Skip to main content

जीवनमान

प्रश्न मधमाश्या आणि मिपा मोहोळ

लेखक नाखु यांनी शनिवार, 07/05/2016 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
अनुभव आणि पुढच्यास ठेच मागचा शहाणा "नाही नाही ही कुठलीही प्रश्न मंजुषा नाही की सैराट बद्दल महाचर्चासाठी काढ्लेला धागा नाही.

आता वाटली ना काळजी ?

लेखक श्वेताली कुलकर्णी यांनी गुरुवार, 05/05/2016 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑफिसला जाण्यासाठी दोघांना गडबड होती म्हणून तो तिला म्हणाला कि आज डबा राहू दे बाहेरच खाऊ काहीतरी ! तसेही ती पण त्याच्या सोबत बाहेर पडत असल्यामुळे त्याला तिला त्रास द्यायला आवडायचे नाही पण त्याच्या साठी डबा बनवायला तिला खूप आवडायचे , पण आज गडबडीमुळे दोघेही लवकर बाहेर पडले , त्याचे ऑफिस एकीकडे आणि तिचे एकीकडे त्यामुळे सोबत हि फक्त स्टेशन पर्यंत असे तिथून वेगळे रस्ते .. ती ऑफिसला पोहचली आणि त्याचा मेसेज आला, "reached n u ? " ती त्याला उत्तर देत होती तोच तिला client call आला त्यात ती बिझी झाली , मेसेज करायला विसरली .

झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन

लेखक तर्राट जोकर यांनी गुरुवार, 05/05/2016 04:17 या दिवशी प्रकाशित केले.
झोपडपट्टीतले दिवस: भाग एक मला कळायला लागलं तेव्हाचं आठवतंय. आम्ही एका सुंदर कॉलनीत राहत होतो. मी जवळच्या प्लेगृपमधे जात होतो. ही कॉलनी किती सुधारलेली होती हे लक्षात येईल. कारण ८३-८४ च्या काळातच इथे प्लेगृप ही संकल्पना होती. छान खेळणी वैगरे असायची तिथे. गणवेषही होता. इंग्रजी पोएम्स होत्या. साडेचार वर्षाचा असतांना, गणवेषात १८-२० मुलांसोबत बाई मध्ये खुर्चीवर बसलेल्या अशा फोटोत मी चौथ्या नंबरला मागच्या रांगेत उभा होतो. माझा जीवलग मित्र खाली बसला होता. बरीच वर्षे जपून ठेवला होता तो फोटो. त्या कॉलनीत आमचं भाजीचं दुकान होतं.

अडगळ

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 03/05/2016 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
'मोहरा' पिच्चर आणला तवाची गोष्ट. मोकळं मैदान गाठून, शंकराच्या दगडी देवळाच्या बाजूला टेबल मांडून, त्यावर टिवी ठेऊन पिच्चर दाखवायची व्यवस्था केली ती दाद्यानं. हा दाद्या उधळ्या माणूस. एक म्हणता तीन तीन पिच्चर आणणारा. गणपतीची वर्गणी पुरली नाय तर स्वताचे शे-पाचशे घालून हौसमौज करणारा. तर त्या दिवशी त्यानं ग्यांगला सरप्राइज म्हणून एक दोन बीपी ची पण कॅसेटं आणलेली. रात्री ऐश करायची म्हणून गावठी दारुपण त्यानं तयार ठेवली होती. तर अशी सगळी व्यवस्था करुन दाद्या गुटख्याच्या पुड्या फोडत व्हीसीआर वर चित्र आणण्याची खटपट करणाऱ्या पोरांना उगाचच आयबहीनीवरनं शिव्या घालत होता.

आजोळ

लेखक श्वेताली कुलकर्णी यांनी रविवार, 01/05/2016 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे आमची परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संपली कि आजोबा आम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलेच असणार , उन्हाळ्याची सुट्टी म्हणले कि आमचे ठरलेले ठिकाण येळावी माझे आजोळ . कवठे महांकाळ ते येळावी दीड दोन तासाचा प्रवास , तासगाव मधून गाडी बदलावी लागत असे मी एकीकडे आजोबा मध्ये आणि दीदी दुसरीकडे असा आमचा प्रवास . गाव तसे लहान होते पण आजोबांना मानणारे लोक खूप , त्यामुळे जोशीबुवांची नातवंडे म्हणून आमचीही मजा असे .

वाबळेवाडीची शाळा - विलक्षण प्रेरणादायी अनुभव

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 29/04/2016 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा: http://www.apurvaoka.com/2016/04/wablewadi-school-visit-inspirational.h… ज्या शाळेतून मुलांचा पाय निघता निघत नाही, त्या शाळेला भेट दिल्यावर आमचेही पाय तिथून निघत नव्हते. वाबळेवाडीच्या शाळेबद्दल इंटरनेटवर वाचल्यापासून ती शाळा बघण्याची खूप इच्छा आणि उत्सुकता होती. एका नकोनकोशा वाटणा-या शाळेतून एका हव्याहव्याशा शाळेत झालेलं तिचं रुपांतर आम्हाला बघायचं होतं. तिथली नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती समजून घ्यायची होती. तिथल्या मुलांशी, त्यांना घडवणा-या शिक्षकांशी आम्हाला बोलायचं होतं.

भारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा - IRNSS

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 28/04/2016 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
मागे GPS वर लिहिलेल्या लेखात संपूर्ण भारतीय बनावटीच्या ग्लोबल पोजीशानिंग सिस्टिमचा उल्लेख केला होता. त्यात म्हटलेल्या आयआरएनएसएस (IRNSS) प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणालीने आज एक मैलाचा दगड पार केला.

सध्या आरसीसी बांधकामाचा खर्च काय आहे ?,तो कसा कमी करता येईल.?

लेखक चंद्रनील मुल्हेरकर यांनी मंगळवार, 26/04/2016 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या तीन गुंठे क्षेत्रफळ असलेल्या प्लॉटवर मी आरसीसी घर बांधणार आहे,घराचे एकूण क्षेत्रफळ १००० स्केअर फूट असणार आहे.मी तालुका प्लेसवर राहतो,माझे काही प्रश्न आहेत १. प्रती चौरस फूट बांधकामाचा खर्च सध्या कीती येतो? २. हा खर्च कमी करण्यासाठी काय करता येईल? ३. घर बांधतानाचे मिपाकरांचे अनुभव काय आहेत ? ईतर काही दुर्लक्षीत पण फायद्याचे अनुभव व आयडीया असतील तर तेही सांगा .धन्यवाद.