धुंदी कळ्यांना! भाग-३
पुढे..
"मित्रांनो, आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. माझ्या मैत्रिणीची. हो ती परत आलिये. आणि खरं सांगू माझ्यासाठी नाही आलिये ती परत. ती परत आलिये तिच्याचसाठी. आश्चर्य वाटलं ना? ती जर तिच्यासाठी परत आलिये तर मी तुम्हाला तिची गोष्ट सांगून का बोर करतोय? कारण ती जेवढी तिची गोष्ट आहे तेवढीच माझीही. वेडा म्हणाल मला खुशाल म्हणा,पण कुणासाठी वेड होण्यात जी मजा आहे, ती स्वतःसाठी शहाणे होण्यात नाहीये.
मिसळपाव