Skip to main content

कथा

घर पहावे बांधून .. - अंतिम

लेखक स्पा यांनी गुरुवार, 18/04/2013 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ :- http://www.misalpav.com/node/24523 वत्सला बाई संपलेला दुधाचा ग्लास घेऊन औषध आणायला बाहेर गेल्या.. ती हि थोडीशी मागे सरकली, तेवढ्यात आत्त्याने झपाट्याने पुढे सरकून तिचा हात दाबला.. " माझं घर आहे, तू.... निघून जा.. घर पाहावे बांधून ... घर निघून जा .. तुला पाहावे बांधून .... मला नाय जायचं .. बांधून टाकेन .. सगळ्यांना बांधेन ..माझं घर .. माझं घर माझ घर .. तोंडातल्या बोळक्यातून जीभ वळवळत होती, तोंडावरच्या शिरा ताणल्या गेलेल्या होत्या.. अत्त्या जवळजवळ सरकत होती ती जोरात ओरडून कशीबशी बाहेर आली. आत्त्या बोळक्या तोंडाने हसत होती.

घर पहावे बांधून .. - १

लेखक स्पा यांनी बुधवार, 17/04/2013 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दीने भरून सांडणाऱ्या स्टेशन मधून ती कशीबशी बाहेर पडली, आणि तीच तिलाच हायसं वाटलं. हातातली पिशवी सावरत ती एका कडेला सावलीत उभी राहिली, पिशवीतून पाण्याची बाटली काढून अर्धी संपवल्यावरच तिच्या जीवात जीव आला. रुमालाने चेहरा सारखा करत तिने आईला फोन करून सुखरूप उतरल्याचे सांगितले. पण अजूनही प्रवास संपलेला नव्हता, एक महत्वाचा टप्पा पार पडला एवढेच,प्रचंड गर्दीनेच ती दडपून गेलेली होती, उन्हाळा मी म्हणत होता. उन्हाच्या झळांनी हैराण होऊन तिने ओढणी तोंडावर बांधून घेतली .हातातला पत्ता पाठ झालेला असूनही तिने परत पाहून घेतला, हो चुकामुक नको परत.

काही मानवी अनुभव

लेखक तिमा यांनी बुधवार, 17/04/2013 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही दोघी सख्ख्या बहिणी. ती थोडी उजळ.मी सावळीच आहे.. एका उंच इमारतीत रहातो आम्ही. आई आमच्या लहानपणीच गेली. म्हणजे एक दिवशी रात्री ती जी बाहेर गेली ती परत आलीच नाही. मग आम्ही दोघीच उरलो एकमेकींना. एका घरी जास्त काळ नाही रहायचो. पण जेंव्हा भेटायचो तेंव्हा आमच्या चु(क्)चु(क) वाणीत भरपूर गप्पा मारायचो. मी जात्याच खोडकर होते. तरी बहीण नेहमी मला म्हणायची," तू बाई फार धोका पत्करतेस. एकदिवशी जीवावर बेतेल तेंव्हा समजेल." पण मला आवडायच्या खोड्या काढायला! आता, त्या दिवशीचीच गंमत सांगते. दिवाळीचा पहिलाच दिवस होता तो. एका किड्याचा पाठलाग करता करता मी लिफ्टमधे गेले.

चंद्रकांता - १.१ - नजरकैदेतली राजकन्या

लेखक आदूबाळ यांनी रविवार, 14/04/2013 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवसांत अद्भुतरम्य असं काही वाचलं नव्हतं. अचानक "चंद्रकांता" ही देवकीनंदन खत्री यांची सुप्रसिद्ध कादंबरी आंजावर मिळाली. त्यावरची टीव्ही मालिका आठवत असेलच. मालिकेने मूळ कादंबरीला न्याय दिला नाही असं (लेखकाच्या नातवासह) अनेकांचं म्हणणं होतं. मिपाच्या वाचकांसाठी ही कादंबरी मराठीत आणण्याचा विचार आहे. ____________________________ विस्तीर्ण अशा सपाट पठारावर एक दगडी उंचवटा होता. मावळत्या संध्याकाळी त्यावर बसून दोन तरूण आपापसांत बोलत होते. बाविशीचा वीरेंद्रसिंह नौगढच्या राजा सुरेंद्रसिंह यांचा एकुलता मुलगा होता. दुसरा तरूण तेजसिंह हा सुरेंद्रसिंहांचे दिवाण जीतसिंह यांचा पुत्र होता.

