Skip to main content

कथा

सौम्या आणि प्रणयरम्यता

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 23/06/2015 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
“हा वसंत ऋतुचा मोसम आहे.वातावरणात प्रणयाचे वारे वाहू लागले आहेत.पण हे सर्वांच्याच बाबतीत नव्हतं.आणि तसं माझ्याही बाबतीत.” सौम्या मला सांगत होती. सौम्याचे वडील आणि मी एकमेकाला ओळखत होतो.आमची ओळख आमच्या एका दुसर्‍या मित्राने करून दिली होती.

बहीण - शतशब्दकथा

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 23/06/2015 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमचं एकत्र कुटुंब हाय, आमी दोघी जावा. चालता बोलता थोरल्या जावेनं हाथरुण धरलं, लगेच दवाखान्यात हलिवलं, ही म्हणू नका ती म्हणू नका, माप चाचण्या केल्या, उसाचा सगळा पैका बगा औषधाला घातला, म्या माज्या बांगड्या काढून दिल्या ह्यांच्याजवळ म्हणल असू दे अडीनडीला देवाला साकड घातलं, माज्या बहिणीला बर कर म्हणलं, तिला आराम पडूस्तवर काय माज्या डोळ्याला डोळा न्हाई लागला, दवाखान्यात, घरी सगळं पळून पळून केलं, परवा नंदुबाई आल्यावत्या बगायला, डोळ्याला पदर लावून म्हणाल्या, "पोराबाळाची आई हाये, बरी कर देवा" चुलीवर चाच आधाण ठीवलेल.

इनर पीस

लेखक कपिलमुनी यांनी मंगळवार, 23/06/2015 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला निवड करावीच लागेल, हे शेवटचं सांगतेय" तिने कर्कशपणे ओरडून सांगितलं आणि टीव्हीवर कुंग फू पांडा बघत असलेल्या प्रीशाला ओढत घेऊन गेली. तो सुन्न होऊन त्या दिशेकडे पाहत होता. शेजारच्या बेडरूममधून दाबून धरलेला एक हुंदका पदर चुकवून बाहेर आला आणि बरंच काही सांगून गेला. अशी निवड करता येते? दोन्हीपैकी एक? आणि ती निवड करायचा हक्क मला आहे? आणि एकाला निवडायचे मग दुसर्‍याचं काय करायचं? कसं शक्य आहे? आणि निवडलं तरी हे इथेच थांबेल? पूर्वी थांबलंय? त्याचं डोकं गरगरू लागलं. क्षणाक्षणाला विस्फोट होत होते. प्रीशाचं टिपेला पोचलेलं रडणं त्यात भर घालत होते.

द स्केअरक्रो भाग ४

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 21/06/2015 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १ द स्केअरक्रो भाग २ द स्केअरक्रो भाग ३ द स्केअरक्रो भाग ४ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) माझा वीकेण्डचा सगळा प्लॅन डब्यात गेला. शुक्रवारी रात्री मी घरी झोकांड्या खातच घरी गेलो. शनिवारी सकाळी नशा उतरल्यावर मी माझ्या कादंबरीचा कच्चा ड्राफ्ट उघडला आणि वाचायला सुरूवात केली आणि माझ्या पत्नीला जी गोष्ट खूप पूर्वी समजली होती ती मला जाणवली.

मी आणि परी

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 20/06/2015 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कार्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे मी भयंकर तणावात होतो. कश्यात ही मन लागत नव्हते. प्रचंड उन्हाळ्यामुळे प्रकृती वर-खाली होत होती. निराशा मनात घर करू लागली होती. अचानक ती चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आणि सर्वच बदलले. गेल्या महिन्याचीच गोष्ट, संध्याकाळी घरी आलो. उन्हाळा असल्यामुळे सांयकाळी सात वाजता ही भरपूर उजेड होता. तसे म्हणाल तर परी आमच्या शेजारीच राहते. आपल्या आई सोबत ती पहिल्यांदाच घरी आली होती. मला पाहताच त्या चिमुकलीने दादा (आजोबा) म्हणून हाक मारली. का कुणास ठाऊक. कदाचित! गतजन्मीचे ऋणानुबंध असतील. गंमत म्हणून तिला विचारले, अपने दादा के पास आओगी.

द स्केअरक्रो भाग ३

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 20/06/2015 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १ द स्केअरक्रो भाग २ द स्केअरक्रो भाग ३ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) माझ्या दुःखात सहभागी व्हायला मी सोडून मोजून ३ जण आले होते. लॅरी बर्नार्ड तर होताच आणि दोन क्रीडापत्रकार होते. ते कदाचित दररोज शाॅर्ट स्टाॅपला जात असतील. शाॅर्ट स्टाॅप बार एल्.ए. च्या एको पार्क भागात सनसेट अॅव्हेन्यूवर होता. एल्.ए.डाॅजर्सचं स्टेडियम त्याच भागात होतं. कदाचित बेसबाॅलमधल्या एका पोझिशनवरुन शाॅर्ट स्टाॅप हे नाव आलं असेल.

