Skip to main content

इतिहास

रामायण कथा - वाली पत्नी तारा -एक कुशल राजनीतीज्ञ

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 27/06/2015 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
वाली पत्नी तारा, रामायणातील एक प्रखर व्यक्तित्व आहे. किष्किंधा नगरीची सम्राज्ञी तारा सौंदर्यवती तर होतीच, पण त्याच बरोबर वाकपटू आणि कुशल राजनीतीज्ञ ही होती. म्हणूनच वाल्मीकि ऋषींनी तिला रामायणातल्या सर्व स्त्रियांत सर्वात जास्त महत्व दिले आहे. वानर समाज पुरुष प्रधान होता. स्त्रिया केवळ भोग्य वस्तू. पतीच्या मृत्यू नंतर, त्याच्या भावाची अधीनता स्त्रीला स्वीकारावी लागत असे. इथे तर प्रत्यक्ष ज्या भावाने, तारेच्या पतीचा षड्यंत्र रचून वध केला, त्या सुग्रीवला पती म्हणून स्वीकारावे लागले. सुग्रीवची कनिष्ठ पत्नीचा दर्जा ही तिला स्वीकार करावा लागला.

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे'.....भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 24/06/2015 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १' नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे' ....भाग-२ मागीलपानावरुन... आपल्या हातातील चांदीची टोके असलेला फिल्डमार्शलचा बॅटन त्या वाळूकडे रोखत तो म्हणाला, ‘या किनाऱ्यावर आपण युद्ध जिंकणार आहोत किंवा हरणार आहोत. शत्रूला थोपविण्याची आपल्याकडे फक्त एकच संधी आहे. तो पाण्यात असेपर्यंत. त्याचा नाश हा किनाऱ्यावर उतरतानाच होऊ शकतो. आपल्याला त्यांना प्रतिकार करायचा असेल तर येथेच करावा लागेल. लँग, आक्रमणाचे पहिले २४ तास या युद्धाचे भवितव्य ठरविणार आहेत.

|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 14/06/2015 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - १ || सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - २ || सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - ३ जोशींनी अगोदर कुंजपूऱ्याचे थोडे वर्णन केले आहे. हे गाव आहे कर्नाल तहसीलमध्ये. पूर्वी गावाजवळून यमुना नदी वहात असे. पाखरांचे कुंज म्हणून कुंजपूरा. गावाल पानिपतच्या काळात मोठी तटबंदी होती. बाहेरच्या तटास तीन दरवाजे आहेत. जोशींनी त्यांचे नावे दिली आहेत कर्नाळी, महंमदी व न्यावली.

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

लेखक अजया यांनी सोमवार, 08/06/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!

बखरींची सांगाव्यांचे अन पुराणातली वांग्यांचे नवे पुराण

लेखक माहितगार यांनी रविवार, 07/06/2015 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी आत्ताच एका श्रीलंकन (?) लेखकाचा "दि काँट्रीब्युशन ऑफ श्री लंकन हिस्टॉरीकल ट्रॅडीशन टू द रिकन्स्ट्रक्शन ऑफ हिस्टरी ऑफ अँशिएण्ट इंडीया(पिडीएफ-पेपर)" ऑनलाईन वाचला. त्यातील टिकेची दखल घेण्याच्या निमीत्ताने, माझे हा नवपुराणाचा धागा बखरींची सांगी अन पुराणातली वांगी या पहिल्या पाना-धाग्या-वरून पुढे नेत आहे. मागच्या धागा चर्चेत वचन 'पुराणातील वांगी' नव्हे, तर 'पुराणातील वानगी' असे आहे हे काही जणांनी आवर्जून सांगितले.

|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 05/06/2015 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - १ || सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - २ हंऽऽ कुठेपर्यंत बरे आलो होतो आपण ? श्री जोशी यांना एक हकिकत ऐकण्यास मिळाली. ‘‘सुमारे वीस वर्षापूर्वी म्हणजे अंदाजे १९०० साली, काही मराठे उंट घेऊन या मैदानात उतरले. हे लोक दिवसा झोपा काढीत व रात्री तंबूत खणत असत. सात आठ दिवस ते खणत होते. एका दिवशी ते अचानक निघून गेले. सकाळी गुरे चारण्यासाठी जी गुराखी मुले त्या मैदानात गेली त्यांना तेथे अनेक खड्डे दिसले.

आई हिंदवी स्वराज्य स्थापू दे !

लेखक ganeshpavale यांनी गुरुवार, 04/06/2015 11:01 या दिवशी प्रकाशित केले.

☼ आई हिंदवी स्वराज्य स्थापू दे !!

जन्म घेवू पुन्हा येथे राखू स्वराज्याची लाज, मातीसाठी मरू कितीदा घेवू शपथ आज. माय मराठी जाचात भरडली मातला अनर्थ भारी, करू अभिषेक रक्ताचा आज मिळून रायरेश्वरी. पातशाहीचा बिमोड करू राखू लाज मुलुखाची, प्राणपणाने स्वराज्य मिळवू इच्छा हि "श्री" ची. आई भवानी आहे साथीला उंच उभारू भगवा, तुकडे करू राई एव्हढे आलाच जर गनीम आडवा. सह्याद्रीची उत्तुंग शिखरे साद घालिती आम्हास, स्वराज्याचं तोरण बांधून रक्षु हिंदू धर्मास. हर हर महादेवाचा नारा आता अटकेपार गर्जुदे, मावळा लढण्यास सज्ज आई हिंदवी स्वराज्य स्थापु दे. हिंदवी स्वराज्य स्थापु दे… !!

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

सज्जनगड - एक जुनी आठवण

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 28/05/2015 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
( फार पुर्वी कधी तरी लिहिले होते हे ललित ! कालपरवा जुना ब्लॉग चाळत होतो तेव्हा सापडले ! पुनःप्रत्ययाचा आनंद जाहला !

अंधार क्षण भाग ५ - जॅक्स लेराॅय (लेख २७)

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 27/05/2015 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - जॅक्स लेराॅय (लेख २७) आज जेव्हा नाझींचं चित्रण केलं जातं - टेलिव्हिजनवर किंवा चित्रपटांमध्ये - तेव्हा नाझीवादाचा संबंध फक्त जर्मनीशी जोडला जातो. नाझीवादाने जर्मनीबाहेरच्या अनेक लोकांवर भुरळ टाकली होती हे सोयिस्करपणे विसरलं जातं. अगदी ब्रिटन आणि अमेरिकेतही नाझीवादाचे आणि फॅसिझमचे चाहते होते. ब्रिटनमध्ये सर ओस्वाल्ड मोस्ले आणि स्वीडनमध्ये पेअर एन्गडाल यांनी फॅसिस्ट संघटना स्थापन केल्या होत्या आणि या संघटनांना चांगला लोकाश्रय लाभला होता. नाझींमध्येही सर्वचजण कट्टर होते असं म्हणता येणार नाही. हिटलरलाही याची कल्पना होती.