Skip to main content

जुन्या काळातील वेतन श्रेणी आणि इमान

Published on बुधवार, 22/07/2015
मला सहज एक प्रश्न पडला आजच्या काळात खासकरून खाजगी मध्ये लोक गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीसाठी जुन्या नोकरीला लाथ मारतात, तसे आधी मोठ्या प्रमाणावर का होत नसावे ? १) शिवाजी महाराज vs मुघल मुघल केव्हाही जास्त पगार देऊ शकत होते तरी इब्राहीम गारदी मराठ्यामध्येच टिकून होता, सरदार फितवल्याच्या इतिहासात नोंदी आहेत. पण क्वचितच सैन्यातले सैनिक मोठ्या संखेने पक्ष बदल करताना बघितले, त्याउलट शिवाजी राजे यांनी बरेच किल्ले किल्लेदारांस फितवून मिळावले आहेत २) बाहुबली तशी मिथ्या कथा ,पण जेव्हा काल्केल्याचा गुप्तहेर पकडला जातो तरी पण त्यांचे बरेच गुप्तहेर असतात (त्यांना आधीच माहित असते दोन भावांपैकी जो मारेल त्याला राजा करणार) पण त्याला शोधायचा प्रयत्न केला जात नाही, हे जेवढे पण गुप्तहेर असतात ह्यांना माहित असते अख्खे राज्य, बायका पोरे नष्ट होणार तरी पण इमान का विकतात ? शत्रू थोडा सहृदय असता तर गोष्ट वेगळी.
लेखनविषय:

याद्या 6908
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

लोभ, भीती आणि विचार हे प्रोत्साहनाचे आधारभूत मुद्दे आहेत. यातील सर्वात कमी प्रभावशाली मुद्दा हा लोभ हा असून विचार हा सर्वात जास्त प्रभावशाली मुद्दा आहे. मला वाटते कुणीही मनुष्य कुठलेही कार्य करण्यास उद्युक्त का होतो ह्या प्रश्नाचे उत्तर इथे दडलेले आहे.

मी software मध्ये आहे,आमच्याकडे विचार नावाची गोष्ट नसतेच,पाट्या टाकत असतो सगळे भीती फक्त apprisal ची असते ,पण ते नीट नाही झाले तर लगेच पुढची कंपनी दर उघडून उभी असते राहतो फक्त लोभ

In reply to by पाटीलअमित

मी software मध्ये आहे,आमच्याकडे विचार नावाची गोष्ट नसतेच,पाट्या टाकत असतो सगळे भीती फक्त apprisal ची असते
अर्र र्र !! सगळे software वाले अशेच असतात काय ?

शिवाजी राजे यांनी बरेच किल्ले किल्लेदारांस फितवून मिळावले आहेत. .... म्हणजे मोघलांपेक्षा जास्त पगार देऊनच ना ?

In reply to by पाटीलअमित

सरदार फितवला की सैन्य आपोआप फितते. रामाने सुग्रीवाला वश केला. दिल्लीच्या बादशाने पेशव्याना वश केले. मोदी व पवार .......

In reply to by dadadarekar

१) तेव्हा सैन्य वालीचे होते ,त्याला मारावेच लागले २) दिल्लीच्या बादशाने पेशव्याना वश केले. ? कि पेशव्यांनी त्याला तख्त बहाल केले ? ३) पवारांना वश करणे अशक्य

In reply to by dadadarekar

दिल्लीच्या बादशाने पेशव्याना वश केले. होशियार, खबरदार ! नविन इतिहास लिहीला जात आहे !! चालूद्या, कोणीतरी मनोरंजन करायला हवेच आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मी नाही लिहिले मी नाही लिहिले मी नाही लिहिले मी नाही लिहिले मी नाही लिहिले मी नाही लिहिले मी नाही लिहिले

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तो उल्लेख पानिपतबाबत होता ! रामाने सुग्रीवाला राज्याचे आमिष देऊन त्याची सेना रावणाविरुद्ध वापरली. प्रत्यक्ष अयोध्येचे सैन्य मात्र अयोध्येतच होते. बादशाने पेशव्याना चौथाइइचे आमिष दाखवुन पानिपतात धाडले. बादशाचे किती लोक गेले होते ? ....... तात्पर्य ... माकडाचा माणूस झाला तरी दक्षिणी लोकांचा बुद्ध्ह्यांक तितकाच आहे. ! इस्लामप्रेमी व मोघलभक्त दादाखान

