तीन दिवस झाले होते.कोणत्याच कंपनीचा काहीच रिप्लाय आला नव्ह्ता.ज्या कंपनीत इंटरव्हु दिला तिथुनही काहीच कळाले नव्हते.शेवटी शिवमने आपले बाडबिस्तर बांधले.
"शिवम,अरे कुठे चाललास? पुन्हा पिकनिकला जायचय का आपल्याला!!! व्वा मस्त..पण मग मला सांगितलं का नाही?"
अजिंक्यने विचारले.
शिवम एकदम शांत झाला.
"अजिंक्य, एवढ्या दिवस तु माझ्यासाठी जे काही केलंस त्याबद्द्ल धन्यवाद!!मी गावाला चाललोय परत." शिवम.
" तुला नेमक म्हणायचं काय?" कपाळावर आठ्या आणत अजिंक्यने विचारले.
" अजुन काय म्हणु....तीन दिवस झाले त्या कंपनीत इंटरव्हु देऊन त्याचा काहिच रिप्लाय नाही.जिथे रिस्युम दिलेत त्यांचा तर पत्ताच नाही. दोन वर्ष झालेत यार बी.ई. होऊन वाटल पुण्यात तरी जॉब मिळेल पण काय ऊपयोग त्या फस्ट क्लास डिस्टिंक्शन मार्कस मिळवुन....." शिवम एकदम शांत झाला.
"झालं तुझ बोलुन्??की अजुन काही बाकी आहे?अरे काय तु तुला आठवतं लहानपणी तुला झाडावर चढता येत नाही म्हणुन सगळी मुलं तुला चिडवायचे तेव्हा किती जिद्दीने तु प्रयत्न करायचास.आणि कोणत्याही गोष्टीत जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत धडपड करत राहायचास....आणि आता??" अजिंक्य त्याला समजावुन सांगत होता.पण त्याचे भाषण थांबले ते शिवमला आलेल्या फोनमुळे.
"हॅलो...." असं म्हणत शिवम एकदम शांत झाला
"शिवम काय झालं? कुणाचा फोन होता?" अजिंक्यने सवाल केला.
" याहू................त्या दिवशी इंटरव्हु दिलेल्या कंपनीत माझ सिलेक्शन झालंय..." शिवम आनंदाने ओरडला.
आणि ते उदास वातावरण अचानक सुखमय झाले.
सोमवारपासुन शिवमला कंपनीत बोलावले होते.
शेवटी तो दिवस आला.कंपनीत सगळ्या फॉरम्यालिटीज झाल्यानंतर त्याला डेव्हलोपमेंट डिपार्टमेंट देण्यात आले.
तिथल्या मॅनेजरने शिवमचे स्वागत केले.
"वेलकम मि. शिवम चला मी तुम्हाला तुमच काम समजुन देतो." मॅनेजर.
असं म्हणत तो शिवमला काहीतरी सांगत होता.इतक्यात एका मंजुळ आवाजाने शिवमचे लक्ष वेधले.
"सॉरी सर जरा उशीर झाला." ती तरुणी म्हणाली.
तिचे केस वार्यावर भुरभुर उडत होते.तिचे नाक पोपटासारखे लांबट होते चेहरा निमुळता होता.तिच्या निळ्या डोळ्यांकडे सारखे पाहावेसे वाटे. तिच्या गुलाबी गालाकडे शिवम पाहातच राहीला.ती तरुणी स्वर्गातुन आलेली अप्सराच वाटत होती.
"शिवम मी तुमची ओळख करुन देतो.ही स्वरांजली तुमच्याच टीममध्ये काम करेल.आणि स्वरा,हा शिवम.आजच नविन आलेत"
मॅनेजर ओळख करुन देत म्हणाला.
"हाय" शिवम लगेच बोलायला पुढे सरसावला. पण स्वरा तशीच निघुन गेली.
"शिवम, तिच्या वागण्याचं वाईट नको वाटुन घेऊस.तशी ती एकदम फ्री आहे.पण त्या घटनेनंतर ती अशी झालीये."मॅनेजर.
"अशी कोणती घटना घड्लीये तिच्यासोबत??" शिवमने सवाल केला.
" अॅक्चुअली तिची एक मैत्रीण होती.इथेच काम करत होती.जिच्या जागेवर आता तु काम करणार आहेस."
"तिचं काय झालं?" मॅनेजरचे बोलणे पुर्ण व्हायच्या आत न राहवुन शिवम ने प्रश्न केला.
" ती नाहीये या जगात.एका दुर्दैवी घटनेत तीच निधन झालं.तिच नाव........" इतक्यात मॅनेजरला कुणाचा तरी फोन आला.
आणि तो तसाच निघुन गेला....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
12311
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन वर्ष झालेत यार बी.ई. होऊन
आणि फस्ट क्लास डिस्टिंक्शन हि
In reply to दोन वर्ष झालेत यार बी.ई. होऊन by टवाळ कार्टा
नाय नाय
In reply to आणि फस्ट क्लास डिस्टिंक्शन हि by टवाळ कार्टा
मला म्हणायचे होते
In reply to नाय नाय by तुषार काळभोर
नाय नाय नाय
In reply to मला म्हणायचे होते by टवाळ कार्टा
फस्ट क्लास विथ डिस्टिंक्शन
In reply to दोन वर्ष झालेत यार बी.ई. होऊन by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to फस्ट क्लास विथ डिस्टिंक्शन by कपिलमुनी
इंजिनीरींग मध्ये बेरोजगारी वाढ्ली आहे.
एखाद्या तरी सेमेस्टरला बॅकलॉग
In reply to इंजिनीरींग मध्ये बेरोजगारी वाढ्ली आहे. by चेतन677
तुमच्या मताबद्दल आदर आहे.
In reply to एखाद्या तरी सेमेस्टरला बॅकलॉग by टवाळ कार्टा
भेंडी...आयमाय स्वारी तुमच्या
In reply to तुमच्या मताबद्दल आदर आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
आयला!!!!
In reply to तुमच्या मताबद्दल आदर आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
एम३
In reply to आयला!!!! by तुषार काळभोर
आता धागा इंजिनीयरींग कडे
In reply to एम३ by कपिलमुनी
०?????
In reply to आयला!!!! by तुषार काळभोर
गैरहजर हो...
In reply to ०????? by टवाळ कार्टा
चायला लागोपाठ ३ फेल नंतर
In reply to गैरहजर हो... by तुषार काळभोर
लायनीनी ६ अट्टेम्प्ट २७...हैट
In reply to आयला!!!! by तुषार काळभोर
महान पुणे विद्यापीठ
In reply to एखाद्या तरी सेमेस्टरला बॅकलॉग by टवाळ कार्टा
हायला .... साष्टांग नमस्कार
In reply to महान पुणे विद्यापीठ by कपिलमुनी
भाग थोडे मोठे येउद्यात. !!!
बरं!
गूढ
धन्यवाद
In reply to गूढ by समीरसूर
कॉलेज सुरु होणार आहे. कॉलेजात
In reply to धन्यवाद by चेतन677
कथा आवडली
कथा पण लहानच आहे
कथा आवडली मस्तय..
In reply to कथा पण लहानच आहे by चेतन677
कथा पकड घेत आहे...
कथेचे उर्वरीत भाग