Skip to main content

कथा

शतशब्द कथा - सुट्टी

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 16/07/2015 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
“अगं, मांढरे बाई आजपासून एक आठवड्याच्या सुट्टीवर आहेत. तुही येणार नाही असे चक्क फोनवर सांगतेस. प्ले स्कूलमध्ये लहान मुले आहेत. त्याना कोण सांभाळणार?” “बाई, आई आजारी आहे, तिचे मलाच बघावे लागते. तिला अंथरुणातून बाहेर तर पडूदे. तीन चार दिवस तर मी हलुच शकणार नाही. कर्मचाऱ्यांच्या रोजच्या नाटकांनी इरावती वैतागली होती. तिने नुकतेच काढलेले प्ले स्कूल. कशीबशी मुले यायला लागलेली. त्यांच्याकडे निट लक्ष पुरविले नाही तर मोठा घोळ! काय करायचे? आठवडा तरी ढकलायला हवा. इरावतीने भराभरा पालकांना फोन केले. “आय एम सॉरी, पण उद्यापासून आठ दिवस मुलांना शाळेत पाठवू नका प्लीज. एका मुलाला चिकुन गुन्या झालेला आहे.

जेनेसिस (शतशब्दकथा)

लेखक सटक यांनी गुरुवार, 16/07/2015 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
तो अगदी दमून गेला होता!! त्याने सस्तन, कीट, सरिस्रुप, मत्स्य, उभयचर, पक्षी ह्या सगळ्यांचे जीन्स वापरून काहीतरी बनवले होते. उत्सुकता म्हणून त्याने बायो-इलेक्ट्रिसिटि चालू केली. अत्यंत बेंगरुळ असा तो जीव तसा बरा दिसत होता. त्यांच्या नियमांनुसार प्रत्येक संरचनेला एक "किल स्विच" लावणे आवश्यक होते.

नवीन दोस्त

लेखक तुडतुडी यांनी बुधवार, 15/07/2015 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
लहानगा चिंटू खूप खुष होता . किती दिवसांनी त्याला नवीन दोस्त मिळाला होता . आजीलाही ह्या पोराला खेळायला कोणी मिळालं म्हणून बरं वाटलं . नाहीतर किती दिवस नुसत्या त्याच त्याच गोष्टी सांगून त्याला रमवणार. पण गोष्टी त्याच त्याच असल्या तरी आजीची सांगण्याची हातोटीच अशी होती कि चिंटूला त्या पुन्हा पुन्हा ऐकायला आवडत. चिंटू झोपायला त्रास देवू लागला कि मात्र आजी स्वताच्या मनानेच काहीतरी नवीन गोष्ट तयार करून त्याला ऐकवी .गोष्ट सांगितल्यावर मुकाट झोपण्याच्या अटीवर . चव्हाण कुटुंब त्या घरात राहायला आलं . घर बैठ्या पद्धतीच होतं . आजूबाजूची घरंही बैठीच . मिस्टर आणि मिसेस चव्हाण खुश होते .

मालती (शतशब्दकथा)

लेखक सटक यांनी बुधवार, 15/07/2015 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच वयात येऊ लागलेली मालती तिच्या स्वप्नाळू मुग्धपणामुळे राजकुमाराची लाडकी! सहिष्णु महाराजांनी मालतीला नेहमीच राजघराण्याच्या तोलामोलाचे सगळे मिळेल असे पाहिले होते. मालती होतीही गुणी. शिकवलेले सगळे लीलया आत्मसात करायची. मग ती घोडदौड असो, तीरंदाजी, तलवारबाजी, न्रुत्य किंवा काव्यशास्त्र.... महाराजंवर झालेल्या धक्कादायक हल्ल्यानंतर सगळा राजवसा कोलमडल्यासारखा झाला होता. राजकुमाराच्या कोवळ्या खांद्यावर मोठीच जबाबदारी येऊन पडली होती. अश्या या वातावरणात त्यांचे कोवळे, तारुण्यसुलभ प्रेम फुलत होते. शेवटी ती आली.

लिव बामणां लिव

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 14/07/2015 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मावसभावाच्या, कोकणात,आंब्यांच्या बागा आहेत.देवगडहून हापूस आंब्यांची कलमं आणून त्याने आपल्या बागेत रुजवली होती.आता त्या झाडांना भरपूर आंबे लागतात.जर मी कोकणात त्या मोसमात गेलो नाही तर तो मला एक आंब्याची पेटी मुंबईला पाठवून देतो. ह्या देवगड आंब्यांची खासियत आहे.मध्यम आकाराच्या ह्या आंब्याला तो चांगला पिकला आणि खाण्यालायक झाला हे त्याच्या सालीला सुरकत्या आल्या की समजावं.वास तर भरपूर येतो.हा आंबा छोट्या चाकूने कापायला मजा येते.सालीच्या आतमधे सगळाच गर असतो.आतला बाठा एकदम लहान असतो.एक शीर कापून गर तोंडात टाकल्यावर त्याची चव एव्हडी मधूर असते की,ठेवणीतला मध चमच्याने बाटलीतून काढून जीभेवर सोडल्

कांदे-पोहे.

