Skip to main content

जीवनमान

शाळा- मंतरलेले दिवस

लेखक योगेश आलेकरी यांनी शुक्रवार, 12/05/2017 16:37 या दिवशी प्रकाशित केले.

शाळा- मंतरलेले दिवस

स्वप्नवत विद्यालयाचे प्रवेशद्वार a शालेय जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवं पान असतं तर काहींच्या आयुष्यातील एक भळभळती जखम. स्वछंदी असे ते जीवन संपवून आपण कधी जबाबदार होऊन जातो कळतच नाही..असच २००६ मधील एप्रिल महिन्यात माझं बालपण संपत होतं.

मिपाकरांचा "शेती" विषयक माहितीच्या आदान प्रदानासाठी व्हॉट्स-अप गृप.....

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 10/05/2017 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, काल पासून शेती ह्या विषयात रस असलेल्या, मिपाकरां साठी, एक व्हॉट्स-अप गृप स्थापन करण्यात आला आहे. ज्यांना शेतीची आवड असेल, अशा व्यक्तींनी खालील मिपाकरांशी संपर्क करावा. १. सुखी (मोबाईल नंबर =====> ९७६६३१४९५१) २. अभिजित अवलिया (मोबाईल नंबर ====> ९१५८००९८४६) आपलाच, मुवि

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग२

लेखक इडली डोसा यांनी बुधवार, 10/05/2017 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पहिल्या लेसनमध्ये काहीच पडझड न झाल्यामुळं मी दुसऱ्या लेसनची उत्साहात वाट बघत होते. लौकर उठून पटापट आवरून निघालो, जरा आधी पोचलो तर जाऊन थोडी उतारावर थांबायची प्रॅक्टिस करता येईल असा माझा विचार होता. पण पीक सीजन असल्यामुळं स्काय लिफ्टसाठी भली मोठी रांग होती. डोंगराच्या पायथ्यापासून ते स्की एरियापर्यंत पोचायला ८ मिनिटे लागतात. यथावकाश आमचा नंबर लागून आम्ही स्की एरियामध्ये पोचलो तोपर्यंत आमच्या टीम ने थोडी प्रॅक्टिस करायला सुरुवातही केली होती.

हाऊ टू लीव अँड डाय : खुशवंत सिंग !

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 07/05/2017 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
खुशवंत, सिंग वन-शॉर्ट-ऑफ अ सेंश्युरी वर बाद झाले. त्यांनी आनंदानं जगायला (आणि मरायला) नक्की काय लागतं याची १० सूत्रं मांडली. मध्यंतरी याचा एक वॉटस-अ‍ॅप फॉरवर्ड पण फिरत होता. तरीही ही सूत्रं वाचून आंमलात आणण्याजोगी नक्कीच आहेत, त्या निमित्तानं हा लेखनप्रपंच ! खुशवंत म्हणतात, मी अनेकदा सुख नक्की कशात आहे, माणसाला सुखानं जगायला नक्की काय करायला हवं याचा विचार केलायं. १) तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरीरस्वास्थ्य ! जर शरीरस्वास्थ्य नसेल तर माणूस सुखी होऊ शकत नाही. साधीशी का असेना, एखादी जरी व्याधी असेल तर ती जगण्याचं सुख कमी करते. २) दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिकस्वास्थ्य !

लोकलट्रेन प्रवाशाच्या रोजनिशीतील एक पान.

लेखक सचिन काळे यांनी शनिवार, 06/05/2017 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
लोकलट्रेनमध्ये बसलो आहे. ऑफिसला चाललोय. काल झोपायला अंमळ जरा उशीरच झाला होता. झोप कमी झाली त्यामुळे अंग जरा आळसावल्यासारखे वाटतेय. गाडीने नुकतेच कल्याण सोडलेय. लोकलमधली अनाउन्सर बाई जीव खाऊन कोकलतेय. "पुढील स्टेशन ठाकुर्ली, अगला स्टेशन ठाकुर्ली, नेक्स्ट स्टेशन ठाकुर्ली". गाडीके 'पायदान पायदान' ऐकून ऐकून डोकं भिरभिरायला लागतं. शेजारील लेडीस फर्स्टक्लासच्या डब्यात एक गरीब म्हातारी हातात आपलं बोचकं घेऊन सीटवर बसली आहे. अजून पुष्कळ सीट रिकाम्या आहेत, पण इतर बायका तिला हळूच खुनन्सने बघतायत. थोड्यावेळाने त्यांचा उद्रेक होणारसं दिसतंय. पूर्वी कल्याण आणि ठाकुर्लीच्यामध्ये फक्त रान होतं.