अरे देवा! मुंग्याचमुंग्या.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 17/06/2015 07:33 या दिवशी प्रकाशित केले.
“ह्या मास्याच्या उदरात्त असलेली पिल्लं आपल्या इतर भावंडांचा वापर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी करीत असतात. याला गर्भाशयातलं भक्षण असं समजलं जातं.” मोहन मोकाशाचा मुलगा एकदा मला अंधेरी मार्केटमधे भेटला.त्याचवेळी त्याने मला त्याचे बाबा मध्यंतरी खूप आजारी होते. त्यांच्या लिव्हरला सूज आली होती. औषधपाणी केल्यावर त्यांच्या लिव्हरची सूज कमी झाली.नंतर त्यांना कडक डायटवर ठेवलं होतं.बरेच शक्तिहीन झाले होते.आता बरे आहेत.तुम्ही कधीतरी त्यांना भेटायला आमच्या घरी या.बाबानाही बरं वाटेल.

विहीर

लेखक सिध्दार्थ यांनी मंगळवार, 16/06/2015 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
तिने पटापटा भाकऱ्या टाकल्या. लाल भडक पातळ तुरीची डाळ करून गाडग बाजूला ठेवलं. झोपलेल्या आपल्या बापाला उठवत ती म्हणाली ”जेवण करून ठेवल हाय, नंतर खाऊन घे. म्या जरा विहिरीवर जाऊन येते.” बापाने काही न बोलता हातानेच तिला जाण्याचा इशारा केला. इशारा करणारा हात खाली जोरात आदळला तशी शेजारी ठेवलेली दारूची बाटली पडली. तिने बाटली सरळ करून ठेवली आणि विहिरीला जाणारा रस्ता धरला. वाहिरी जवळ पाच सहा बायका आधी पासूनच पाणी भरत होत्या. रोज तीन चार घागरी घेऊन येणारी ती आज एकच घागर घेऊन कशी आली याच आश्चर्य करत कास्तुराने तिला विचारले, “आज एकच घागर ? सकाळी लवकर उठून पाणी भरल व्हत का ” ती विहिरीत पाहत म्हणाली.

फटकळपणा आणि फटकारणं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 15/06/2015 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
"दुसर्‍याला चांगलंच फटकारायला मिळाल्याची एखाद्याला संधी मिळाली की त्याला मात्र बरंच समाधान वाटत असतं. हे असं का?" मी प्रो.देसायाना विचारलं. आता खरंच गरम व्हायला लागलं आहे. पण एक बरं आहे की बाहेर पडल्यावर सावलीत मात्र खूप थंड वाटतं. तळ्यावरचा हा आमचा बसायचा बाक एका गुलमोहरच्या झाडाखाली ठेवला आहे. मला तांबड्या गुलमोहरचं झाड आवडतं.ती तांबडी फुलं झाडाला खूप शोभा आणतात. आज प्रो.देसाई माझ्या अगोदरच तळ्यावर येऊन आमच्या रोजच्या बाकावर माझी वाट बघत बसले होते. त्यांच्या हातात एक पुस्तक होतं.माझी खात्री होती की स्वतः वाचून झाल्यावर ते पुस्तक ते मला वाचायला देतात.

द स्केअरक्रो - भाग २

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 14/06/2015 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २. मूळ लेखक - मायकेल काॅनोली क्रेमरच्या केबिनमधून मी बाहेर पडलो तेव्हा पूर्ण न्यूजरुमचे डोळे माझ्यावर खिळलेले होते. शुक्रवारचा दिवस म्हणजे बांबू मिळण्याचा दिवस. प्रत्येकाला केबिनमध्ये मला का बोलावलंय ते माहीत होतं. प्रत्येकाचा जीव भांड्यात पडला असणार - कारण त्यांच्यावर ही पाळी आली नव्हती. पण ही एक भीती होतीच की पुढच्या शुक्रवारी कदाचित त्यांच्यावरही अशीच वेळ येऊ शकेल. कुणाकडेही न बघता मी माझ्या जागेवर येऊन बसलो. मला थोड्या वेळासाठी तरी इतरांच्या नजरा चुकवायच्या होत्या. ताबडतोब माझा फोन वाजला. काॅलर आयडीवर मी माझा मित्र आणि सहकारी लॅरी बर्नार्डचं नाव वाचलं.