बेसुमार -
.
उद्या आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन !
रोज आपण मारे बेंबीच्या देठापासून ओरडत आहोत..
भ्रष्टाचार - - बेसुमार
महागाई -- बेसुमार
भाववाढ - - बेसुमार
वाहने -- बेसुमार
लोकसंख्या - - बेसुमार
अनाधिकृत बांधकामे -- बेसुमार
घुसखोर -- -बेसुमार
रोगी, व्यसनी, कुपोषित -- बेसुमार
रस्त्यात खड्डे .. ! ! !
आता आपल्या देशाला स्वतंत्र होऊन इतकी वर्षे लोटली ..
"बेसुमार" म्हणून ओरडणारे..
मतदानाच्यावेळीच आपला "अबाधित मतदानाचा हक्क" विसरून -
घरातच का बरे गप्प बसून रहातात - ?
बेसुमारीला बराचसा आळा घालणे,
आपल्या बोटाच्या शाईवर अवलंबून आहे -
असे मला तरी वाटते .
तुम्हाला ? ? ?
.
मिसळपाव
दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी माझ्या मुलीच्या विद्यानिकेतन शाळेत पालक सभेच्या निमिताने जाण्याचा योग येतो. एका चांगल्या आणि नावाजलेल्या शाळेत माझ्या मुलीला प्रवेश मिळाला आणि तिची शैक्षणिक प्रगती सुरु झाली. या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेचे सगळे सोपस्कार पूर्ण करून ज्यांना प्रवेश मिळतो त्यांचे पालक कृतकृत्य होतात आणि ज्यांना मिळत नाही ते नेहेमी प्रमाणे त्यांच्या कार्यप्रणालीला नावे ठेवतात. विद्यानिकेतन शाळा तशी डोंबिवलीच्या गजबजाटापासून लांबच.