शिवाजी महाराज vs मुघल
हे उदाहरण तितकेसे पटले नाही. आजही समजा चीन भारतीय सैन्यापेक्षा जास्त पगार देणार असेल तर भारतीय सैनिक चीनच्या सैन्यात थोडी सामील होतात? पूर्वीच्या काळी शेतमजूर एक शेतकरी सोडून दुसर्‍याकडे जास्त पगारासाठी जातच नव्हते का?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

इग्रजांचा अंमल होता तेव्हा मोठ्या संखेने युद्ध बंदी जपान च्या बाजूने गेले ,पण तेव्हा सुटकेच्या आशेचा लोभ होता

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

मग असे नसेल असे तुम्हाला वाटते का ? उघड उघड नसेल पण पैसा भेटतो म्हणुन भारतात राहून चीनची चाकरी करणारे असतीलच की. आता काळाप्रमाणे चाकरीच्या पण व्याख्या बदलल्याच की..

१) शिवाजी महाराज vs मुघल मुघल केव्हाही जास्त पगार देऊ शकत होते तरी इब्राहीम गारदी मराठ्या मधेच टिकून होता
काही ऐतिहासिक गडबड आहे का? इब्राहिमखान गारदी १७५८-१७६१ या काळात पेशव्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. तो पानिपतात पडला. सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी निजामाविरुद्ध युद्ध करताना त्याचा डी बुसी नावाच्या फ्रेंच मनुष्याने चालवलेला तोफखाना पाहिला आणि प्रभावित झाले. डी बुसीला आपल्या बाजूला वळवून घ्यायला त्यांनी त्यांच्या तोफखान्याचे सरदार महिपतराव पानसे यांना पाठवलं. महिपतरावांना डी बुसीला पेशव्यांच्या बाजूला वळवून घ्यायला जमलं नाही, पण त्याच्या खालोखालच्या अधिकार्‍याला - म्हणजे इब्राहिमखान गारद्याला - मात्र निजामापेक्षा अधिक आणि वेळेवर पगाराचं आमिष दाखवून घेऊन आले. पानिपताच्या ऐन झुंजाच्या आदल्या महिन्यापर्यंत गारद्यांच्या तोफखान्याचा पगार (जो इतर लष्करापेक्षा मुळातच जास्त होता) वेळेवर होत असे. इतर मराठी लष्कराला ते सलत असे अशा तत्कालीन पत्रव्यवहारात नोंदी आहेत. (**माझ्या आठवणीप्रमाणे - संदर्भ पाहून लागली तर दुरुस्ती करेन)

In reply to by आदूबाळ

मराठा -पेशवे एक समजावे माझ्या आठवणी प्रमाणे पानिपत मध्ये त्याचे हाल हाल करून मारले कारण नंतर कितीही आमिषे दाखवली तरी त्याने इमान बदलले नव्हते

In reply to by पाटीलअमित

खाजगी कंपन्यांचे मालक जर कामगारांना खूप चांगला पगार देत असेल तर मुळात त्याला नोकरी सोडायची "फारशी" गरज पडणार नाही! आपल्याकडे शक्य तितक्या कमी पगारात नोकरी द्यायचे पाहिले जाते, मग कामगाराने जास्तीत जास्त पगार देणारी नोकरी शोधली तर काय चुकले? जर अनुभवाच्या तुलनेत योग्य पगार असेल तर बाहेर कुठेही त्यापेक्षा जास्त पगार मिळणे कठीणच असते! इथे इमान वगैरे आणणे हास्यास्पद आहे! मुळात नोकरी बदलण्याची प्रक्रिया कोणासाठी आनंदाची नसते(पगारवाढ सोडली तर!) आणि कृपया software मध्ये काहीही विचार लागत नाही असे समज पसरवू नका!

In reply to by पाटीलअमित

का म्हणून एकांगी विचार करायचा ? आजच्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या स्पर्धात्मक युगात "इमानदारी" ही एकतर्फी गोष्टच अस्तित्वात नाही. आणी जर स्पर्धात्मक खुल्या अर्थव्यवस्थेत कोणी फक्त मालकाच्या नजरेतुन विचार करत असेल तर.... If you want loyalty.. hire a dog

In reply to by पाटीलअमित

मालक खर्चकपातीसाठी नोकरीवरून काढतांना कोण किती लॉयल आहे याचा विचार करतो का की एक्सेलशीटमधल्या स्टॅटीस्टीक्सचा विचार करतो? परफॉर्मन्स भंगार असतांना फक्त लॉयल आहे म्हणून कोण मालक कामावर राहू देईल का? आजच्या जमान्यात जगा राव! एक हात से दे दुसरे से ले. दोन्ही बाजूने शुद्ध व्यवसाय आहे. लॉयल्टी फक्त कामापुरती असावी.

