Skip to main content

इतिहास

आमचाही पाउस.....

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 26/07/2015 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच. काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले. फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...

तपश्चर्या ऑउटसौर्स – कथा सत्यव्रताची

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 24/07/2015 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या पिढीचे ब्रीद वाक्य, आम्ही आमची अधिकांश कामे ऑउटसौर्स करून घेतो. मोबाईल/ ऑन लाईन वरून सर्व कामे होतात. आम्हाला काहीही करावे लागत नाही. भाजीपाला, किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक समान इत्यादी घरात लागणारे सर्व साहित्य, घरी बसल्या-बसल्या मिळतात. सौप्या भाषेत, आपले कामे दुसर्या कडून करवून घेणे म्हणजे ऑउटसौर्स. जगाला नवीन असली तरी आपल्या देश्यात ऑउटसौर्सची परंपरा फार जुनी आहे. पण ऑउटसौर्सचा कधी कधी काय परिणाम होतो.... एके काळी इक्वाषु वंशात सत्यव्रत नावाचा एक राजा झाला होता. त्याला सदेह स्वर्गात जायचे होते. आता स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल तर घोर तपस्या करावी लागते.

आधार (शतशब्दकथा)

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 24/07/2015 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
(डिसक्लेमर: सदर कथा ही सत्यघटनेवरून जरी प्रेरित असली, तरी, भारतातील कोणत्याही जिवंत अथवा मृत, व्यक्ती/संघटना/घटना यांच्याशी त्याच्या काहीही संबंध नाही.) डोकी भडकतील, अशी अतिरंजित भाषणे करून, दिशाभूल घडवणे, नंतर तरुणांच्या हातून दंगली, नरसंहार सारख्या घटना, घडवून आणणे, ही प्रविण बुगाडियाची स्पेश्यालीटी. धर्मरक्षणाचा गदर करून, विश्वधर्म-परिषदेवर, स्वतःची पकड मजबूत केलेली.

( स्टार्कची लेकरे )

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 23/07/2015 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यात राजसिंहासन-क्रिडा* शी संबंधित, दिव्यपटलावर काही दृष्टांत बघत होतो. (*ह.ब.ओ.उक्त राजसिंहासन प्राप्त्यर्थम्, प्राप्तसिंहासन चीरकाल संरक्षणार्थम्, अंतर्बाह्यरिपू नाशार्थम् पातकक्रिडा. इतिः हिम अग्नी सुगमगीत ) जाणकारांमध्ये विंटरफेलचा सुभेदार, उत्तरदिगरक्षक स्वामी एडार्ड स्टार्कच्या लेकरांसंदर्भात बरेच मतभेद असले तरी एका बाबतीत एकवाक्यता आढळते की जॉन स्नो हा स्टार्क वंशाशी संबंधित होता. राजसिंहासन-क्रिडा* मुळात वास्तवात घडले की नाही ही चर्चा आपण तुर्तास बाजुला ठेउयात.

जुन्या काळातील वेतन श्रेणी आणि इमान

लेखक पाटीलअमित यांनी बुधवार, 22/07/2015 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
मला सहज एक प्रश्न पडला आजच्या काळात खासकरून खाजगी मध्ये लोक गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीसाठी जुन्या नोकरीला लाथ मारतात, तसे आधी मोठ्या प्रमाणावर का होत नसावे ? १) शिवाजी महाराज vs मुघल मुघल केव्हाही जास्त पगार देऊ शकत होते तरी इब्राहीम गारदी मराठ्यामध्येच टिकून होता, सरदार फितवल्याच्या इतिहासात नोंदी आहेत.

सुर्याची लेकरे

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 22/07/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यात महाभारताशी संबंधित काही लेख वाचत होतो. जाणकारांमध्ये महाभारत कालासंदर्भात बरेच मतभेद असले तरी एका बाबतीत एकवाक्यता आढळते की महाभारताचे युद्ध ऑक्टोबर महिन्यात घडले. (त्यावेळेस ख्रिस्ती कालगणना अस्तित्वात नव्हती पण लोकांना नीट समजावे म्हणुन ऑक्टोबर लिहिण्याची पद्धत आहे.) महाभारत मुळात घडले की नाही ही चर्चा आपण तुर्तास बाजुला ठेउयात. पण बाकीच्या तारखांबद्दल एकुणात गोंधळच आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट इतक्यात वाचली की कृष्णाचा जन्म २७ जुलैचा. ही तारीख काढण्यामागची अनेक कारणे त्या लेखात दिली होती. मला त्यात फारसा रस नव्हता पण तो लेख वाचता वाचता महाभारतावर एक लेख लिहायचा विचार पक्का केला.

अणुयुद्ध (शतशब्दकथा)

लेखक सटक यांनी रविवार, 19/07/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेकडुनीचा सूर्य, चन्द्र हतवीर्य, बुडाले बेट.. रक्तील दिलासे अर्घ्य, काहीना वर्ज्य, यमाची भेट !! त्या कितीक पडल्या रती, मदन संगती, जीव तो स्वस्त.. युद्धाची वाढे गती, नवे संगती, दुखवले दोस्त !! केलेच पाहिजे अता, शांत राहता, शेण तोंडात... जमवून खुळे ठरवता, गिधाडी जथा, घडे आक्रित !! अणुरेणू फुटाया आले, भरून घेतले, निघाले गगनी... बोटात वीष साठले, बटन दाबले, थरारे अवनी !! आकाशी फुलले झाड, मिळेना पाड, सुटेना गुंता... त्या जहरफुलाचे वेड, जीवाची राड, हलेना चिंता !! कित्येक चिरडले देह, धनाचा मोह, गळेना आता.. पसरला धरेवर डोह, तयाचा टोह, न लागे पुरता !! क्षणभरात सरले युद्ध, वारला बुद्ध, लपविती त

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

लेखक राजघराणं यांनी शनिवार, 18/07/2015 02:16 या दिवशी प्रकाशित केले.

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही - तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माची चिकित्सा केली आहे . धर्म चिकित्सेशिवाय प्रगती अशक्य आहे. हि चिकित्सा तटस्थ भूमिकेतून आहे - त्यामुळे ती चींतनिय आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच शब्दात त्यांची इस्लाम धर्म विषयक मते या लेखात पाहूया .

आमची(ही) निष्काम साहित्यसेवा : पूर्वप्रकाशित

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 17/07/2015 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक झुक्याच्या थोबडापुस्तकाने दोन-तीन वर्षांपूर्वी लिहीलेल्या एका लेखाची आठवण करून दिली. हा लेख त्यावेळी देवकाकांच्या होळी विशेषांकासाठी लिहीला होता. त्यामुळे तो अंक आनि माझा ब्लॉग सोडला तर इतरत्र कुठेच प्रकाशित केल्याचे आजतरी आठवत नाहीये. म्हणून हा जुनाच लेख आज पुन्हा मिपाकरांसाठी इथे पोस्ट करतोय. कोणी आधी वाचला असेल तर क्षमस्व ! ************************************************************************** लिहायला सुरूवात करून आता बरीच वर्षे झाली. आधी आम्ही काय लिहीतोय हे कुणालाच कळायचं नाही…..(कधी कधी आम्हालाही नाही)! कारण आमचे लेखन नेहमीच कधी चि.वि., कधी द.मा.