Skip to main content

कथा

शिक्षणाच्या नावानं चांगभलं !

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 29/05/2015 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणाच्या नावानं चांगभलं ! ( मध्यंतरी R. H. Reeves या शिक्षणतज्ञाची ‘The Animal School’ ही कथा वाचनात आली. तशा बऱ्यापैकी माहित असलेल्या या कथेचे मराठीकरण आणि डिटेलीकरण करून आपल्या समोर ठेवत आहे! लवकरच आपल्याही मुलांच्या शाळा सुरु होतील! हे औचित्य साधून आपणही निरीक्षणं, नोंदी आणि आत्मपरीक्षण करायला काय हरकत आहे?) आधुनिक जगातील आव्हानांना समर्थपणे भिडता यावे म्हणून जंगलात, प्राण्यांसाठी एक शाळा सुरु करायचे ठरले. शाळा म्हटले कि अभ्यासक्रम आला! त्यांनी मग परंपरेला छेद देत, विविध क्षमतांचा विकास करणारा क्षमताधिष्ठीत अभ्यासक्रम सुरु केला.

जनातलं, मनातलं.

लेखक द-बाहुबली यांनी शुक्रवार, 29/05/2015 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
तो... जगं जिंकायची इच्छा मनात होती तेंव्हा कधी स्वतःला गमावायची वेळ येउ शकते याची पुसटशी शंकाही त्यावेळी आली न्हवती. तो उन्मादच वेगळा होता. मनात येइल ते करु जाण्याचा. याच आत्मविश्वासापोटी तर त्याने अख्खे जग जिंकायचा अघोरी प्रयत्न सुरु केला होता. त्याच्या व्यक्तीमत्वावर, शौर्यावर, हुशारीवर, महत्वाकांक्षेवर भाळुन अनेकांनी त्याला नुसती साथच न्हवे तर त्याच्यासाठी प्रसंगी प्राणाची आहुतीही दिली होती. अजुनही कित्येक तयार होते त्याच्या एका शब्दावर सर्वस्व पणाला लावायला. स्वतःपेक्षा तत्व मोठे हा धडा तर त्यानेच सर्वांना शिकवला होता. त्याआधारेच आत्तापर्यंत त्यांची वाटचाल झालेली होती.

श्रीमंत: शतशब्दकथा

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 25/05/2015 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज अक्षयतृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक. त्यामुळे आज ते प्रसिद्ध दुकान लवकर उघडलेलं होतं. अगदी सकाळी सात वाजल्यापासुन लोकांनी दुकानामधे गर्दी करुन गोडा-धोडाचे पदार्थ खरेदी करायला सुरुवात केलेली होती. त्याची सरावलेली बोटं सराईतपणे नोटा आणि व्यवहार हाताळत होती. दुपारी दुकान बंद करायची वेळ झाली तसा त्याचा ५,१३,०००/- रुपयांचा हिशोब तयार होता. मालकाकडे पैसे आणि हिशोबाची यादी देउन तो दुकानातुन बाहेर पडला आणि घराकडे निघाला. वाटेत त्याला एका कुडमुड्या हलवायाचं दुकान लागलं आणि त्याला मुलांची आणि म्हातार्‍या आईची आठवण झाली.

वैनी........२ (अंतीम)

लेखक चुकलामाकला यांनी शुक्रवार, 22/05/2015 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
त्यानंतर मधून मधून संध्याकाळी परड्यात वैनी दिसू लागली . कधी विहिरीवर पाणी भरताना तर कधी झाडताना . ती दिसली की आम्ही मोठ्ठ्यानं गलका करू, "वैनी अंजीर , वैनी अंजीर ." ती बिचारी अंजीर ओच्यात वेचून घेऊन येई . आमचा अंजीरांचा खुराक पुन्हा सुरु झाला . काही दिवसात आमची आणि वैनीची गट्टी जमली. अलीकडे बळवंतराव लवकर घरी येई . मग तो आणि वैनी फिरायला बाहेर पडत. ती दोघं निघाली की इकडे सरूच्या तोंडाचा पट्टा चालू होई , " आता आइसक्रीम खातले , आमका नाय देवचे . परवा ह्यो गुळयाचे भजे घेऊन इल्लो . खोलीत जाऊन दोघा गुपचूप खाय होती . आमका एक पण देउक नाय , माका वास इलो.

वैनी ……… १

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 21/05/2015 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
. गावकरणीची पाणंद आता ओळखू येत नाही . दोन्ही बाजूच्या कडवीच्या झुडुपांची गच्च कमान जाऊन तिथं चिरेबंदी भिंत झाली . चिंचेचं झाड आणि मैदानाच्या जागी श्री रामेश्वर कॉम्प्लेक्स उभं राहिलं . पाणंदीच नावही बदललं .आता तिला श्री रामेश्वर गल्ली म्हणतात. गावाचं शहर होताना झालेल्या असंख्य बदलातील हा एक . . जुन्या घरांच्या बिल्डिंगी झाल्या . गावातील सागरगोटे, सावरी , बकुल , रायवळ, चिंच अशी निरुपयोगी झाडं तोडून तिथं नारळ, आंबा आणि काजूची खणखणीत पैसा देणारी झाडं आली . जमिनीच्या किमती आकाशाला भिडल्या . घरोघरी कोर्ट केसेस चालू झाल्या .

