Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: मृगजळ

लेखक अविनाश लोंढे. यांनी सोमवार, 30/01/2017 या दिवशी प्रकाशित केले.
aa ‘राणी……! ' तिने फक्त आपल्या ओल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहिलं . ‘मला ना तुझ्या पायाचे हे ठसे बुजवायचे नाहीत! 'ये ना यार’ 'हो, येते! अन ती त्याच्या पायाच्या ठश्यावर पाय देत चालू लागली . तिच्या पायांना जणू स्वर्गसुख लाभत होत , तिला त्याच्या पायाचे ठसे तोडायचे नव्हते ! अन ती शेवटी त्याच्याजवळ पोहोचली . ‘बघ, जात वेगळी असली तरी आपण असंच एकत्र राहू - अन तिच्या डोळ्यात एक हसू उमललं! क्षणातच , त्यांच्या पायाला मोठ्या लाटेचा झटका बसला ! तिने घाबरून मागे बघितले . त्यांच्या एकजीव पायांचे ठसे लाटेने वाहून नेले ! दोघांनी एकमेकांकडे पहिले अन दोघांचेही डोळे पाझरु लागले !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2537
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

+१