Skip to main content

कथा

द स्केअरक्रो भाग १

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 13/06/2015 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १ (मूळ लेखक - मायकेल काॅनोली ) कार्व्हर कंट्रोल रूममध्ये येरझा-या घालत होता. सगळे डेटा टाॅवर्स त्याच्यासमोर नीटपणे एका ओळीत उभे होते. त्यांचं काम अगदी शांतपणे आणि वेगाने चालू होतं. त्यांच्याविषयी सगळं माहित असूनही कार्व्हरच्या मनात एक प्रकारची भारावून गेल्याची भावना आली. त्याच्यासमोर माहितीचा ओघ नव्हे तर धबधबा वाहत होता आणि तोही दर दिवशी. त्याच्यासमोर असलेल्या या पोलादी टाॅवर्समधला प्रत्येक टाॅवर म्हणजे माहितीचा खजिना होता. त्याने तापमान दाखवणा-या स्क्रीनकडे एक नजर टाकली. सगळं काही अपेक्षेप्रमाणे आणि व्यवस्थित चाललं होतं.

अतुलची “शॉर्ट” स्टोरी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 13/06/2015 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
“अतुल ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानात क्रिकेट खेळत असायचा त्यावेळी तो त्याला बुटका म्हणून चिडवणार्‍यांना चांगलाच जबाब द्यायचा” मला आठवतं,”मी नथुराम गोडसे बोलतोय” ह्या नाटकाला त्यादिवशी गेलो होतो.नाटकाच्या मधल्या सुट्टीत चहा पिण्यासाठी आणि पाय मोकळे करण्यासाठी बाहेर आलो होतो.चहाच्या कौन्टर जवळ एक व्यक्ती तिचा चहाचा कप आपल्या जवळ ओढून घेण्याची धडपड करीत होती.मी तिला मदत केल्यावर मला “थॅन्कस” म्हणून माझ्याशी हसली. “तू अतुल शिंदे नारे?” मी त्या व्यक्तीला विचारलं. “होय” असं म्हणून अतुल परत माझ्याशी हसला. “मी तुम्हाला ओळखलं” असं मला म्हणाला. “ते कसं?” मी त्याला विचारलं. “तुम्ही माझ्याशी हसला त्यावेळी

ये दोस्ती ......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 09/06/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........

रॅंपेज

लेखक आकाश खोत यांनी सोमवार, 08/06/2015 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
"साहेब.. ते माझा रूट बदलायचं बघा की.. किती दिवसांपासून मागे लागलोय तुमच्या. माझी झोप होईना झाली नीट. आता मुलीचं लग्न ठरलंय. लय कामं लागणार माझ्यामागं आता. काहीच सुधरत नाय सध्या.. करा की एवढं काम." निरकर त्यांच्या कदमसाहेबांना विनवत होता. कदम वैतागले होते. "बघू म्हटलं नाय का रे तुला.. कशाला माझ्यामागे भुणभुण लावतोय. आता याद्या निघतिल काही दिवसात तेव्हा बघू ना." "अहो साहेब याद्या आलरेडी ठरल्यात म्हणून कानावर आलं माझ्या. ज्याला हवं ते करून घेतलय सगळ्यांनी. मग माझं पण काम करा ना त्यात." "कोणी सांगितलं तुला?.. अजुन मलासुद्धा माहीत नाही यादीत कोण आहे कोण नाही..

तटबंदी

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 08/06/2015 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
पुढे त्यांच्या कामाला निघालेल्या बाबांनी चिन्मयला त्याच्या कंपनीच्या गेटपाशी सोडलं. आज सकाळीच त्याची गाडी दोन दिवसांसाठी सर्व्हिसिंगला दिलेली असल्याने त्याने बाबांना राईड मागितली होती. "संध्याकाळी किती वाजता pick up करू?" बाबांनी विचारलं. "सव्वा सहापर्यंत आलात तरी चालेल" "मग असं करतो, आईला बिग बझार मध्ये जायचंय, मी घरी जाऊन तिला घेऊन साडेसहा पर्यंत इथे येतो, आपण तिघेही मग पुढे जाऊयात, चालेल तुला?" "हो, चालेल." म्हणत चिन्मय उतरला.

कडेलोट........

