Skip to main content

जीवनमान

आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे पुस्तकाला पारितोषिक

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 05/12/2016 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अनुवादाला,
"आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे" ह्या
ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाला,
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे,
’लोकहितवादी रा.ब.गोपाळ हरी देशमुख’ पारितोषिक देण्याचे ठरले आहे.

इष्ट जनांस आमंत्रण आहेच.

शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 04/12/2016 22:27 या दिवशी प्रकाशित केले.

शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने

                 शरद जोशींच्या पश्चात शेतकरी चळवळीचे भवितव्य काय, असा प्रश्न माझ्यासहित अनेकांना सतावत आहे. शेतकरी चळवळ शरद जोशींनी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवली की ती उंची पार करण्याचा विचार राहू द्या; त्या उंचीच्या आसपास पोचण्याचीही नेतृत्वक्षमता कुणात नाही, ही वास्तविकता नजरेआड करता येत नाही.

मिपा फिटनेस विकांत

लेखक प्रशांत यांनी रविवार, 04/12/2016 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, एसरावांनी सुचवल्याप्रमाणे १० आणि ११ डिसेंबर हा मिपा फिटनेस वीकांत म्हणून जाहीर करत आहोत. यासाठी एकच करायचे. आपण आपल्याला शक्य असलेले सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, सूर्यनमस्कार अशा कोणत्याही व्यायामप्रकारापैकी कोणत्याही व्यायामप्रकाराचे एक लक्ष्य ठरवायचे आणि १० व ११ डिसेंबरला ते पार करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग..

आजकाल...

लेखक अभिजित कुमावत यांनी बुधवार, 30/11/2016 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठल्यावर आवराआवर ही सगळ्यांची नित्याची सवय. मग office, collage, शाळा, काम, इत्यादी गोष्टींसाठी धावणे सुरु होते. ह्या सगळ्या व्यापात दिवस कसा जातो हे काळतच नाही. थकुन भागुन घरी आल्यावर घरची कामे, कर्त्तव्य हयात वेळ जातो. मग तोपर्यंत रात्रीच्या जेवाणाची वेळ होते. उरला सुरला वेळ हा tv पाहण्यात जातो. मग तोपर्यंत उद्याची तयारी bag अवरुन ठेवणे, कपड़े इस्त्री करून ठेवणे, इत्यादि... तोपर्यंत झोपायाचि वेळ येतेच् मग काय झोपा. सकाळ झाली की परत तेच चालू... असे दिवसा मागे दिवस निघुन जातात. ह्या सगळ्यात आपण स्वतःसाठी जगायाच विसरुनच जातो. आजकाल स्वतःसाठी जगण सगळे विसरलेत बहुतेक.

मांसाहाराची लागलेली चटक कशी सोडवावी?????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी बुधवार, 30/11/2016 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी " दिसा माजी काहीतरी ते लिहावे,प्रसंगी अखंडीत वाचीत जावे" असे समर्थ रामदास स्वामींनी सांगुन ठेवले आहे .या उक्तीचा मी पाईक असल्याने रोज काहीतरी हितगुज आपल्याशी करावे असे वाटत राहाते.असो. तर आजचा विषय आहे नॉन व्हेज .आपल्या सर्वांचा आवडीचा विषय.उत्क्रांतीवादानुसार माणुस हा मिश्र आहारी आहे .तो शाकाहार आणि मांसाहार दोन्ही आवडीने करतो.त्याला मी कसा अपवाद असणार? जसे मला कळत आहे तेव्हापासुन मि मांसाहाराचा भोक्ता आहे.आम्ही भावंड लहान असताना आठवड्यातून एकदा आमच्या घरी मटण किंवा चिकन शिजायचे.लहाणपणी तिखट सहन होत नसल्याने मी अळणी खायचो.म्हणजे तिखट वजा.पण नळीसाठी मात्र माझा हट्ट असायचा.पुढे वडीलांन

मनाचा एकांत - सरोवरातील नाव

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 26/11/2016 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
['मनाचा एकांत' ही शृंखला इथे संपत आहे. सगळ्या कवितांना मनापासून दाद देणाऱ्या, त्यातल्या काहींचे विडंबन पाडणाऱ्या सर्व रसिकजनांचे दिल से आभार! :)] पहाडातला जख्ख दद्दू सरोवरात नाव सोडून पलीकडे निघून गेला तेव्हापासून, नाव हलत नाही, डुलत नाही, पण जराशीही कुजत नाही! सरोवरात कुणाला येऊ देत नाही, सरोवरातून कुणाला जाऊ देत नाही! सरोवरभर तिचीच प्रतिबिंबे खोलवर.... भरल्या सरोवरातल्या रित्या नावेसाठी, . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! शिवकन्या

