Skip to main content

जीवनमान

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 09/04/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

गच्ची

लेखक वडापाव यांनी शनिवार, 09/04/2016 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
घरी वायफाय सुरू झाल्यापासून गच्चीत जाणं कमी झालंय. दुपारी तासन् तास गच्चीत पिलरच्या आडोशाला बसून गाणी ऐकावी, पुस्तकं संपवावीत, आणि सगळ्याचा कंटाळा आला की लहान मुलासारखं कल्पनाविश्वात रममाण व्हावं असा नित्याचा क्रम असायचा. तहान-भूक लागली, लघवी-परसाकडण्याची घाई आली, तरी तिथून पाय निघत नसे. घरून फोन यायचा, 'जेवलायेस का? ये खाली.' दहा मिनिटांत येतो सांगून आणखी अर्धा तास काढायचो. उन्हं मवाळ झाली की वर टाकीवर जाऊन बसावं. समोर नॅशनल पार्काच्या डोंगररांगांवरच्या ऊनामुळे बदलणा-या हिरव्या छटांची तुलना करत बसावी. कावळ्यांची शाळा भरते असं म्हणवत नाही.

शतशब्दकथा : सर्टिफिकेट

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 08/04/2016 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्धने कपाटातून फाईल काढली. नकळत स्मिताच्या एकेका सर्टिफिकेटवरुन त्याची नजर फिरत होती. दहावी, बारावी, एम बी बी एस्, एम डी सगळ्या परीक्षांत अव्वल यश. परीक्षांशिवायही काही सर्टिफिकेट्स होते अंताक्षरी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि खूप काही कसल्या कसल्या परीक्षा , पेपर प्रेजेंटेशन्स. स्मिताने मेहनत करुन घवघवीत यश मिळवावं आणि घरी येवून बाबाला प्रेमळ आज्ञा करावी "बाबा..माझं सर्टिफिकेट फाईल करशील ना प्लीज"..आपल्या लाडक्या लेकीचं प्रत्येक नवीन सर्टिफिकेट फाईल करताना तो नेहमीच पुर्ण फाईल पुन्हा पुन्हा बघत रहायचा. थरथरत्या हाताने त्याने स्मिताचं शेवटचं सर्टिफिकेट फाईल केलं.

झब्बूशाहची पोरगी - खलिल जिब्रान

लेखक तर्राट जोकर यांनी गुरुवार, 07/04/2016 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
झब्बूशाहची पोरगी - खलील जिब्रान सिंहासनावर झोपलेल्या म्हातार्‍या राणीच्या आजूबाजूस चार गुलाम पंखा हलवत होते.

राजाराम सीताराम एक .................. आस्थेचे बंध...................भाग १६

लेखक रणजित चितळे यांनी शनिवार, 02/04/2016 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे.......... राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश. राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस. राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १. राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २. राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस. राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट. राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर. राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा. राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १. राजाराम सीताराम....... भाग १०. एक गोली एक दुश्मन।.... भाग २. राजाराम सीताराम....... भाग ११.

भारताचा दैवाधिन पारंपरिक शेतकरी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/04/2016 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचा दैवाधिन पारंपरिक शेतकरी - डॉ. सुधीर रा. देवरे भारताचा शेतकरी कधी आधुनिक होईल? भारताच्या शेतकर्‍याची स्थिती इतकी दयनिय होण्याची कारणे काय? दुष्काळात शेतकर्‍यांकडे आत्महत्येशिवाय पर्याय का नसतो? पाऊस नसला तर शेतकरी हातपाय गाळून का बसतो? गारा पडल्या, अवकाळी पाऊस झाला तर शेतकरी इतका हवालदिल का होतो? आपला शेतकरी इतका परावलंबी का आहे? इतका दैवाधिन का आहे? इतका पारंपरिक का आहे? इतका कर्जबाजारी का आहे? त्याला कर्जावू परिस्थितीवर मात का करता येत नाही? असे असंख्य प्रश्न शेतकर्‍यांच्या बाबतीत विचार करताना उद्‍भवू लागतात. खरं तर भारतातील सर्व शेतकर्‍यांपुढील समस्या सारख्याच नाहीत.

