Skip to main content

जीवनमान

माझा "वाचक" मित्र आणि मी!!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 29/03/2016 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
"निमिष, तू स्वत:ला काय मोठा तत्त्वज्ञानी समजतोस की काय?" माझ्या एका जुन्या परम मित्राने मला एकदा चिडून विचारले. मी हसून म्हणालो, "का रे मित्रा? असे तुला वाटण्याचे कारण काय बरे?" आम्ही पुण्यातल्या एका उपाहारगृहात मस्त अमृततुल्य चहा घेत होतो. हा मित्र दहा वर्षानंतर प्रथमच मला प्रत्यक्ष भेटला होता. मित्र चहाचा घुरका घेत म्हणाला, "कारण रोज मी पाहतो, सोशल मीडीयावर विशेष करून फेसबुक आणि व्हाटसएप वर किंवा इतर मराठी वेबसाइटवर तू सतत ज्ञान पाजळत असतोस. आपण हे करायला हवे, आपण ते करायला हवे असे सांगत असतोस. मोठमोठे लेख लिहितोस. इतर मेसेज जास्त फॉरवर्ड न करता बहुतेक वेळा स्वत:च लिहीत असतोस.

घी देखा पर ......... ...... .........

लेखक पुणे मुंग्रापं यांनी रविवार, 27/03/2016 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत ग्राहक संरक्षण कायद्याच्या मदतीने ग्राहकांनी कसा न्याय मिळवला याच्या काही सत्यकथा आतापर्यंत आपण वाचल्या. मात्र आजची कथा त्यापेक्षा निराळी आहे. या कायद्याचा दुरुपयोग व्यापारी, उत्पादक तसेच सेवा पुरवणारे इ. ना त्रास देण्यासाठी किंवा 'एखादा जुना हिशोब चुकता करण्यासाठी' केला जाऊ नये अशी तरतूदही या कायद्यात केलेली आहे, हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहे.

हॅप्पी बर्थडे व.पु.

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 25/03/2016 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
'One for the road' असलेल्या या जगात कायम 'जेके मालवणकर' सारखं जगण्याची प्रेरणा देऊन माझ्या 'पार्टनर' असलेल्या 'सखी' शी कायम प्रामाणिक राहण्याची शिकवण देणारा 'दोस्त' म्हणजे व.पु. तुला माहितीये गेल्या वर्ष भरात कित्येक जणांनी 'रंग मनाचे' दाखवलेत. या दुनियेच्या 'भूलभुलैया' मध्ये 'माझं माझ्यापाशी' काहीच राहिलेलं नसताना मनात प्रेरणेचा 'हुंकार' भरून या 'तप्तपदी' वर चालण्याचं बळ तूच दिलंस. तुझ्या प्रत्येक शब्दांत एक जादू भरलेली आहे, जी जगण्याची अखंड प्रेरणा देत राहते.

आक्की

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 23/03/2016 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
आक्की आली. फटफटीवर बसून. साधं वळून बघितलं पण नाही. फटफट गेली पुढे. पाठीमागं धूरच धूर. मग आमची गाडी काढली. क्रेट बांधलं. बाप म्हणाला बारक्यालापण घीऊन जा. मग बसलो मागं. गाडी पळाली. कॅनालच्या कडंला पत्र्याचं शेड. शेडमधी बाटल्याच बाटल्या. मिरींडा न पेप्सी. भरली क्रेटमधी. मग क्रेट घेऊन पुन्हा गाडीवर. क्रेटचा बॉटम मांडीत रुतला. गाडी निघाली भुरभुरभुरभूर. परत आल्यावर आक्की कुठं दिसली नाही. आधी कसं वाळूच्या ढिगाऱ्यावर. तवा तिचं लगीन नव्हतं झालं. पोरांना दगडं फेकून मारायची. वाळूचा ढिगारा तिच्या बानं आणून ओतलेला. पोरं चिडीचूप. शाळेत जायची सकाळीच. सायकलीवर. कराटे शिकायला. लाथा झोडायची.

भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?

लेखक गॅरी शोमन यांनी बुधवार, 23/03/2016 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.

ओला कॅब्जचा नवा फंडा : रायडींग चार्जेस

लेखक विवेक ठाकूर यांनी मंगळवार, 22/03/2016 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
परवा ओलाची कॅब बुक केली तेंव्हा बिलात किलोमीटर चार्जेस बरोबर रायडींग चार्जेस लावून बील आलं. हे चार्जेस म्हणजे तुम्ही जितका वेळ प्रवास केला तितक्या मिनीटांसाठी एक रुपया प्रती मिनीट इतकी रक्कम. मी तक्रार दाखल केली आणि त्यांना कळवलं की एकतर तुम्ही किलोमीटर्सप्रमाणे चार्ज करा किंवा ट्रॅवल टाईमप्रमाणे चार्ज करा. खरं तर किलोमीटर्स प्रमाणे चार्ज केल्यावर रायडींग टाईमचा प्रश्नच येत नाही. वेटींग चार्जेस वेगळे लावले जातात ते मान्य आहेत कारण तेवढा वेळ तुमची कॅब डिटेन झालेली असते पण रायडींग टाईम हा सर्वस्वी ट्रॅफिक सिच्युएशनवर अवलंबून आहे आणि त्यात कस्टमर्सचा काहीएक हात नाही.

मला आता वाटते की माझा फोटो नकोच.

लेखक विदेशी वचाळ यांनी गुरुवार, 17/03/2016 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
तसा मी कधीच फोटो जेनिक नव्हतो. जन्मा नंतर शक्यतो सगळे जण फोटो काढतात . पण माझ्यावेळी आमच्याकडे काळा पांढरा फ्लाष नसलेला कामेरा असल्यामुळे तो पण काढला नसावा. म्हणजे तो नाही आहे , अणि त्याचे करण तसे असावे असे वाटते . लहानपणी माझी संभावना "तेल्या मारुती" अशी झाली होती ते मला पक्के आठवते . मी मारुती सारखा केवळ त्या एका गोष्टी साठीच दिसायचो . तसे मला टुमदार पोट होते. मारुतीला मोठे पोट होते का नाही ते आठवत नाही. आमच्या वर्गातल्या मारुतीला भरपूर मोठे पोट होते. पण ह्या मारुतीचा त्या मारुतीशी नावापालीकडे काहीच संबंध नव्हता. ते काहीही असो पण , तेल्या असल्यामुळे फोटो कमीच!

चाळीतील आठवणी------भाग ४

लेखक भिंगरी यांनी मंगळवार, 15/03/2016 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीतील आठवणी भाग १,, पावसाळ्यात चाळीतल्या मुलींना घराबाहेर जास्त पडायला मिळायचे नाही.घराच्या छतावरून पडणार्‍या पाण्याच्या पागोळ्या पकडणे, अंगणातून वाहणार्या पाण्यात कागदाच्या होड्या करून सोडणे,अर्थात तेही पायरीवर बसूनच,व्हरांड्यात चीपर्‍या खेळणे असे असे सगळे बंदिस्त खेळा खेळायचो.