Skip to main content

जीवनमान

माझं "पलायन" ६: हाफ मॅरेथॉनची नशा!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 30/04/2019 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
६: हाफ मॅरेथॉनची नशा! डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/04/2019 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर आशाळभूत नजरेने. किती बाहेर ? मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर.. ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे... समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे, हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ... देतील का ते मला सिंहासन मिळवून ??? पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे. चुस्त, मस्त, व्यस्त .... चतुर, धाडसी, जबरदस्त ... नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत. चौकीदाराला मिठी मारून झाले ...

उत्पादन परिचय : झोप येण्याकरिता चहा

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 22/04/2019 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो.. अलीकडेच या अनोख्या चहाशी माझी ओळख झाली. आपल्याकरिता तिचा संक्षिप्त परिचय देवू इच्छितो. sleep tea या चहाचा खरेच उपयोग होतो असे जाणवले. माझ्या पत्नीला गेल्या काही दिवसांपुर्वी झोप न येण्याचा त्रास जडला होता , इतका की तिला डॉक्टरांनी काही दिवसांकरिता झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या होत्या.

मूळ पेशी : रोगोपचाराचे प्रभावी अस्त्र

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 22/04/2019 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ पेशींचे शास्त्रीय नाव आहे Stem cells. वैद्यकविश्वात विविध अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता नियमित होतात. त्याच धर्तीवर निरोगी व्यक्तीतील मूळ पेशींचे देखील प्रत्यारोपण एखाद्या रुग्णात करता येते. रक्ताच्या काही गंभीर आजारांत अशी प्रत्यारोपणे आता नियमित होतात. ‘बोन मॅरो’ चे प्रत्यारोपण हा शब्दप्रयोग आपल्यातील बरेच जणांनी ऐकला असेल. या विषयावर आधारित काही चित्रपट देखील प्रदर्शित झालेले आहेत. गेल्या काही दशकांत विकसित झालेल्या या विज्ञानाचा परिचय करून देण्यासाठी हा लेख.

पाणी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 19/04/2019 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
इतक्या पाण्याचे शरीरमन बनवताना विचार करायचा देवा, पाण्याला इतके झोके देताना उसंत घ्यायची देवा.... उसळून पुन्हा आदळते पाणी खडक द्यायचा देवा... दोन डोळे पुरत नाहीत पाण्याचा संसार पेलताना... देवा, आता पाण्याचे तीर्थ करा अन् पाण्यातून मुक्ती द्या.... शिवकन्या

क्युट नॅनो !!!

लेखक धर्मराजमुटके यांनी मंगळवार, 16/04/2019 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
कार जेव्हढी लहान तेवढी तिची चर्चा जास्त मोठी ! काही वर्षांपुर्वी टाटांनी नॅनो बाजारात आणली होती तेव्हा तिच्यावर टीका करणारा आणि तिच्या प्रेमात असणारा मोठा वर्ग होता. एक वेगळा प्रयोग म्हणून तिच्याकडे देशाने उत्सुकतेने पहात होता. आता नॅनोचे उत्पादन थांबविले गेले आहे पण तेव्हाच माझ्या मनात विचार आला की टाटांनी नॅनोला कार म्हणून विकण्यापेक्षा रिक्षा म्हणून विकले असते तर ?? असो. तर हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे बजाज ऑटो एक नवीन गाडी घेऊन येत आहे "बजाज क्युट" ! बहुधा नॅनोच्या अपयशापासून बोध घेत आताच त्यांनी स्पष्ट सांगीतले आहे की ही कार नाहीये. ही आहे "क्वाड्रासायकल".

आणीबाणी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/04/2019 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे देशात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा मी पाचवी सहावीत असेल. या वयात आणीबाणीचा मला काहीच फरक पडणार नव्हता. पडला नाही. माझे वडील प्राथमिक‍ शिक्षक होते. आमच्या विरगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एका लहान गावाला वडिलांची बदली होती. वडील शाळेत पायी जात. तिकडूनही पायी यायचे. त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळेत एसटी नव्हती. पायी जायचं आणि वेळेवर शाळेला पोचायचं. म्हणून वडील पहाटे शाळेला निघत. ‘आणीबाणी असल्याने शाळेला उशीरा जाऊन चालणार नाही’ असं त्यांच्या बोलण्यातून कळत असे. पण आणीबाणी म्हणजे नेमकं काय हे ते समजण्याचं वय नव्हतं. गावात किराणा दुकान होतं.

तळवे

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 13/04/2019 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
हेच ते जीवघेणे हळवे तळवे ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!! शक्य वा हिंमत असती तर हे तळवे बाजूला काढून फोटोत घडी घालून पुरून टाकले असते... ना ही असोशी असली असती... ना अंधारात डोळे खुपसून न उजळणार्या पूर्वेकडे पहात राहिले असते.... ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते.... नाहीतर, माझ्या दोन्ही तळव्यांना पंख व्हायची शक्ती घटकाभर देता, तर विधात्याचे काय जाते? -शिवकन्या

धर्म म्हणजे काय?

लेखक हेमंत ववले यांनी गुरुवार, 11/04/2019 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
(धर्म या शब्दाचा मूळ अर्थ : मूळ : धरणे किंवा बांधून राहणे व सवयीनुसार काळजीपूर्वक पालन करणे. धर्म हा संघटितरीत्या मान्य झालेल्या, एकत्रित जुळत असलेल्या सर्व सामाजिक व वितर्कीय कल्पनांचा संग्रह असतो. धर्माचा निसर्गात अस्तित्वात असलेल्या व्यक्ती, वस्तू, विश्व, इत्यादी गोष्टींशी निगडित असण्याचा दावा असतो. महाभारतानुसार 'ध्रियते लोकोनेनेति धर्मः| धारणाद् धर्ममित्याहुऱ् धर्मो धारयते प्रजाः||' अर्थात 'समाज व प्रजा धारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी आहे तो धर्म.' धर्म नावाची ही अशी एक संकल्पना आहे की जिने आजपावेतो जगातील कोट्यवधी लोकांना सुख, शांतता व समाधान दिले.

दाराआडची चमेलीबाई ( आणि ती सटवी रोहिंगीण)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 08/04/2019 04:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: दाराआडची मुलगी. . चमेलीबाई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर ? स्वत:च्या बाहेर, कमाठीपुर्‍याच्याही पल्याड - भूतभविष्याच्या आरपार ... तिकडे दूर इस्माईल बसला आहे... . केसांचा कोंबडा काढून "दिल का भंवर करे पुकार" ...