लेखक एक एकटा एकटाच यांनी शुक्रवार, 05/06/2015 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
"हेलो....... हेड कॉन्सेटेबल जाधव बोलतोय चारकोप पोलीस स्टेशन" "......... " "कधी??????" "............." "तुम्ही कोण बोलताय?" "............." " ठीक आहे तिथेच थांबा, आम्ही पोहचेपर्यंत कुणालाही बॉडीला हात लावू देऊ नका. आणि हो तुम्हीसुद्धा लांब उभे रहा" "बिल्डिंगचे नाव काय???" "................" "ठीक आहे पोहचतो पंधरा मिनिटात" एव्हढ बोलून जाधवांनी धाडकन फोन आपटला. "भोXXच्यांना रात्री दिड वाजता सुसाईड करायची काय हुक्की येते. काय माहित?? चला चव्हाण गाडी काढा. सगळ्यांना सांगा तयार व्हायला.

निकाल (शतशब्दकथा )

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 04/06/2015 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज धाव्वीचा निकाल लागला. श्यात्तर टक्के पडले. आबांनी पेडे वाटले . मला बरं वाटलं, निकालात नाव बरोबर छापलंय म्हणून ! ''स्मिता गजानन यादव'' दादाच्या पाठीवर मी झाली त्यवाबी आज्जीला पोरगाच पायजेल व्हता . पन मी झाली. माजीच चूक जनु ! आज्जी रडली. माज्यावरच चिडली. म्या तिला फशिवलं म्हनं . नाव ठ्येवलं फशीबाई ! समद्या पोरी हासायच्या शाळंत. * * * धाव्वी सुरु झाली, तशी गेली हेडसरांकडं ! म्हनलं, ''सर नाव बदलायचंय माजं - पन घरला सांगायचं नाय ! धाव्वीच्या निकालावर स्मिता नाव यायला पायजेल'' . मास्तर द्येवमानुस. त्येनला पटलं - बदलूया म्हणालं ! लगीच कुटंकुटं फोन क्येले आन अर्जावर सही घ्येतली.

हाक

लेखक कहर यांनी गुरुवार, 04/06/2015 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
"आजच नेमके साहेबाला काम आठवले" सदा स्वत:शीच बोलत होता. "एक तर आज अमावास्या, त्यातच तो रोजचा रोड पालिकेने सकाळी खोदून ठेवलेला म्हणजे त्या आडवाटेने कच्च्या रस्त्याने स्मशानावरुन फिरून जावे लागणार म्हणून लवकर निघावे म्हणले तर ११ वाजवले xxxने" साहेबाला शिव्या घालीत गडबडीत सायकल ताणत असलेल्या सदाची तंद्री पत्र्याच्या खडखडाटाने मोडली. पॅडल फिरेना म्हणून त्याने उतरून पाहिले. सायकलची चेन निसटलेली. आता सायकलच्या नावाने अजून दोन शिव्या तोंडातून बाहेर पडल्या. सदाने आजूबाजूला पाहिले. चिटपाखरुहि नव्हते. मागे पडलेला आणि पुढे असलेला दिव्याचा खांब दोन्ही मेणबत्ती एवढे दिसत होते.

संगम

लेखक रातराणी यांनी बुधवार, 03/06/2015 05:42 या दिवशी प्रकाशित केले.
डबा बाट्लीये… अशाच एका उन्हाळ्याच्या दुपारी भंगार वालीची हाक आली आणि काम आवरून नुकतच पडलेली आई निशुला म्हणाली, "निशू बेटा जरा सांग ग त्यांना थांबायला." लोळत पडलेली निशू जराशी कुरकुरतच उठली आणि तिने खिडकीतून त्या भंगारवालीला बोलावलं, "ओ आईने बोलावलंय तुम्हाला." "अग निशू मागच्या दारीच आण ग त्यांना, खूप साठवलेत म्हणाव त्यांना डबे , इकडेच आल्या तर त्यांना सोप पडेल वजन करून भरायला.उन तापलय चांगलच." तोपर्यंत त्या बाई घराजवळ आल्या होत्या, निशूने गेट उघडून त्यांना आत घेतलं आणि मागच्या दारी घेऊन आली. तोपर्यंत आईने साठवलेले पत्र्याचे डबे आणि बरच काय काय बाहेर काढल.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.