मेंदू, भावना व वर्तणूक (२)

लेखक मंजूताई यांनी शुक्रवार, 05/05/2017 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
आधी म्टहल्याप्रमाणे आपला मेंदू एक सामाजिक संस्था आहे. प्रत्येक सेल्सची जागा ठरलेली आहे, अचूक कामाची विभागणी, कामाच्या स्वरूपानुरूप कर्मचाऱ्यांची संख्या असते. गंमत म्हणजे त्यांच्यात ना स्पर्धा असते ना भांडणं ! निमूटपणे आपआपलं स्वशिस्तीत काम करत असतात. असा हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव ‘मेंदू’ म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. अमेरिकन न्युरॉलॉजिस्ट ऑलीव्हर सॅक्स ह्यांनी ‘न्युरॉलॉजी ऑफ आयडेंटिटी’ संकल्पना मांडली आहे. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत व त्या पुस्तकांवरून सिनेमेही बनवल्या गेलेत.

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग१

लेखक इडली डोसा यांनी गुरुवार, 04/05/2017 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या सहा सात वर्षात थंडीचे चार सहा महिने घराबाहेर पडायला अगदीच कमी वाव असायचा. थंडीचे विकेंड म्हणजे कोणाच्या तरी घरी जमून गप्पा गोष्टी, पॉट लक किंवा फार फार तर कुठेतरी इनडोअर ठिकाणाला भेट यापेक्षा जास्त इतके दिवस काही केलं नव्हतं. या वर्षी व्हॅंकुवरला शिफ्ट झाल्यामुळे लोकप्रिय विंटर स्पोर्ट असलेल्या स्किईंगचा अनुभव घेता आला. घरापासून ३० ते ५० मिनिटांच्या ड्राईव्हवर ३ स्की रिसॉर्ट असल्यामुळे आधी एखाद्य ठिकाणी जाऊन कसे वाटते ते बघू आणि मग पुढे शिकायचे कि नाही ते ठरवू असं ठरवलं.

ग्रीष्माच्या कविता....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 02/05/2017 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रीष्माच्या कविता... तपता अंबर, तपती धरती, तपता रे जगती का कण-कण! त्रस्त विरल सूखे खेतों पर बरस रही है ज्वाला भारी, चक्रवात, लू गरम-गरम से झुलस रही है क्यारी-क्यारी, चमक रहा सविता के फैले प्रकाश से व्योम-अवनि-आँगन! डॉ. महेंद्र भटनागर... या जगातील आद्य कवि असे नक्की कुणाला म्हणता येईल देवच जाणे. पण ज्याने कोणी पहिली कविता लिहीली असेल त्याचे खरोखर प्रचंड उपकार मानले पाहिजेत. प्रसंग, घटना कितीही त्रासदायक असो तिचा दाह कमी करण्याची ताकद कवितेत आहे, असते. वरील कविताच पाहा ना. सरळ सरळ जर तापलेल्या रणरणत्या उन्हाने धरा तप्त झालेली आहे. शेते सुकून चालली आहेत.

#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - मे २०१७ - #व्यायामविडा

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 01/05/2017 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही आपल्या समोर एक मिपाकर आपली व्यायामगाथा सांगणार आहेत. ह्या महिन्याचे मानकरी आहेत "वेल्लाभट"! मुंबईसारख्या ठिकाणी अत्यंत धावपळीच्या दिनचर्येतही रात्री उशीरा का होईना पण ठरवलेला व्यायाम केल्याशिवाय न झोपणारे हे मिपाकर! नोकरी, जाण्या येण्यात जाणारा वेळ, लहान मुल अशा आपल्याकडे असणार्‍यशासर्व सबबी त्यांच्याही आयुष्यात आहेतच. पण त्याचा बाऊ न करता नित्य नियमाने व्यायाम तर करतातच पण सोबतच मिपाफिटनेसच्या धाग्यावरही त्यांचे प्रतिसाद अत्यंत वाचनीय असतात. ह्या महिन्याचा मिपाफिटनेसचा धागाही असाच वाचनीय असेल ह्यात शंकाच नाही.