Skip to main content

जीवनमान

शिक्रेट (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 27/10/2016 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
म्हराटी शाळंची घंटी वाजली. . . . मजी येक वाजला! लगी म्या भांडं घिउन काकुंच्या घरला जाते. ''काकू जरा मुरवण देता का?'' ''बस बाळा दोन मिन्ट, होतंय.'' काकू. मलाबी बरं वाटतं जरा- रेडिवो आयकायला भेटतो. लई छान मराठी गाणी लावत्यात काकू. काकू चांगल्या हायत. रोज मुर्वान मागितलं तरी नाय म्हणीत नैत. पन तेंची तायडी?. ती घरात नसल्यालीच बरी. नायतर मग चवकशा सुरूच- ''सुमी रोज कशाला येती?'' ''आन मुरवान यवड्या मोट्ट्या भांड्यात कशाला?'' उरलं तर काकू कालवनच देत्यात. मग काय दिपवाळीच! मुरवान मिळलं तर चटनी टाकून म्या, पिंटी आन नकुशी- भाकरीला खातो- दिवस निगतो.

द कॅमब्रियन पट्रोल

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी रविवार, 23/10/2016 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
जगातल्या सर्वोत्तम आर्मी सर्वोत्तम कश्या ठरतात ? त्यांना पहिली किंवा दुसरी जागा कशी दिली जाते, कुठल्या क्षेत्रात दिली जाते? हे मानांकन कसे ठरते, ह्या संबंधी आपल्याला खूप कुतूहल असते, कारण कोण्या एकाला सर्वोत्तम म्हणावे तर त्याची दुसऱ्या सोबत झोंबी व्हायला हवी, आर्मीच्या बाबतीत अशी झोंबी म्हणजे युद्ध, ते पैसा मानवी जीवन अन वेळ तीनही मोर्चांवर खर्चिक अन भयप्रद असते, मग एखादी फौज सर्वोत्तम आहे हे कसे ठरवतात ? ह्याला उत्तर म्हणजे ते ठरवायला आजकाल आयोजित केले जाणारे संयुक्त अभ्यास, तसे पाहता आपापले मित्रदेश पकडून आजकाल प्रत्येकच देश संयुक्त अभ्यास करतो, मग परत जागतिक नामांकनांची पंचाईत होऊ शकते.

कामाची टाळाटाळ, उत्पादकता, व्यवस्थापन आणि कानबान

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 21/10/2016 06:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, डिस्क्लेमरः या लेखात बरेच मुद्दे आहेत ज्यावर एक एक कादंबरी होईल, पण थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला आहे. गोड मानून घ्यावा. प्रतिसादांमधे चर्चा/प्रश्न उत्तरे यातून आणखी उपयुक्त होईल अशी आशा. धन्यवाद. जशी आपण उत्तरोत्तर प्रगती करतो तसा कामांचा व्यापही वाढत जातो. वेळ आणि शरीरक्रियांवर आपला फारसा ताबा नसतो. मग या सर्वातून काही लोक कसे यशस्वी होतात किंवा ही तारेवरची कसरत फार त्रास न होता कशी संभाळतात?

अजय-अतुल लाईव्ह वगैरे...!

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 18/10/2016 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच अजिंठा महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी, अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गाणे सुरु असताना मधेच ट्रॅक बंद झाल्याने गाणे थांबले आणि ही जोडी फक्त ओठ हलवत गाण्याचा अभिनय करत असल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळाले. प्रेक्षकांना हा धक्का होताच, पण मोठ्ठ्या रकमेचे तिकीट घेऊन असे झाल्याने फसवणुकीची भावना झाली, आणि बरेच प्रेक्षक उठून गेले असे बातम्यांवरून समजते.

मुलगी आता इकड़चि झालेली आहे

लेखक वैभव.पुणे यांनी सोमवार, 17/10/2016 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
मुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच! लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम! नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल! नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण!

“मेरे प्रिय आत्मन् . . ."

लेखक मार्गी यांनी सोमवार, 17/10/2016 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच इथे ओशोंवर झालेली चर्चा वाचली. अनेकांनी मांडलेले विचार बघितले. छान वाटलं. त्यातून थोडी भर घालावीशी वाटली व म्हणून इथे लिहितोय. . . ओशो. . . . जुलै २०१२ च्या शेवटी ओशो आयुष्यात आले. . योगायोगाने पहिल्याच प्रवचनांमध्ये ध्यान सूत्र ही प्रवचन मालिका मिळाली. तिथून नंतर मग 'एस धम्मो सनंतनो', 'संभोग से समाधी तक', 'ताओ उपनिषद', 'अष्टावक्र महागीता', 'मै कहता आखं देखी' आणि इतर अनेक प्रवचन मालिका ऐकल्या. . . अजूनही रोज प्रवचन ऐकतोय. त्यातून इतकं काही मिळत गेलं आणि मिळतं आहे की, जुलै २०१२ पासून एक नवीनच जीवन सुरू झाल्यासारखं वाटतं. . . .

गुरबानी!

लेखक उल्का यांनी सोमवार, 17/10/2016 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज एका वेगळ्याच विषयावर लिहायचा मोह झाला आहे. आज सकाळीच मोबाइलवर गाणी ऐकताना अचानक माझी अत्यंत लाडकी गुरबानी ‘इक ओंकार सतनाम’ ऐकायला मिळाली आणि लिहावेसे वाटले. (गुरबानी हा शब्द ईकारान्ती असल्यामुळे मी स्त्रीलिंगी वापरत आहे.) मन अशांत असताना ही गुरबानी ऐकल्याचे असे खास आठवत नाही परंतु ही जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा मनाला अतिशय शांत, प्रसन्न वाटतं हे मान्य करायलाच हवं. मला वाटतं कोणत्याही श्लोक/मंत्र उच्चारात ते सामर्थ्य असतं. त्यातील लय आणि शांत रस याचे ते फलित असावे. आपले ‘मनाचे श्लोक’ किंवा ‘गायत्री मंत्र’ हे सुद्धा तितकेच प्रभावी आहेत.

छंदांतून अर्थार्जन अथवा आवडीचे व्यवसायात रूपांतर

लेखक तेजस आठवले यांनी रविवार, 16/10/2016 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, बऱ्याच जणांना काही छंद असतात, किंवा वैयक्तिक आवडीनिवडी असतात ज्याचे रूपांतर व्यवसायात केले जाऊ शकते अथवा केलेले असते. अशा लोकांच्या वाटचालीची माहिती मिळवण्यासाठी हा धागा काढतो आहे. मला वैयक्तिकरित्या अश्या लोकांचे कौतुक वाटते. आपल्या पैकी काही लोक जर असे व्यवसाय/ अर्थार्जन करत असतील तर जरूर माहिती द्यावी. अर्थार्जन हा मुख्य हेतू नसलेल्या पण कामाचे समाधान देण्याऱ्या व्यवसायाबद्दल पण माहिती आली तर उत्तमच ,प्रत्येक वेळेला पैसे हा घटक महत्वाचा असेलच असे नाही.

मनाचा एकांत - स्मरणाचा काटा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 14/10/2016 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता इथे इतके वाजलेत, म्हणजे आपल्या घरी आता तितके वाजले असतील..... तिथे आता हे हे असे असे घडत असेल आणि इथे हे हे असे असे ..............! स्मरणाचा एक तास काटा तिथे तर एक इथे! बाकी मन, सेकंद काटा होऊन सांधणाऱ्या प्रिय समुद्रासारखे टिकटिकत राहते दोन किनाऱ्यांमध्ये अष्टौप्रहर.............. . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -शिवकन्या