दाग अच्छे है

लेखक आकाश खोत यांनी गुरुवार, 21/05/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
मी गोरेगावच्या एका आयटी कंपनीत काम करतो. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हब मॉलच्या बाजुलाच आमचं ऑफिस आहे. त्यादिवशी आमची एक महत्वाची रिलीज होती. ह्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला वेगवेगळ्या कारणांनी बऱ्याच अडचणी आल्या. त्यावर मात करत आम्ही अगदी वेळेत काम संपवलं होतं. आज टेस्टिंगचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी उशिर होणार याचा अंदाज होताच. पण पुन्हा आम्हाला नेटवर्क, डेटाबेस अश्या तांत्रिक आणि प्रोजेक्ट मधल्याही काही अडचणी आल्या. त्या दिवशी कोणीही रिलीज संपल्याशिवाय जायचं नाही असं ठरलेलं होतंच. पण अपेक्षेपेक्षा जास्तच उशीर झाला. ते काम दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चाललं.

एक अविस्मरणीय क्षण

लेखक परी१२३४५ यांनी गुरुवार, 21/05/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट आहे साधारणपणे ४ - ५ वर्षांपूर्वीची. त्यावेळी मी १२ वी मध्ये होते. नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र धामधूम चालली होती. माझ्या घरापासून काही अंतरावर एक नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. तिथेही दरवर्षी नवीन वर्षाच स्वागत खूप धुमधडाक्यात होत असत. त्या शैक्षणिक संस्थेची नववर्षाच्या स्वागताची एक आगळीवेगळी पद्धत आहे आणि ती म्हणजे २९,३०,३१ डिसेंबर या तीन रात्री तिथे गाजलेल्या व नावाजलेल्या कलाकारांना, मान्यवरांना निमंत्रित केले जाते. आणि एरवी फक्त टी.व्ही. वर दिसणारी त्यांची कला प्रत्यक्षात पहावयास मिळते. त्या वर्षीही असच संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकाराना बोलावण्यात आलेले होत.

सुंदरीचे ओझे

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 20/05/2015 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
तान्झेन आणि इकीदो पायी प्रवास करीत होते. नुकताच मुसळधार पाउस पडून गेला होता. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी येतच होत्या. चालता चालता ते एका खेडेगावापाशी पोहचले. तिथे एक अरुंद ओढा होता. त्यातून चिखलाचे पाणी वहात होते. हे दोघे तिथे जरा थांबले. तेवढ्यात, तिथे एक कमनीय बांध्याची, कोमल तनुची, तरुण, जपानी रमणी आली. पावसाने स्वच्छ झालेल्या हवेत तिचे मुखकमल अधिकच प्रसन्न दिसत होते. ती आपला फुलाफुलांचा रेशमी किमोनो सावरत ओढ्यापाशी थांबली. परंतु त्या बिचारीला, प्रयत्न करूनही तो ओढ काही ओलांडता येईना. तिची ती अवस्था पाहून, तान्झेन पुढे झाला.

पुस्तकातील चित्रे

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 17/05/2015 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी बहुतेकांना बालपणी 'चांदोबा' तील चित्रांनी नक्कीच मोहवले असेल. खरोखर मासिके - पुस्तकातल्या कथांना अनुरूप अशी चित्रे बनवणे खूपच आव्हानात्मक काम असते, आणि अशी उत्तम चित्रे बनवण्यासाठी अत्युच्च दर्जाची प्रतिभा लागते. या लेखमालेद्वारे काही प्रतिभावान चित्रकारांनी पुस्तकांसाठी बनवलेली चित्रे इथे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हेन्री जस्टिस फोर्ड Henry Justice Ford (1860–1941) हे ब्रिटिश चित्रकार सुमारे 1880 आणि 1890 च्या दशकात खूपच प्रसिद्ध होते. यांची काही चित्र: १.

फ्रॅन्झ काफ्का....आदरांजली-१ : निवाडा....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 15/05/2015 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire फ्रॅन्झ काफ्का..... ३ जुन १९२४ रोजी फ्रॅन्झ काफ्काचा त्या काळातील असाध्य रोगाने म्हणजे टी.बीने मृत्यु झाला. अजून एका महिन्याने त्याचा ४१वा वाढदिवस साजरा झाला असता. त्याच्या मृत्युनंतर सापडलेल्या अनेक चिठ्याचपाट्यात त्याने त्याच्या जिवलग मित्राला, मॅक्स ब्रॉडला लिहिलेली पत्रे सापडली.