Skip to main content

कथा

माझी गडचिरोली सफर - एक थरारक अनुभव.

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 16/03/2013 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
"गडचिरोली" नाव ऐकुनच डोळ्यासमोर काही येत असेल तर ते घनदाट अरण्य आणि नक्षलवादी ... बाकी याबद्दल काही माहित होते तर ते एवढेच की महाराष्ट्राच्या एखाद्या कोपर्‍यात वसलेले गाव.. की जिल्हा... की जंगल असावे.. पण तो नक्की कोणता कोपरा हे देखील मी कधी महाराष्ट्राच्या नकाशावर शोधण्याचे कष्ट घेतले नव्हते.. पण माझ्या गावीही नसलेल्या ह्या गावी मला आयुष्याच्या एका महत्वाच्या वळणावर जावे लागेल हे माहित नव्हते.. मी अभिषेक नाईक, अका तुमचा अभिषेक, शाळेतील एक हुशार मुलगा, पण मुळातच अभ्यासाची आवड नसल्याने आणि आळशी स्वभावामुळे कसेबसे माझे शिक्षण झाले. आणि झालो एकदाचा स्थापत्य अभियंता. मुंबईतील V.J.T.I.

वाट

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 15/03/2013 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
त्याची वाट पाहायची तिला सवय झाली होती. नेहमी. येणं नक्की झालंय म्हणताम्हणता किती वेळा रद्दही व्हायचं. आणि मग तो आला की भरपूर गर्दी. ओळखीचे आणि अनोळखीही त्याला भेटायला यायचे. येणा-या गर्दीच्या डोळ्यांत अभिमान असायचा; चेह-यावर हसू असायचं; वातावरणात आनंद भरून जायचा. ते पाहताना ‘तो फक्त आपला नाही’ याचं दु:ख ती विसरून जायची. एक दिवस तार आली. तो गेला होता.

अनपेक्षित भाग ३

लेखक निमिष ध. यांनी मंगळवार, 12/03/2013 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी पण एकदम चमकून ती भारतीय मुलगी आताच भारतातून आली आहे हे भान येउन तिला दूर केले. (भाग २) तिचे समान घेऊन गाडीकडे निघलो. प्रवास कसा झाला, विमानात काय आवडले असे प्रश्न विचारून झाले. गाडीपाशी आल्यावर समान मागे टाकले आणि तिच्यासाठी दार उघडले. ती सांगत होती कि तिला गाडी आवडली. रस्त्यावर दुतर्फा असलेली गर्दी एकदम शिस्तीत होती. पहिल्यांदाच इतके बर्फ पाहून ती हरखून गेली. पण थंडी असल्यामुळे काकाडली होती. तो पर्यंत गाडीचे हिटर गरम झाले आणि तिचे काकादाने जर कमी झाले.

आन्जी: शतशब्दकथा: पैला नंबर

लेखक आतिवास यांनी शनिवार, 09/03/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या म्हाडिक गुर्जींना बाळ झालं. म्हंजे त्यांच्या बायकोला वो. गोरी मिटट पोरगी. मी कडे घेतलं की खिदळायची. आमी सर्वे मऊ हून जायचो. नादच झाला तिला कडेवर घेऊन हिंडायचा. कुटंकाबी जावा. म्हाडिक बै सारखी वरडाय लागली, “आन्ज्ये, अगं घे की पोरीला ...” अंक्या म्हणला, आता तुजा पैला नंबर पक्का. पण मला कटाळा यायला. सारखी बबली माझ्यासंगं. कुणी मला खेळायला बी घेईना. झाडावर चढता यीना, पळता यीना, मारामारी तर बंदच. हात बी दुखायला लागला. बबली जड लई. एक दिस कुणाचं ध्यान नाही ते बगितलं. जोरात चिमटा काढला बबलीला. रडली लई.

अनपेक्षित भाग २

लेखक निमिष ध. यांनी बुधवार, 06/03/2013 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आणि कोणाच्या तरी ओळखीने राहण्यासाठी जागा पाहण्याची विनंती करून संभाषण संपले. आता जागा पाहणे आले असे म्हणतानाच बॉस चा ईमेल आला. काही तरी नवे काय अजून काय! (भाग १ ) आज संध्याकाळी कोणाचा मेसेज आहे का ते पाहत होतो. अनुष्काचा होताच. या कामाच्या रगाड्यात तिच्यासाठी कोणाला जागा आहे का ते विचारणे राहूनच गेले होते. तिला sorry म्हणून या आठवड्यात नक्की काम करतो असे सांगितले. थोडे इकडचे तिकडचे बोलून ती गेली. मी लगेच फोन फिरवला. नूरी ला विचारले तिच्या कोणी मैत्रिणी रूममेट शोधतात का. आणि काय विचारता पहिल्याच फटक्यात जागा मिळाली.