मायग्रेन साठी सहज सोपी योगासने

लेखक जयन्त बा शिम्पि यांनी शनिवार, 26/11/2016 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
सहज सोपी योगासने मूळात योगासने ही संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी उत्तम असतातच, पण काही विशिष्ट आजारांसाठी, काही ठराविक आसने थोडा अधिक काळ केल्यास, त्यांचा त्या व्याधीपासून आराम मिळण्यासाठी फायदा होतो. अशा काही आसनांची येथे माहिती दिली आहे. डोकेदुखी व मायग्रेन मनावर येत असलेला वा घेत असलेला प्रमाणाबाहेरचा ताण, तणाव यातून डोकेदुखी उद्भवते. नियमित वेळेवर जेवण न घेणे, पुरेशी झोप न होणे, शरीराला पुरेशी विश्रांती न मिळणे, ही सुद्धा कारणे आहेत. डोकेदुखी जास्त व वारंवार होत असली तर मायग्रेनचा त्रास सुरु होतो.

मला व्यवहार ज्ञान नाही,माझे डोके कुठेच चालत नाही,मी काय करावे???????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी बुधवार, 23/11/2016 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो मी थोडक्यात माझा प्रॉब्लेम मांडणार आहे. मी आहे ३१ वर्षाचा तरुण( केस पांढरे व्हायला लागले आहेत) .तसा मी बक्कळ शिकलो आहे.अगदी बी एस्सी विथ फर्स्टक्लास.पण मी कधीही नोकरी केलेली नाही.घरची शेती आहे पाच एकर ,त्यात मी कॉलेज झाल्यानंतर लक्ष घातले.लहानपणापासून शेतात जात असल्याने मला शेतीची थोडीफार माहीती आहे ,त्यावरच माझा चरितार्थ चालतो.आईवडील दोघेही शासकीय नोकरी करत होते ,ते दोघेही सध्या माझ्यावर अवलंबुन नाहीत. माझा प्रश्न असा आहे की माझे व्यवहारात व इतर ठीकाणी कुठेच डोके चालत नाही.मित्रांमध्ये गप्पा मारताना ,घरात,ईतर ठीकाणी काही इंटेलेक्च्युल चर्चा चालत असेल तर मला त्यातले ओ की ठो

उडदामाजी "काळे"-गोरे

लेखक गुलाम यांनी मंगळवार, 22/11/2016 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
'प्रधानसेवकांची मोठी घोषणा. काळ्यांविरुध्द सर्जिकल स्ट्राईक.' (आता सगळे काळे हद्दपार होणार.. आपले तर १००% पांढरे.) गुलाम बेहद खुष झाला. "अगं ऐकलंस का? १०० चे किती आहेत तुझ्याकडे?" "४ फक्त. तुमच्याकडे?" "२. आणि पेपरचं बिल पण द्यायचं आहे अजुन. सकाळीच येउन गेला तो." "अहो मग त्याला ५०० ची नोट देउन टाका ना. आत्ताच आलीय बातमी. त्याला अजुन कळलं सुध्दा नसेल." "अगं पण तो बिचारा..." "लवकर जा. एकदा कळलं की घेणार नाही तो." . . . "हे काय बिनकांद्याचे पोहे?" "अहो तिकडे आपले सैनिक रोज शत्रुच्या गोळ्या खातात.

योगशिबीरातले दिवस २: योगाभ्यास- A man is as old as his spine is flexible

लेखक आर्या१२३ यांनी सोमवार, 21/11/2016 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या लेखात शिबीराची ओळख, दिनचर्या सांगितली . या लेखात शिबीरात काय काय शिकलो हे थोडक्यात सांगत आहे. अर्थात शेवटी, केंद्रातले व्यासंगी, प्रगल्भ वक्ते हे सगळे अतिशय प्रभावीपणे अगदी सहजगत्या उलगडुन सांगतात. तिथले प्रदुषणमुक्त वातावरण, आहार-विहार आणी मुख्यतः सामुहिक साधनेचा खुप फरक पडतो. सकारात्मक स्पंदने मिळतात. अष्टांग योगात यम नियम वगैरे असतात हे आपण वाचले/ऐकले आहे. पण यम नियम म्हणजे तरी काय, याबद्दल जे आम्हाला सांगितले ते इथे मुद्द्यानिशी मांडतेय .