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 13/07/2015 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील कुठ्ल्याही शहरातील उपहार गृहात गेला, तर महाराष्ट्रीयन कोणताही पदार्थ कमी प्रमाणात मिळेल.त्या मानाने उत्तरे कडून आलेले सामोसे,छोले भटोरे,कचोरी किंव्हा दक्षिणे कडील इडली,डोसा,उताप्पा वगैरे हे पदार्थ सहज उपलब्ध होतील. थोडक्यात आटके पार झेंडा लावलेल्या, महाराष्ट्रातील पराक्रमी पुरुषांची अनेक किस्से, आपणाला नावा सहित सांगता येतील, मात्र महाराष्ट्राचे इतर वेळी खाण्याचे स्पेशल पदार्थ म्हणावे तितके सांगता येणार नाहीत कींव्हा सहज उपलब्ध होणार नाहित.इतर वेळी खाण्यासाठी आसणारे महाराष्ट्रीयन पदार्थ फ़ारच कमी आहेत क़िव्हा काळाच्या ओघात ते आपण सोडून दिले असणार .

द स्केअरक्रो - भाग ‍१०

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 12/07/2015 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग ९ द स्केअरक्रो भाग १० (मूळ लेखक मायकेल कॉनेली) बुधवारी सकाळी नऊ वाजता मी स्किफिनो अँड असोसिएट्सच्या ऑफिसबाहेर उभा होतो. ऑफिसचा दरवाजा बंद होता. लास वेगासच्या जवळ असलेल्या चार्ल्स्टन नावाच्या छोट्या उपनगरात ही चार मजली इमारत होती. मी आत्ताच मानसिकदृष्ट्या थकलो होतो. इथे कुठेही साधी बसायलाही जागा नव्हती. जे शहर नशीब उजळण्याशी इतकं निगडीत आहे, तिथे मला मात्र मी कमनशिबी असल्याचा अनुभव येत होता. दिवसाची सुरुवात तर चांगली झाली होती.

मुल्यांकन (?) : (शतशब्दकथा)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 12/07/2015 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा पेर्णास्त्रोतः ही प्रतिक्रिया हे गंमत म्हणुन लिहिलेलं आहे तस्मात हलकं घेणे हे.वे.सां.न.ल. आक्रमक प्रतिक्रियांसाठीचा ड्रॉपबॉक्स पौड फाट्यावर ठेवलेला आहे. तस्मात :)!! विद्यापीठामधल्या परिक्षा विभागाचा पेपरतपासणीविभाग प्रचंड गडबडीमधे दिसत होता. परिक्षा होउन दोन महिने गेलेले होते. त्यामुळे "निकाल" लावायचं काम जोमानं चालु होतं. सकाळीचं नवा फ्रिज घेण्यावरुन बायकोशी भांडण झालेले प्राध्यापक सोनटक्के घुश्शातचं मेकॅनिक्सचे पेपर तपासत होते.

द स्केअरक्रो - भाग ‍९

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 11/07/2015 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग ८ द स्केअरक्रो भाग ९ (मूळ लेखक मायकेल कॉनेली ) कार्व्हर पूर्ण दिवसभर कामात होता. सेंट लुईसमधल्या मर्सर अँड गिसाल लाॅ फर्मचं काँट्रॅक्ट अपेक्षेप्रमाणे मॅकगिनिसला मिळालं होतं. त्यांच्याकडे असलेली पूर्ण माहिती कार्व्हरला त्याच्या सिस्टिमवर आणायची होती. त्याच कामाने त्याचा पूर्ण दिवस व्यापला होता. त्याच्या नेहमीच्या राऊंडस् मारायलाही त्याला वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे एका डिजिटल पिंज-यात काहीतरी अडकलंय हे पाहिल्यावर छातीतून एक चमक गेल्यासारखं त्याला वाटलं.

पापणी

लेखक रातराणी यांनी शनिवार, 11/07/2015 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळधरन पापणी फडफडत हुती. कितीवेळा गळ्यातली साखळी पापणीला लावून म्हणलं, "जे काय हुनार आसल ग्वाड हूदे." कावळाबी नेमका कोकलत हुता. बूटीतन भाकरीचा टुकड़ा आणून त्याला टाकला, कुणाला ठाव तो येणार म्हुन तर नसलं आला सांगायला. दोन महिने झाले जाऊन त्याला. मागच्या टायमाला आंद्याच्या लग्नात आला हुता. औंधाच्या मुलीच वर्हाड आलंवत. लगीनभर नुसता माग पुढं करीत होता. वरातीत मागच्या माग पाण्याच्या टाकी आड नेलं हुत. हातात हात घेऊन म्हणला हुता, "आता लांब शहरात जाणार हाय. कामधंदा करून चार पैक जोडून हात तुझा मागणार हाय. राजाची राणी म्हुन नेणारे. येशील ना?