लेटराचं लव्ह
प्रिय......
आजपर्यंत तुझ्यावर भरपूर लिहलयं..... पण आज फक्त तुझ्यासाठी लिहतो आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात एक अस वळण येतं जेव्हा माणूस सारी शुद्ध हरवून, दुनियेचं भान विसरून प्रेमात पडतो, तसच माझ्याही आयुष्यातील एका वळणावर एका सुंदर क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो. तुझ्या प्रत्येक कृतीन मनाला वेडचं लावलं आणि माझ्या जिवनातील सारे क्षण सुवर्णमय होउन गेले.तुला फक्त एकदा पाहता यावं म्हणून तासन् - तास तुझी वाट पाहत त्या निर्जिव बसस्टॉपवर घालवलेत. वेडेपणाच्या कित्येक हद्दी मी या प्रेमात ओलांडल्या...मला माझं जग तुझ्यात दिसू लागलं .
मिसळपाव