Skip to main content

जीवनमान

आकर्षणाचे नियम

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 10/10/2016 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
Law of attraction अर्थात आकर्षणाचा नियम याविषयावरचा whatsapp समुह सुरु करत आहोत. आकर्षणाचा नियम याबद्दल बर्याच जणांनी वाचलं असेल,"सिक्रेट" हे पुस्तक तसेच याच विषयावरचा चित्रपटही पाहिला असेल. तुम्ही सतत जो विचार कराल तसेच परिणाम तुम्हाला मिळतील.ही या नियमाची सुरुवात;पण फक्त सकारात्मक विचार करुन हवं तसं घडेल का? मग त्यासाठी काय करावं लागेल? काय करता येईल? ते सकारात्मक विचार फलद्रुप होण्यासाठी आणखी काय काय करावं लागतं? त्यासंबंधी चर्चा ,माहितीची देवाणघेवाण यासाठीच आहे हा समुह. हा आकर्षणाचा नियम आहे तरी काय? तो कसा वापरायचा? वापरताना होणार्या चुका कोणत्या?

ईईईई कॉमर्स - एक अवेअरनेस प्रोग्राम -भाग २

लेखक अक्षरमित्र यांनी शनिवार, 08/10/2016 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग येथे वाचता येईल : --------------------------- सिनिअरचा सिनिअर : बरं तुम्ही सुट्टीत मुलांना बायकोला घेऊन फिरायला जाता काय ? मी : नाही, आम्ही सुट्टीत गावी जातो. सिनिअरचा सिनिअर : बरोबर. काही वर्षांपुर्वी मी देखील हेच करायचो. कारण सुट्टीमधे कुठे फिरायला जायचे म्हणजे कमीत कमी ४०-५० हजार तर पाहिजेतच. ते आपल्याकडे नसतात म्हणून बेसीकली आपण गावी जातो. तुमच्या बायकोला विचारा बर की आपण दुबईला, मलेशियाला फिरायला जायचं का ? पाहिजे तर पुढल्या सुट्टीत गावी जाऊ. आय बेट, ती एका पायावर तयार होईल.

संकट आपल्यामागे की आपण संकटाच्या पुढे...

लेखक महेश_कुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/10/2016 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी- सकाळी मोर्निंग वॉकला गेलो होतो गाडीवरून. अहो म्हणजे, गाडीवरून बागेत गेलो आणि तिथे मोर्निंग वॉक/योग केले. तिथून घरी परत येत असताना एका गल्लीमध्ये गाडी नेली. तेव्हा तेथील एक कुत्रे जे खरे तर माझ्या वाटेवर नव्हते ते उगाच पळायला लागले. त्याची एवढी घाबरगुंडी उडाली की पळता-पळता ते बरोबर गाडीच्या समोर आले आणि आणखीन घाबरून जोरात पळू लागले. वास्तविक पाहता मुळात कुत्र्याने माझी गाडी आली म्हणून पळण्याची गरज नव्हती कारण ते तसेही वाटेत येत नव्हते.

दरवाजा हो तो ऐसा हो!

लेखक बाजीप्रभू यांनी बुधवार, 05/10/2016 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
साने गुरुजींच्या "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे" च्या धर्तीवर "मिपाला पोस्ट अर्पावे" या हेतूने पोटावरती हि एक पोस्ट. डोन्टवरी! यात कुठलेही डायट सल्ले नाहीत, व्रत-वैकल्ले नाही, उपास-तापास नाहीत कि लोखंड उचलायचे प्रकार नाहीत. आहे ते एका "पोटिव्हेशन" बद्दल आयमीन "मोटिव्हेशन" बद्दल. "पोट" हे श्रीमंतीचे लक्षण असतं हे आजोबांचं वाक्य तर चिकन-मटण खाल्यानंतर कमीत कमी दोन तास झोपलं नाही तर माणूस "नरकात" जातो हे बाबांचं वाक्य.