Skip to main content

कथा

पहिले चऱ्हाट

लेखक जयंत_अत्यंत पुणेरी यांनी गुरुवार, 28/02/2013 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे कामाचा ताण असह्य झाला होता.अंतर्मनाच्या विलपॉवर नामक टॉनिकवर वावर चालू होता.(म्हणजे तो आताही तसाच आहे.against will...) बाहेरच्या जगात काय चालले आहे, हे आपल्याच जगात असणाऱ्या माणसांना कसं उमगणार?

स्त्रियाना नक्की काय पाहिजे?

लेखक लिलि काळे यांनी बुधवार, 27/02/2013 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमसकार, इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मला मिसळपाव खुप आवडल. माझे मराठी चान्गले नाही. पन ईथे भप्रुर वाचनार व लिहिनार आहे,मग इम्प्रोव होईल. मला हि तेच पाहिजे. मला खत्री वाट्ते तुम्ही मदत कराल याची. आज मी एक गोश्ट बोलते मला खुप खुप आवडलेली.

किन्ग आर्थर आणि चेटकिण

एकदा शेजारच्या राजाच्या राजाने किंग आर्थर बेसावाध होता त्यावेळी हल्ला करून त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. पण तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले व त्यानी त्याला मारायचे नाही असे ठरवले. त्यानी आर्थरला म्हटले तुला आम्ही एक खुप अवघड प्रश्न सान्ग्णार, त्याचे उत्तर तु एक वर्शाच्या आतमधी द्यायचे.

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 26/02/2013 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 तिच्या नजरेतली शांतता थोडीशी विस्कटलेली होती. किंचित गर्वानं भारलेला तिचा आवाज मला ऐकु आला ' क्षत्रिय' ....

अनपेक्षित - भाग १

लेखक निमिष ध. यांनी शनिवार, 23/02/2013 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
(ही एक पूर्णतः काल्पनिक कथा आहे. कोणतेही साधर्म्य हा एक निव्वळ योगायोग मानावा) सकाळची सवय उठल्या उठल्या फेसबुक उघडले. फोनवरच असल्यामुळे अंथरुणातून उठण्याचीही गरज नाही. तसेही सकाळी हवामान पाहणे आणि बातम्या वाचून झाल्यावर फेसबुक उघडलेच जाते पण आज सकाळी सकाळी नोटिफिकेशन मध्ये एक नवीन फ्रेंड्स रिक्वेस्ट होती. पहिले तर कोणीतरी अनोळखी कन्या होती. आताशा अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारणे बंदच केले आहे. तरीही कॉलेज मध्ये गेल्यावर कॉम्प वर परत फेसबुक उघडले. कन्या दिसायला तर एकदम सुंदर होती. जास्ती काही कळले नाही - प्रायव्हसी सेटिंग एकदम जोरदार होत्या.

युद्धकथा ६ - न पुसला जाणारा कलंक - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 21/02/2013 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१)युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१) " प्रशासकांच्या वतीने मी आपले स्वागत करतो ! आपण येथे सुट्टीवर आलेला नसून कामासाठी आपल्याला येथे आणण्यात आलेले आहे हे कृपया ध्यानात ठेवा. ज्याप्रमाण आमचे सैनिक आघाडीवर तिसर्‍या राईशच्या विजयासाठी आपले प्राण अर्पण करत आहेत त्या प्रमाण नवीन युरोपसाठी तुम्हाला येथे काम करायचे आहे. ते कसे करायचे हे तुम्हावर अवलंबून आहे. आम्ही तुमची काळजी घेऊ व केलेल्या कामाचा मोबदलाही देऊ.

कालचा दिवस....

लेखक बाबा पाटील यांनी बुधवार, 20/02/2013 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातला एखादा दिवस अचानक भंकस का जातो,हे एकदा त्या ब्रम्हदेवाला विचारल पाहिजे राव.कालचा दिवसही असाच विचित्र गेला का कुनास ठाउक पण आख्या दिवसभरात एकही काम धडपणे झाले नाही. बर्‍याच दिवसानंतर सकाळच्या ओपीडीत फक्त एकच पेशंट झाला,दुपारी १ वाजताच दवाखाण्यातुन बाहेर पडलो व क्रिकेटची बॅट घ्यायला चंदननगर मधुन बोंबलत एफ सी रोडला गेलो तर दुकान बंद्,तेथुन एक महत्वाचे पुस्तक घ्यायला युनिक अ‍ॅकडमीत गेलो तर पुस्तक बाजारातुन संपलेले,वैतागुन घरी आलो तर पिल्लु सर्दी खोकल्याने जॅम झालेल.

आता सांगा.. (२)

लेखक इनिगोय यांनी मंगळवार, 19/02/2013 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
(पूर्वार्ध) ...... प्रकाशाची एक तिरीप थेट त्या गेले सात दिवस माझं लक्ष्य बनलेल्या, मला बेचैन करणार्या, गिधाडासारख्या, निळ्या डोळ्यावर पडली! आता तुमच्यासमोर मान्य करायला हरकत नाही.. जेव्हा तो अभद्र डोळा माझ्या नजरेला पडला, तेव्हा त्या मरणभीतीचा कणभर स्पर्श मलाही झाला! मणक्यातून एक थंडगार प्रवाह सरकत गेला! त्या खोलीतल्या साचलेल्या काळोखात एकूणएक गोष्ट बुडून गेली होती. तो पलंग, तो म्हातारा, त्याचा चेहरा.. सगळंच.

सठीयाय गयी सजनवा हमार

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 19/02/2013 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
तसे मला चित्रपट खूप आवडतात. त्यामूळेच का होईन आयुष्यात एकदा तरी एखादी लव स्टोरी का काय म्हणतात ना तस घडावी असे वाटते. म्हणजे अश्याच एका रोमँटीक सकाळी जाग यावी ती सुर्यकीरणे का काय ते आंगावर पडून, मस्त आळोखे पिळोखे देत जाग व्हाव. अंगभर गोड लहरी पसराव्यात अंगभर आन्हिक आटपून उंडरायला बाहेर पडाव. रस्त्यावर चीट पाखरू नसाव (चीट नसल तरी चालेल पाखरू मात्र असाव) समोर च्या रस्त्यावरून माझी गुलबकावली एका हाताने गवताच्या काड्या चघळत व दुसर्‍या हाताने केसाची शेपटी घोळवत येत असावी. मध्येच वाटेत तिने एखाद सुंदर फूल तोडाव नाहीतर एखाद्या मांजराची मिशी ओढत याव.

माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 19/02/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खरे तर नावातच ऑर्कुट असल्याने हे वेगळे सांगायला नकोच, तरी साधारण २००७ सालाची असावी. नक्की महिना आठवत नाही पण वातावरणनिर्मितीसाठी थंडीचा पकडून चला. मी २००६ साली कॉलेज पासआउट होऊन माझा पहिलाच जॉब करत होतो, ज्याला साधारण वर्ष झाले होते आणि आयुष्यात बर्‍यापैकी आर्थिक स्थिरता आल्याने सामाजिक गरजा भागवायला म्हणून ऑर्कुटवर पदार्पण केले होते. त्यामुळे तसा मी ऑर्कुटवर अगदी नवाकोराच होतो. आज मी काही मराठी ऑर्कुट समूहांवर सुपर्रस्टार वगैरे म्हणून ओळखला जातो, पण तेव्हा दोन कवडीचा सामान्य ऑर्कुटर्सही नव्हतो.