Skip to main content

ज्योतिष

वैशाख शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 29/04/2008 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, वैशाख शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश असे आहेत:- १)रवि - दिनांक १४/०५/२००८ रोजी दुपारी ०३ वाजून ३३ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करतो आहे. २) शुक्र- दिनांक २०/०५/२००८ रोजी सकाळी ०६ वाजून ४४ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करतो आहे. वरील राशीप्रवेशाच्या वेळा या मुंबई अक्षांश-रेखांशानुसार आहेत. आपला, (गणकभास्कर) धोंडोपंत

शनी - समज गैरसमज

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 29/04/2008 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
शनीग्रहाबद्दलच्या या लेखमालेत या लेखात सप्तमातल्या शनीबद्दल लिहिण्याचा मानस आहे. पंचमातील शनी आणि संततीसौख्य याबद्दल पूर्वी एका लेखात सविस्तर लिहिलेले आहे. जिज्ञासूंना तो लेख आमच्या ब्लॉगावरील Blog Archieves मध्ये सापडेल. शनी संततीसौख्यावर काय परिणाम करतो हे तेथे समजेल. या लेखात मानवी जीवनातील अत्यंत महत्वाच्या म्हणजे विवाहसौख्याच्या बाबतीत शनी काय फले देतो हा विषय आहे. सप्तमस्थान हे विवाहाचे स्थान आहे.