटतेय... वळणावर तरी हळू कर ना. प्लीज!" "काही नाही होत गं... माझा कंट्रोल................. आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . "बघ तरी तुला सांगत होते... हळू चालव, हळू चालव." "हो गं! ओव्हरकॉन्फिडन्समधे गेलो मी." "आता समजून काय उपयोग! त्या दिवशी समजलं असतं तर आज हे असं रोज याच वेळी याच वळणावर येऊन हीच बडबड करायची अंतहीन पाळी नसती आली आपल्यावर."

वाचने 10357 वाचनखूण प्रतिक्रिया 44

In reply to by यकु

रेवती 12/09/2012 - 20:47
शुभ बोल नार्‍या तर म्हणे मांडवाला आग लागली! काय हे यकु! आँ? हॅलोविन जवळ येतोय एवढाच बोध घ्यायचा, बाकी काही नाही.

In reply to by रेवती

यकु 12/09/2012 - 22:30
मला वाटलं वैनी व बिका गाडीवरुन पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पडल्यापड्ल्या बिकांनी हे लिहिलंय. बाकी तशीही बिकांना गाडी नीट चालवता येत नाहीच ! ;-)

In reply to by यकु

श्रावण मोडक 12/09/2012 - 23:09
मला वाटलं वैनी व बिका गाडीवरुन पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पडल्यापड्ल्या बिकांनी हे लिहिलंय.
"पुरे! बाइक चालवताना जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!"
! हे राम!!! वय काय, बोलतंय काय... छ्या...खातंय आता मार बिकाचा.

शिल्पा ब 12/09/2012 - 21:45
लेखु आवडला. मला आधी वाटलं लोकं कशी बडबड करतात, मग काय गमतीजमती होतात असं कैतरी लिहिलंय की काय ! ही एक्दम भुताची स्टोरीच लिहिली की तुम्ही.

आदिजोशी 12/09/2012 - 21:47
बाईने बडबड केली नसती तर त्याचे चित्त विचलीत होऊन दोघे गचकले नसते. डाण्या न सांगता परदेशी गेल्याचे बिकाने फारच मनाला लाऊन घेतलेले दिसतेय.

मन१ 13/09/2012 - 00:40
अपेक्षित, सोपे पण छान. वरील सर्वाम्शी( यकु, आदिजोशी,नंदन ह्यांच्याशी विशेष करुन) सहमत.

विकास 13/09/2012 - 01:52
गोष्ट एकदम आवडली पण त्यामुळे आपण अंधश्रद्धा प्रसार तर करत नाही आहात ना असा प्रश्न पडला आहे. ;)

In reply to by निखिल देशपांडे

अमोल खरे 13/09/2012 - 10:34
तरी बिकांना सांगत होतो की भारतात दुबईसारखी बाजुला अरबी मुली घेऊन फास्ट गाडी / बाइक चालवत जाऊ नका, पण ऐकतील ते बिका कसले.

In reply to by कवितानागेश

शुचि 14/09/2012 - 07:54
ही गोष्ट लई आवडली! बिका, दुसरी गोष्ट सांगा ना.... (हाच प्रतिसाद पुढच्या कथेला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही) पण आधीचा संवाद जरा अजून फुलवला असता तर ...... ;)

शैलेन्द्र 13/09/2012 - 11:54
त्याच असं आहे.. बाइकवर जर बसायच असेल, त्यातही डबल्सीट, त्यातही मागे किलबिलती मैना असेल, तर मागच्या मैनेने आपल्या हाताचा उपयोग करुन पुढच्या राघुला घट्ट सीट्बेल्ट घालावा.. अस केलं की वेगावर नियंत्रण आपसुक येत.. उगा जोरात पळवुन ब्रेका मारायची गरज पडत नाही.. :)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

स्पा 13/09/2012 - 14:16
हीहीही !! भारी टाकला राव, पंच !!! विमे आता स्वतः पंच टाकायचं वय झालंय तुमच.. दुसर्यांच्या "टाकलेल्या" पंच वर काय हीही करत बसला हात ?

In reply to by स्पा

प्रचेतस 13/09/2012 - 20:21
विमे आता स्वतः पंच टाकायचं वय झालंय तुमच..
वैयक्तिक आणि अवांतर प्रतिसाद. संपादक मंडळ श्री. स्पा यांना समज देईल काय? - (उगाच) कावणे.

इरसाल 13/09/2012 - 12:52
१. घ्या २. आय्ला ३.खरच काय ४. आम्ही बघतोय हं ५. काय तरीच काय ? ६. कोण म्हणे ७. संदेश का.. बरं बरं कोणता ? ८. काही कळलं असेल तर शपथ. ९.ह्यांच आपलं वेगळंच. १०. आवडला/नाय आवडला इति समर्पित.

च्यामारी, विडंबन करायच्या उत्साहात अभिप्राय द्यायचा राहूनच गेला की!!!! उत्तम लघुभयकथा! साधी, सोपी, उगाच फापटपसारा नाही!!! पण कितीहि परिश्रम करून रिपोर्ट पुढ्यात ठेवला तरी आमचे खवचट प्रोफेसर जसं म्हणायचे त्याप्रमाणे, "इट्स अ गुड स्टार्ट!" नाही म्हणजे या वर्षी भयालीताईची शिव-ब्रूम उचलायचीये तुम्हाला!!! :)