तपश्चर्या आउटसोर्स – कथा सत्यव्रताची –निरुपण दासबोधाचे (नवी स्टाईल)-भाग -एकतपश्चर्या आउटसोर्स – कथा सत्यव्रताची –निरुपण दासबोधाचे (नवी स्टाईल)-भाग -दोन

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 12/04/2013 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
तपश्चर्या आउटसोर्स – कथा सत्यव्रताची –निरुपण दासबोधाचे (नवी स्टाईल)-भाग -एकतपश्चर्या आउटसोर्स – कथा सत्यव्रताची –निरुपण दासबोधाचे (नवी स्टाईल)-भाग -एक पुढे.... मेनका अवघ्या सोळा वर्षांची अक्षत यौवना होती, आज पहिल्यांदाच इंद्रासमोर नृत्य करीत होती. नृत्य करता-करता इंद्राची तिच्या सर्वांगावर भिर-भिरणारी नजर तिच्या ध्यानात आली. याचा अर्थ ही तिला माहीत होता. अप्सरा म्हणजे स्वर्गातल्या भोगदासी, आणि अप्सरेवर पहिला हक्क सदैव इंद्राचाच. पुढे काय होणार या कल्पनेने तिचे शरीर थरथर कापत होते.

माय ईंग्लिश वॉल्कींग..!

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 12/04/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक पसरट भांड्यातील राजकुमार आहे ज्याचे विचार क्षितिजापलीकडे जाऊन अंधुक होतात.. पण या जगात असेही लोक आहेत ज्यांच्याकडे भविष्यापलीकडे जाऊन बघण्याची शक्ती असते.. माझे आईवडील अश्यांपैकीच एक.. काय, कसे, नेमके कश्यामुळे, माहीत नाही पण माझ्या आईवडीलांनी मी पाळण्यात असतानाच ओळखले की माझे ईंग्रजी भाषेचे ज्ञान इतर मध्यमवर्गीय मराठी मुलांच्या मानाने फार कच्चे आहे... आणि... तिथेच एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला...

अहो चहा घेताय ना? (कथा)

लेखक मी_देव यांनी बुधवार, 10/04/2013 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
“अहो चहा घेताय ना? निवतोय तो, किती वेळ लावायचा आंघोळीला.” दाराखालून आत सरकवलेला पेपर उचलत सुजाताने विनायकला सकाळपासून दुसर्‍यांदा चहाची आठवण करुन दिली. कॉलेज मधुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून सुजाताला निदान पेपर तरी चाळायला वेळ मिळू लागला होता. होय स्वेच्छानिवृत्ती. कारणंच तशी होती त्याची. सुजाताची तब्येत ठिक नसायची. दम्याचा विकार गेल्या एक-दोन वर्षांत पार विकोपाला गेला होता. त्यामुळे मागील वर्षी, रिटायरमेंट एज च्या सात वर्ष आधीच कामाला पूर्णविराम देऊन, सुजाताने पूर्ण वेळ आराम करायचा असं ठरवलं होतं विनायकने. विनायक बॅंकेत मॅनेजर होता. मात्र मागील वर्षी त्यानेही नोकरी सोडली होती.

निमित्त फक्त एका भेटीचे

लेखक सुज्ञ माणुस यांनी सोमवार, 08/04/2013 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
निमित्त फक्त एका भेटीचे परवाच आई च्या तोंडून तिच्या शाळेतल्या बाईंची भेट ऐकली. पहिल्या दोन वाक्यातच डोळ्यात पाणी उभे राहिले. खरेतर त्या काळाची ती गोष्ट, ऐकून सोडून देण्यापलीकडे काहीही हातात नव्हते. पण आमच्या मातोश्रींचे बोलणेच इतके अमोघ, की त्यातल्या भावनांची मनात गर्दी व्हायला काही क्षणांचा अवकाश. मन भूतकाळात केव्हाच वाहून जाते. आठवणी आणि भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की अश्रूंचे हळुवार टीपके सैरावैरा धावू पाहतात इवल्याश्या डोळ्याच्या पटांगणावर. निमित्त फक्त एका भेटीचे. अशीच कोणतीशी वेळ, दोन लोक बस ची वाट बघत उभी आहेत.

दुष्काळावर मात

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 02/04/2013 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळावर मात असेच एक गाव होते. त्या गावाजवळून जाणारा एक नदी होती. नदीकाठी मोठ्ठी आंबराई होती. आंब्यांच्या मोसमात त्या आंब्यांच्या झाडांना रसदार आंबे येत. त्या आंबेराईमुळेच त्या गावाचे नाव आंबेवन पडले होते. ती आंब्याची बाग कुणा एकाची नव्हती. ती त्या गावच्या मालकीची होती. संपुर्ण गाव त्या आंबेराईचे मालक होते. गावची पंचायत त्या झाडांची निगा राखे. पंचायतीने गावातल्या प्रत्येक घरातल्या स्त्री किंवा पुरूषाला कामे नेमून दिली होती.

नायक क्रमांक एक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2013 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.