काळ असा.......

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 01/04/2016 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
[अरबी साहित्यातील निजार कब्बानी या नामवंत सिरीयन कवीच्या काही कवितांचा स्वैर अनुवाद! त्यातील ‘ A Lesson in Drawing!’ या कवितेचा अनुवाद मिपाकरांसाठी! बाकी माहिती Google वर आहेच!] माझ्या मुलाने माझ्यासमोर रंगांचा बॉक्स ठेवला, म्हणाला, ‘बाबा, पक्ष्याचे चित्र काढा ना!’ मी करड्या रंगात ब्रश बुडवला, गज आणि कुलूपांनी बंदिस्त असा एक चौकोन काढला. त्याने आश्चर्याने डोळे विस्फारले, ‘............. पण बाबा, हा तर तुरुंग आहे!

माझी भाजीवाली – सखी, शिक्षिका!

लेखक उल्का यांनी गुरुवार, 31/03/2016 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
रोजचीच धावपळ, लगबग असते. परंतु आज मात्र निवांत वेळ होता आणि मुख्य म्हणजे मी उशीरा गेल्यामुळे आज तिच्याकडे गर्दी नव्हती. मला उशीर झाला की तिच्या कडची भाजी संपलेली असते. आज तशी बरीच शिल्लक होती. तेच खरे निमित झाले आजच्या संवादाला आणि उलगडला एकां कष्टकरी स्त्रीचा रोजचा दिवस. माझ्यासाठी ती ‘ए ताई’ आणि तिच्यासाठी मी ‘अहो ताई’. दोघीनाही एकमेकींचे नाव माहीत नाही. अर्थात, त्यावाचून काही अडलेही नाही. गेल्या कित्येक दिवसांचा शुद्ध व्यवहार आमचा. भाजी घ्यायची आणि रोख पैसे द्यायचे. तेसुद्धा घासाघीस न करता. तरीही त्या व्यवहाराला देखील एक अदृश्य अशी भावनिक झालर असतेच. नकळत जोडलेली.

बचपन के दिल भुला न देना .......१

लेखक शान्तिप्रिय यांनी बुधवार, 30/03/2016 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
बचपन के दिन भुला न देना आज हसे कल रूला न देना ------------------------- एक सामान्य लेख बालपणाच्या आठवणीवर लिहित आहे. बालपणीच्या आठवणी हा निश्चितच प्रत्येकासाठी एक अनमोल ठेवा असतो. मग मी त्याला अपवाद कसा? आज नोकरी , ऑडीट ,मिटींग अप्रैजल अशा रुक्ष गोष्टीनी आपल जग व्यापून गेले असताना या आठवणी निश्चितच आपल्याला एक सुखद गारवा देउन जातात. प्राथमिक शाळेत असतानाचे वय म्हणजे , आई बाबांच्या लाडात तसेच तितक्याशा महत्त्वाच्या नसलेल्या शाळेत (त्या काळी ८० च्या दशकात) बागडण्याचे दिवस.

सोशल नेटवर्क?

लेखक राजू यांनी बुधवार, 30/03/2016 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
'डॉक्टर,आजकाल झोप व्यवस्थित होत नाही.जेवण जात नाही दिवसभर नुसते डोके दुखत राहते.' 'बरं पोट निट साफ होते का?' 'नाही ना डॉक्टर.' 'मी काही टेस्ट लिहून देतो त्या करून घ्या पण त्या अगोदर १५ दिवस रोज सकाळी उठल्यावर प्रातर्विधी अगोदर आणि नाष्टा झाल्यावर दैनंदिन कामाला सुरुवात करे पर्यंत दोन्ही हातांची अंगठा आणि त्याच्याशेजारची दोन बोटे अशी तीनही बोटे एकत्र गुंफून बसायचे दिवसभरात असा निवांत वेळ मिळाला कि १५ दिवस हा प्रकार करायचाच आहे हे लक्षात ठेवा.' ' डॉक्टर याने काय होईल?' 'मी ते १५ दिवसानंतर सांगतो ओके. आणि महत्वाची सूचना देतो यात अजिबात कंटाळा करायचा नाही कारण यानंतरच आपल्याला सर्व टेस्ट करा