न्याय

लेखक धन्या यांनी सोमवार, 04/03/2013 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. मी घाईघाईने समोरच्या टेबलावरील फाईली आवरत होते. आम्हा वकिलांसाठी कुणी सॉफ्टवेअर बनवेल तो सुदिन म्हणायचा. सारी दुनिया डीजीटल झाली, आम्ही मात्र अजूनही फाईलींमध्ये अडकलो आहोत. संगणकाचा वापर फक्त टायपिंग आणि प्रिंट मारण्यासाठीच. दारावर ठकठक झाली. आता ऑफीस बंद करायच्या वेळी कोण आलं म्हणून माझ्या कपाळावर आठया उमटल्या. काहीशा नाखूशीनेच मी "येस कम ईन" म्हटलं. आणि समोरच्या व्यक्तीला पाहून मला धक्काच बसला. ती समिक्षा होती. आम्ही शाळेच्या दिवसांमध्ये ज्या काकांकडे भाडेकरु म्हणून राहायचो त्या काकांच्या मोठया भावाची मुलगी. तेव्हा अधून मधून काकांकडे यायची ती.

अनोळखी नाते

लेखक भावना कल्लोळ यांनी सोमवार, 04/03/2013 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी प्रमाणे चर्चगेट वरून लोकल पकडली, पण डब्ब्यात चढताच एक चर्र होऊन गेले मनात. नेहमी सारखी आज ती डोळ्यासमोर नव्हती. असे कधी होत नाही म्हणजे मी इथे चर्चगेटला कामाला लागल्यापासून आणि विशेषता हि लोकल पकडण्याची चालू केल्यावर नेहमीचा दिसणारा चेहरा होता तिचा. काय झाले असावे? कारण एक रविवार सोडला तर ती कधी दिसली नाही असे झालेच नाही. बरे नसेल किवा काही काम असेल म्हणून आली नसेल असे मी उगाचच माझ्या मनाला सांगितले. तशी आमची तोंड ओळखच म्हणजे कधी कधी बाजूला बसून हि गप्प असायचो आम्ही. देवाण घेवाण व्हयाची ती फक्त स्मितहास्याची. काही न बोलता हि आमचे एक अबोल नाते झाले होते.

तीन डझन सूक्ष्मकथा : एक लक्षवेधक , रंजक लेखनप्रकार

लेखक मन यांनी रविवार, 03/03/2013 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या एका संकेतस्थळावर एका वेगळ्याच लेखनप्रकाराबद्दल वाचायला मिळालं. कमीत कमी शब्दांत एखादी गोष्ट सांगून जाण्याच्या एका लेखनप्रकाराबद्दल. त्याचं एक क्लासिकल उदाहरण दिलं जातं ते म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे ह्यानं केवळ सहा शब्दांत लिहिलेली एक कथा:- "For sale, Baby Shoes, Never Worn." . . म्हटलं आपणही असं काही लिहून पाहुयात. ह्यात थीम एकच; प्रत्येक वाक्याच्या मागं काहीतरी एक अध्याहृत घटना, कथा हवी. ती एका वाक्यावरून लागलिच डोळ्यासमोर यावी.

एक रात्र सरपटलेली ~‘~‘~‘ ...!!

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 28/02/2013 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी नेहमीप्रमाणे गावभर भटकून मावळल्यावर मी घराकडे कूच केली. अरुंद जिन्यातून वर माझ्या रूमकडे जाताना आजूबाजुला दिसनार्‍या सरपटणार्‍या प्राण्यांवर एक बारीक नजर होतीच. इथे आल्यापासून जीने माझे जिने हराम केले होते ती जिन्याच्या डाव्या भिंतीवर फतकल मारून बसलेली (की झोपलेली) होतीच. तिला चुकवून उजव्या बाजूने सटकलो. कुलुप उघडून आत रूममध्ये शिरलो. रूम म्हणजे एक भलीमोठी खोली आणि तिला जोडूनच एक बाथरूम. माझ्या घरासमोरचे आंगण म्हणजेच घरमालकाचे टेरेस, या हिशोबाने हवे तर आपण त्याला टेरेस फ्लॅटही बोलू शकतो. रूमच्या पुर्वेला एक खिडकी होती जी रात्रीची मी कायम बंदच ठेवायचो.