कोणीतीही कंपनी loyal बघतेच ,HR मध्ये माझे बरेच मित्र आहेत समजा तुम्ही बर्याच कंपनी change केल्या तर लगेच reject मारत असतात

In reply to by पाटीलअमित

याच्या उलट स्थिती पण असू शकते. आमच्या वडिलांनी जमनालाल बजाज मधून व्यवस्थापन केल्यानंतर २३ वर्षे एका औषध कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम केले. पण जेंव्हा मालक बदलले तेंव्हा त्यांनी राजीनामा दिला आणी दुसरीकडे नोकरीसाठी गेले तेंव्हा त्यांना सांगितले गेले कि तुम्हाला फक्त एकाच कंपनीचा अनुभव आहे( VARIED EXPERIENCE नाही). म्हणजे ज्या गोष्टी ASSET समजल्या जात होत्या त्याच आता LIABILITY झाल्या होत्या. असो, कालाय तस्मै नमः

तुम्ही फारच मागे गेलात. शिवाजी आणि मुघल कशाला. अगदी १९९१-२००० पर्यंत बरेच लोक एकाच ठिकाणी राहत होते. संधी जास्त उपलब्ध झालीये आणि एकदा ते बंद झाले कि अपोआप सगळे एकाच ठिकाणी बसतील. बाहेर कोणी घेणारच नसेल तर कोण कशाला नोकरी बदलेल. अगदीच चांगली संधी मिळाली तरच.

नोकरी बदलण्यासाठी फक्त पैसा हेच कारण नसते. तुम्ही कोणत्या कंपनीत काम करता, कोणत्या हुद्द्यावर काम करता आणि किती वर्ष काम करता, तुमचे वय आणि इतर बर्‍याच गोष्टी ह्यात अंतर्भूत असतात. १) तुमचे सॉफ्टवेअरवाल्यांचे भाऊबंद हार्डवेअरवाले जेव्हा ज्युनिअर डेस्कटॉप इंजिनिअर असतात तेव्हा अगदी ५०० रु. पगारवाढ मिळाली तरी लगेच दुसरीकडे पळतात. हार्डवेअर हे एकमेव असे क्षेत्र आहे की जेथे तुम्ही १० वी नंतर ३ महिन्याच कोर्स केला तरी लगेच इंजिनिअर बनता. :) २) कुणाला कंपनीचे वर्क कल्चरशी मिळतेजुळते घेता येत नाही असे लोक दुसरी संधी मिळाली की लगेच नोकरी बदलतात. ३) कुणी आपले टीम मेंबर दुसरीकडे गेले तरी त्यांच्या मागोमाग जातात. ४) एकदा वय ३५-४० च्या दरम्यान झाले की मनुष्य शक्यतो एकाच जागी टिकून राहण्याचा प्रयत्न करतो. या वयात त्याला स्थिरता हवी असते. ५) वयाच्या ४० शी नंतर मात्र बहुधा कंपनीने हाकलून लावले तरच लोक नोकरी सोडतात. अन्यथा रिटायर्ड होईपर्यंत नाही. ६) सॉफ्टवेअरवाल्यांना दोन वर्षात ऑन साईट (म्हणजे इंडियाच्या बाहेरच बरका !) नाही पाठवले की ते लगेच दुसरी नोकरी शोधायच्या मागे लागतात. ७) सेल्सवाल्यांना कंपनीत पहिले सहा महिने नवीन आहे म्हणून धंदा मिळत नाही किंवा मिळविता येत नाही म्हणा. नंतरचे सहा महिने अमुक प्रोजेक्ट येणार आहे, तमुक कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे असे सांगून वेळ मारुन नेली जाते. एक वर्षानंतर जो पहिला वैतागतो (कंपनी किंवा सेल्सवाला) तो दुसर्‍याला लाथ मारतो. ८) अजून कित्येक उदाहरणे देता येतील पण मिपाकरांच्या बुद्धीला चालना देण्याकरीता माझी यादी येथेच संपवितो. 'देखणी बायको दुसर्‍याची' या म्हणीप्रमाणे किंवा दुरुन डोंगर साजरे या न्यायाने आपल्याला आपली नोकरी सोडून दुसर्‍याची नोकरी नेहमीच चांगली वाटते. अवांतर : मी माझ्या जुन्या कंपनीसाठी मुलाखती घेत असतांना चक्क एक विक्रमवीर पाहिला ज्याने १० वर्षांत तब्बल ५० नोकर्‍या बदलल्या होता. टीप : वरील वर्गीकरण ढोबळमानाने आहे आणि प्रत्येक गोष्टीस अपवाद असतात तसेच येथेही असतात. किंबहूना येथे अपवादच अपवाद आढळतात.