Skip to main content

जीवनमान

दांडी मारणे - एक विलक्षण कला

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 24/03/2017 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

प्रमोशन

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 23/03/2017 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
माॅर्निंग ब्रेकची वेळ. ब्रेकफास्ट काऊंटरवर मार्निंग शिफ्टच्या एम्प्लाॅईजची तुरळक गर्दी होती. बेनमेरीमधल्या स्टीलच्या ट्रेमधून अनेक पदार्थांचा संमिश्र असा वास दरवळत होता, पण त्यातूनही रस्समचा वास ब-यापैकी नाकाला ठसका देत होता. मधूनच बाजूला टांगलेल्या निळ्या रंगाच्या फ्लाय किलरमध्ये माश्या चिकटल्याबरोबरचा 'चट..चट' आवाज काही नवख्या एम्प्लाॅईजचे लक्ष वेधत होता. लॉगईन करून दोन चार कामाचे मेल चेक केल्यानंतर रोहन आणि मिंजल कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्टसाठी आले होते.

या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 21/03/2017 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमीप्रमाणे आज कट्टयावर सगळे जमले होते खरे पण आज रोजच्या सारखं बिलकुल वाटत नव्हतं. खामकरांची उणीव सर्वांनाच जाणवत होती. शेवटी रेगे म्हणाले, "खामकर नाही तर एकदम चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय" "हो ना, बिचाऱ्यांची मुलाशी शेवटची भेट झाली असती तर बरं झालं असतं." एक निश्वास सोडून कर्वे म्हणाले. "हे  तुम्हाला वाटतंय हो. त्यांच्या मुलाला काही आहे का त्याचं! म्हातार्या आईवडलांना सोडून खुशाल अमेरिकेला जाऊन बसायचं. इकडे म्हातारा म्हातारी असले काय आणि नसले काय, यांचे राजाराणीचे संसार चालू!" देशपांडे संतापून म्हणाले. "पण तसे खामकर मुलाबद्दल नेहेमी चांगलंच बोलायचे हो!

सांस्कृतिक भारत: जम्मू आणि काश्मीर

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/03/2017 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे जम्मू आणि काश्मीरचे भौगोलिक क्षेत्रफळ 2,22,236 चौरस किमी इतके आहे. (यात अनधिकृत पाकव्याप्त प्रदेश 78,114 चौरस किमी, पाकिस्तानने अनधिकृतपणे चीनला सोपवलेला 5,180 चौरस किमीचा प्रदेश आणि चीनकडे असलेला 37,555 चौरस किमी या अनधिकृत ताबा प्रदेशांचा समावेश आहे.) राज्याची राजधानी श्रीनगर तर हिवाळी राजधानी जम्मू ही आहे. सर्वात मोठे शहर श्रीनगर हे आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 1,25,48,926 इतकी असून साक्षरता 68.74 टक्के आहे. राज्याच्या प्रमुख भाषा उर्दु, काश्मीरी, डोग्रा, डोंगरी, पहाडी, बाल्टी, लडाखी, पंजाबी, गुजरी व दादरी या आहेत.

टोरोंटो, कॅनडा इथे कोणी मिपाकर वास्तव्यास आहेत का?

लेखक ट्रेड मार्क यांनी रविवार, 12/03/2017 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
टोरोंटो, कॅनडा इथे कोणी मिपाकर वास्तव्यास आहेत का? मला तिथल्या वास्तव्याविषयी थोडी माहिती पाहिजे.

पत्र व्यवहार ... एक दुर्मिळ होत चाललेलं काम , कौशल्य ...काय म्हणाल ?

लेखक १००मित्र यांनी रविवार, 12/03/2017 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी (रविवार) जुन्या गोष्टी हाताळत असताना एक जुनं पोष्ट-कार्ड (हो हो पो”ष्ट” च) हाती लागलं. फार जुनं नाही , १० एक वर्षांपूर्वीचं. पण “दुर्मिळ” वाटावं इतकी ही पत्र लिहिण्याची-पाठविण्याची सवय पार भूतकाळात गेल्यासारखी वाटतीये आता. ह्या पत्रामुळे अनेक गोष्टींची विचार शृंखला जागृत झाली, शिवाय रविवार असल्याने विचारांना पसरायालाही मी भरपूर वावही दिला. आता खरं म्हणजे इतरही वार मला असा वेळ नक्कीच देवू शकतात बरंका. पण “रविवार” डोस्क्यात बसलाय , तो त्याचं एक विशिष्ट स्थान घेवून.

