Skip to main content

जीवनमान

ते दोघे

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 16/02/2019 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळीने रेखीव झालेल्या त्या प्रचंड वृक्षातळी ते दोघे होते मघामघाशी तर! मी पाहीले त्यांना बराच वेळ खाली मान घालून एकमेकांमध्ये साखरेइतके अंतर ठेवून चालताना, कुठेही न थांबता त्यांना एकमेकांकडे बघताना, अन् तेव्हा रस्ता हसताना... मी पाहिले त्या दोघांना , हात हातात घेताना 'बाहों के बाहर नजरों से ओझल होना ही लकिरों पे लिखा है तो वो लकिरे ही मिटा देते हैं' त्याने एवढेच म्हणलेले मला ऐकायला आले नंतर मला ते दिसले नाहीत... पानगळीने रेखीव झालेल्या प्रचंड वृक्षामागे मला नंतर कुणीच दिसले नाही... -शिवकन्या

आयटी मध्ये बॉस चे रक्त कसे प्यावे ?

लेखक एकुलता एक डॉन यांनी शुक्रवार, 15/02/2019 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यनाना असतो तसा मला पण बॉस त्रास देत आहे जास्त काम असेल त्यावेळी आजारी पडणे ,उशिरा येणे ,आळस करणे वगैरे सगळे करून झाले आहे पण पठ्या काही सुधरत नाही मुद्दाम छोट्या चुका काढणे चालूच आहे sr मानजमेंट काही कामाचे नाही ना HR apprisal होणार नाही ह्याची खात्री आहे ,काढले कामावरून तरी फरक नाही पण ह्या नालायकाचे रक्त प्याचे आहे जालीम उपाय सुचवा ,रात्री पण स्वप्नात मी दिसायला पाहिजे

अर्रे कोण म्हणतं इतिहासजमा झाली झाशीची राणी

लेखक खिलजि यांनी सोमवार, 11/02/2019 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
अर्रे कोण म्हणतं इतिहासजमा झाली झाशीची राणी आमच्या चाळीत येऊन बघा जेव्हा नळाला येतंय पाणी II खुडबुड खुडबुड चालू होते तांबडं फुटताक्षणी घागरीवरती स्वार होऊनि साऱ्या जमती अर्धांगिनी II नजर रोखुनी फक्त नळावर कैक नागिणी जणू एक बिळावर हंडे, कळशी, बादल्या घेऊनि तयार पदर खोचुनी आमच्या चाळीत येऊन बघा जेव्हा नळाला येतंय पाणी ॥ घटिका येता सज्ज त्राटिका ताम्रकडूंचा आवाज मोठा एक नळासी किती त्या वाटिका ? अन किती त्या रौद्र मरदाणी ?

वेळेवर!

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 04/02/2019 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
"बोला काय हवंय?" साधारण पन्नाशी उलटलेल्या काकांनी नितीनला अपादमस्तक न्याहाळत विचारलं. अं? नाव नोंदवायचं होतं लग्नासाठी! "अच्छा! मुलगा,मुलगी कोणासाठी? की दोघे?" जाडजूड वह्या वरखाली करत काकांनी विचारलं. नाही नाही!मी स्वत:च आहे लग्नाचा! "बरं बरं! या बसा!" एक जाडशी वही कम रजिस्टर काढून काकांनी विचारायला सुरुवात केली, हं सांगा, नाव? "नितीन आत्माराम कुलकर्णी" राहणार? पुण्यातच! बरं! नोकरी? गोरक्षनाथ पतसंस्था मौजे.... अंहं! त्याची गरज नाही.बरं वय काय?

काही नाजूक स्वप्नं...

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 30/01/2019 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
परवा सहज टीव्ही चाळता चाळता एका चॅनलवर 'कुछ कुछ होता हैं' दिसला. बास्केटबॉल कोर्टवर राहुल आणि अंजलीची बालिश अशी भांडणे सुरु होती. थोडा वेळ बघत बसलो. हा चित्रपट १९९८ मध्ये आला होता आणि तुफान चालला होता. गाणी सगळी हिट्ट झाली होती. मनात विचार आला. हा चित्रपट जर आता आला असता तर चालला असता का? सध्याच्या तरुण प्रेक्षकांची आवड आमुलाग्र बदलली आहे. आमच्यासाठी मात्र हा चित्रपट एक स्वप्न होते. त्या साली मी कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसर्‍या वर्षात शिकत होतो. 'कुछ कुछ...' मध्ये स्वपनवत वाटू नये असे काहीच नव्हते.

माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 25/01/2019 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
२: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

"तू " अधिक " मी " किती ?

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 25/01/2019 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
किती सोपा प्रश्न होता माझा "तू " अधिक " मी " किती ? तू उत्तर दिलेस "दोन" अंतर्मुख होऊनि शोधू लागलो आपण आहोत तरी कोण ? मला अपेक्षीत “एक " होते आपल्यात मुळी अंतरच नव्हते दोन देण्यामागे कारण काय होते? जर तू माझ्यात होतीस मग मी तुझ्यात का नव्हतो ? आणि मी तुझ्यात नव्हतो तर मी कुठे होतो ? गणित सोपे जरी वाटले दुरून अवघड झाले उत्तरावरून का दिलेस तू विचित्र उत्तर ? कुढत गेलो पुढे निरंतर जवळ घेतला मद्याचा प्याला शोधत गेलो मला स्वतःला {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल

लेखक खिलजि यांनी सोमवार, 21/01/2019 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल दे ना रे मजला मी कि नई छान छान खायला करून घालेन तुजला कशाला हवाय डोक्याला ताप नि तो पगार कशाला होतील चोऱ्या नि माऱ्या कुठेच पडणार नाहीत दरोडे कि होणार नाहीत कुणाचे खून लुटेल , हो फक्त लुटेल ते सूर्यनारायणाचे ऊन तू काया बनवलीस सोबतीला कमी कि काय म्हणून माया बनवलीस खायला तोंड दिलेस नि भरायला पॉट तरी बी सारे शोधत बसलेत कुठं लागतोय का ते जॅकपॉट ? झाड बघा ना, कुठंच जात नाही तिथेच राहतं नि ऊन खाऊन जेवण बनवून देतं मलाही आवडेल तसं राहायला काहीही नको , हवंय फक्त ऊन आणि ऊन लुटायला मस्तपैकी लुटून , छान छान जेवण बनवायला स्वतःच हात

[समारोप] प्राणायामात काय शिकायचे ? नवीन काय? भाग ३/३

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 16/01/2019 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
प्राणायामात काय शिकायचे ? नवीन काय? भाग ३/३ डॉ. जगन्नाथ दीक्षित ( एम० डी०), डीरिडर, लुईझियाना आणि राजीव उपाध्ये, पुणे. या पूर्वीचे भाग https://www.misalpav.com/node/43889 https://www.misalpav.com/node/43920  (12)  प्राणायामाचा नित्यक्रम लहानपणापासून का करावा ?           गाई म्हशींची वासरे जन्माबरोबर लगेच चालू लागतात, परंतु  जेव्हा एखादे मानवी बालक जन्माला येते, तेव्हा ते चालू शकत नाही.

बडव्यांची दुनिया

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 15/01/2019 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना जंगलावर राज्य करायचं असेल तर खबरीलाल पोपट पाळून चालत नाही त्यासाठी सिंव्ह पाळावा लागतो हा सिंव्ह आपल्यासमोर उभा आहे फक्त आपल्या किमतीचा भाव जुळावा लागतो -----------कविता ------- धूर दिसे , काहीही नसे पोपट करी जो त्रागा शिकाऱ्यास तो असे भासवे जणू तोच जीवनधागा जंगल मंगल पोपटामुळे पोपट किती रे चपळ हा नसता तर अवघड असते पेलले नसते जंगल बित्तम्बातमी अशी आणतो जंगलाची जणू नस जाणतो पोपट पोपट करी शिकारी काहीच सुचे ना त्याला पोपट मारी अशी फुशारी जणू हाच एकमेव जंगलाला सिंव्ह बिचारा सुखी आपला मालूम नसे हे त्याला शिकार्यासी तो देव मानुनी रोज पूजी तयाल
Taxonomy upgrade extras