घड्याळाने चारचे ठोके वाजवले. ती तिच्या शनिवारच्या कामात गुंग. अचानक शेजारच्या खिडकीतून लता दीदींच "मालवुन टाक दीप …" कानावर पडलं … अन … ती थबकली … थोडीशी बिथरली … झर झर लग्नाची नुकतीच पूर्ण झालेली पाच वर्ष डोळ्यांसमोरून गेली. गेल्या पाच वर्षात तिने हे गाणं ऐकलंच नव्हतं. लग्ना नंतरचे सुरुवातीचे दिवस आठवले. तो तर कामात इतका गुंग कि आठवणींना ही वेळ नाही. आजही सुट्टीचा दिवस. दुपारी उठल्या पासून मुलगा शेजारी खेळायला गेलेला. वास्तविक एकांत भरपूर. पण कुठेतरी कशाची तरी कमी होती. साडे तीन वाजे पासून T .V. समोर News Channels सुरु. बायको सोबत दुपारचं जेवण झालं. पण गप्पा नेहमीच्याच. इकडचं तिकडच नातेवाईक ,खर्च , मुलाची शाळा आणि बरच काही. म्हणजे संसार छान चालला नव्हता असं नाही. ती दोघं म्हणजे आता तिघं सोबत बाहेर निघायची, फिरून यायची. दोन महिन्यातून एखादा movie, थोडीफार shopping तर व्हायचीच तर व्हायचाच. पण कुठेतरी संसाराच्या गराड्यात प्रेम हरवत चाललं होतं.
आणि त्या गाण्याने तिच्या अंगावर शहारे आणले. संध्याकाळच्या नुकत्याच पडून गेलेल्या पावसानंतरच्या गारव्याने त्यात भर घातली. तिला क्षणात जाऊन त्याला मिठी मारावीशी वाटली. पण तो मात्र बातम्या ऐकण्यात गुंग.
तिला वाटलेलं त्यालाही वाटावं म्हणून तिने कपाटातून त्याचा laptop काढला. त्यातला तिने बनवलेला separate drive उघडला आणि तिच्या आवडत्या मराठी गाण्यांच्या folder वर click केलं. आणि गाणं सुरु झालं…. आवाज वाढत गेला. ओळखीचं संगीत कानावर आल्यासारखं वाटताच त्याने T. V. चा आवाज कमी केला आणि आवाज दिला … "रमा…. अगं कुठे लागलंय हे गाणं??"
रमा एव्हाना गाण्याच्या सुरुवातीतच दंग झालेली. शेवटी उत्तराची प्रतीक्षा न करता तो सोफ्यातून उठला आणि आवाजाच्या दिशेने चालू लागला.
तशी बेडरूम मधून ओ देण्यासाठी लगबगीत उठलेल्या रमासोबत त्याची गाठ पडली. तो म्हटला "इतके दिवस लपवून ठेवलं होतंस हे गाणं …… तुला आठवतंय ना आपल्या हनीमूनच्या पहिल्या दिवशी…. " तिने खट्याळ हसत त्याच्या ओठांवर हात ठेवत त्याला थांबवलं…. आणि दरवाज्याचा आवाज झाला …
एव्हाना गाणं …. "गार गार या हवेत…. घेउनी मला कवेत …… " पर्यंत आलं होतं ……
वाचने
5425
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वाह! मस्त :) भावना थेट
+१
In reply to व्वाह! मस्त :) भावना थेट by क्रेझी
धन्यवाद
In reply to व्वाह! मस्त :) भावना थेट by क्रेझी
ध्न्यवाद
In reply to व्वाह! मस्त :) भावना थेट by क्रेझी
सहिच
चांगलंय आवडलं...
सुंदर !
सुंदर
धन्यवाद
In reply to सुंदर by सुमीत
धन्यवाद सगळ्यांना !!!!
तुम्ही फारच छान लिहीता आहात.
In reply to धन्यवाद सगळ्यांना !!!! by अपरिचित मी
मस्तच!
खुपच सुन्दर !
सहज आणि
मस्तच फार छान
फारच छान...
मस्तच
छान लिहिलंय.
एक नंबर!!
भारी!! गोडुल लिहिलं आहे!
+१
In reply to भारी!! गोडुल लिहिलं आहे! by रातराणी
पहिलाच लेख असून पण छान जमला आहे...
अतिशय सहज सरळ पण मोहक मांडणी.
अतिशय सहज सरळ पण मोहक मांडणी.
छान आहे..
वा...!! नेमकं....!!!
सहज साधं सोपं . . . . . .
मस्तच!
धन्यवाद सगळ्यांना !!!!