मी बाई होते म्हणुनी - भाग १४

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 07/03/2017 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या वाड्यापासुन वनविहाराची नवीन जागा बरीच लांब होती, तिथे पोहोचेपर्यंत कुणीच काही बोललं नाही, असे ही त्या रथाच्या खडखडाटामध्ये काही ऐकु येणं शक्य ही नव्हतं. आम्ही वनाजवळ पोहोचलो आणि रथातुन उतरुन विश्रांतीस्थळाकडे चालत निघालो, दहा बारा योजने चाललो तेवढ्यातच राजा दशरथ आणि राजकुमार आल्याची सुचना घेउन एक सैनिक आला, आम्ही त्यांच्या स्वागतासाठी होतो तिथेच थांबलो. राजा दशरथ स्वत्ः सगळ्यांत पुढे होते, त्यांच्या डाव्या बाजुला राम आणि भरत तर उजव्या बाजुला लक्ष्मण आणि शत्रुघ्न होते.

विमान

लेखक संदीप-लेले यांनी रविवार, 05/03/2017 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
विमान असते धावत जेव्हां, वाटे जीवनी सर्व मिळावे उंची गाठतो, कळते तेव्हां, वाटे जीवनी गुपित कळावे विमान असते धावत जेव्हां, हद्द होते सरहद्दींची उंची गाठतो, कळते तेव्हां, हद्द एक गोल पृथ्वीची विमान असते धावत जेव्हां, वैभव मागे सरकत असते उंची गाठतो, कळते तेव्हां, वैभव डोंगर द-यात असते विमान असते धावत जेव्हां, आपुले जग आपुले असते उंची गाठतो, कळते तेव्हां, आपुले जग आपुले नसते विमान असते धावत जेव्हां, काळ मागे मागे जातो उंची गाठतो, कळते तेव्हां, काळ मागे मागे येतो विमान असते धावत जेव्हां, मोल असते वेगाचे उंची गाठतो, कळते तेव्हां, मोल खरे नियंत्रणाचे विमान असते धावत जेव्हां, वाटे हवी हवाई सु
काव्यरस

ताळेबंद

लेखक रामदास यांनी गुरुवार, 02/03/2017 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
तसा चोख असतो ताळा आमचा , दिसा -मासाच्या गणिताचा. कुणाची तरी वाट बघत, जागलात, काही उत्तर रात्रीचे प्रहर. ते ही वळते केलेत , संधीकालाच्या वजावटीत. ओंजळीत चेहेरा झाकून रडलात , ते ही होरे जमा धरलेत, ग्रहणाच्या हिशेबात. तसा चोख असतो ताळा आमचा , दिसा -मासाच्या गणिताचा. उरलं सुरलं केलं वळतं घसार्‍याच्या आकडेवारीत तसे काही बाक़ी नाही देण्या घेण्याच्या हिशेबात . तसा चोख असतो ताळा आमचा , दिसा -मासाच्या गणिताचा. (मुठभर राखुंडी हातात ठेवून आयुष्य म्हणाले, हीच काय ती गंगाजळी इतक्या वर्षाच्या ताळेबंदात )

मी बाई होते म्हणुनी - भाग १३

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 28/02/2017 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी तिथुन निघाले, मनांत काही विचार चालु होतेच, समोरुन काही दासी येताना दिसल्या त्यांना एका कामाला लावलं अन् माझ्या दालनात येउन माझी तयारी सुरु केली, काही मोठया पेटयात ठेवलेले सामान काढायला लावलं, तेवढ्यात मगाशी गेलेली दासी परत आली, तिनं येउन सांगितलं की त्या दोघी सुवर्णलंकाराच्या सहित निळ्या रंगांच्या वस्त्रांची तयारी करत आहेत, मी देखील माझी तयारी करायला सुरुवात केली, काही वेळानं आई दालनात आली, आणि त्याचवेळी मी मागवलेल्या वस्तु घेउन दासी सुद्धा येत होत्या, त्यांच्याकडं पाहुन आईनं विचारलं, हे काय आहे, उर्मिले, हे सर्व का मागवलं आहे आज,.... ...