Skip to main content

इतिहास

जेनेसिस (शतशब्दकथा)

लेखक सटक यांनी गुरुवार, 16/07/2015 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
तो अगदी दमून गेला होता!! त्याने सस्तन, कीट, सरिस्रुप, मत्स्य, उभयचर, पक्षी ह्या सगळ्यांचे जीन्स वापरून काहीतरी बनवले होते. उत्सुकता म्हणून त्याने बायो-इलेक्ट्रिसिटि चालू केली. अत्यंत बेंगरुळ असा तो जीव तसा बरा दिसत होता. त्यांच्या नियमांनुसार प्रत्येक संरचनेला एक "किल स्विच" लावणे आवश्यक होते.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … २

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 14/07/2015 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ २००० मागील भागात पाहिलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी तंत्रशिक्षणाचा हळूहळू दर्जा खालावत गेला. पण सगळं वाईटच आहे का? तर नाही. म्हणजे बऱ्याच अंशी चांगल्या संस्थांची गरज होती. पण चांगल्या चार- पाच आणि वाईट पन्नास असं झाल्यानं हे सगळे क्षेत्रच वाईट असा समज झाला. काय निवडावं लोकांना कळेनासं झालं. गावातलं कॉलेज - राहायचा खर्च नको व्हायला म्हणून जवळ प्रवेश घेतला तर स्पर्धेत मागे पडतो आणि पुण्यात जाउन घ्यावं तर अतिसुमार ठिकाणी मिळते आणि हे नंतर कळते! अशा पेचात ग्रामीण भागातली मुलं फ़सतात.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …१

लेखक खेडूत यांनी सोमवार, 13/07/2015 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या परिचयाचे कित्येक जण इंजिनियर असतात. शहरांत तर घरटी एक इंजिनियर असणे आता फार दूर राहिले नाही. तंत्रशिक्षणाची अधोगती झाली असं आपण ऐकतो त्याच वेळी दोन्ही टोकाची उदाहरणं दिसतात! कुणी भारतीय इंजिनियर देशात अथवा परदेशांत काहीतरी मोठी कामगिरी करताना दिसतो तर त्याच वेळी कुणी इंजिनियर कॉल सेंटरमध्ये जाताना, विमा एजंट किंवा एखाद्या सहकारी ब्यांकेत वीजबिलं स्वीकारताना दिसतो. तुमचा किराणा दुकानदारसुद्धा इंजिनियर असू शकतो , अतिशयोक्ती नाही. पूर्वी बेकारीत रहाणारे इंजिनियर आता मिळेल ते काम करताना दिसतात हे एका अर्थी बरंच झालं. पण प्रश्न असा पडतो की असे का व्हावे?

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ५

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 03/07/2015 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १' नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग २ नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३ नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ४ नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ५ Simple, Free Image and File Hosting at MediaFire चेरबोर्गच्या द्वीपकल्पावर जे छत्रीधारी सैनिक उतरले त्यावरुन जर्मनीच्या अधिकाऱ्यांना आक्रमण सुरु झाले आहे याची कल्पना येण्याची तशी काहीच शक्यता नव्हती पण वस्तुस्थिती तीच होती. ते १२० अमेरिकन छत्रीधारी सैनिक हे रस्ते शोधण्याच्या व सामान टाकण्याच्या जागांवर खुणा करण्याच्या कामगिरीवर उतरविण्यात आले होते. त्या बिचाऱ्यांचे पहिल्यापासूनच हाल झाले. जर्मनीच्या तोफखान्याने त्यांचे दर्शन होताच आकाशात प्रकाश फेकणाऱ्या गोळ्यांचे जाळे विणले व त्या प्रकाशात गोळ्यांचा व तोफांचा अतिभयंकर

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 02/07/2015 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १' नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग २ नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३ नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ४ खराब हवामानाने जर्मनीच्या समादेश साखळीत चांगलीच शिथिलता आली. जवळजवळ सगळ्याच मुख्यालयातून ‘आता लगेच काही आक्रमण होत नाही’ असे बोलले जाऊ लागले.

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 29/06/2015 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १' नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग २ कमांडर्स..... Simple, Free Image and File Hosting at MediaFire नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३ मागीलपानावरुन... ............त्या

आमचेही प्रवासवर्णन…

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 29/06/2015 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
Jack_Bauer भाऊंचे उसगावच्या दौर्‍याचे प्रवास वर्णन वाचून आम्हालाही आमी लिहीलेल्या एका प्रवासवर्णनाची आठवण झाली. तेव्हा मुक्तपिठ नामक मुक्तपिठल्यावर गाजत असलेल्या कुणा काकुंच्या अमेरिकेचे प्रवासवर्णन वाचून आम्हालाही प्रेरणा झाली होती. (प्रवासवर्णन लिहिण्याची प्रेरणा) आता ते इथे टाकावं की नको, पोस्टू की नको करत एकदाचं पोस्टूनच टाकलं. ******************************************************** मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे. आम्ही (आम्ही म्हणजे अस्मादिक आणि सौभाग्यवती) चक्क झोप्या मारुतीच्या देवळामागे असलेल्या भाजी मंडईत आतपाव मिरच्या आणि कोथिंबीर-कडीपत्ता आणावयास गेलो होतो.

कथा वडगावच्या लढाईची...

लेखक प्रसन्न केसकर यांनी शनिवार, 27/06/2015 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
ॐ नमो जी गणपतये वरदमूर्ती प्रमथपतये आरंभी नमून तुम्हाला उभा शाहीर कवन गाण्याला नमन तुज मयुरवाहिनी वीणाधारी बुद्धीदायीनी शाहिरावर कृपा करुनी वाणी वरदान दे त्याला नमन असो कुलदैवताला म्हाळसाकांताला, बानू भरताराला जेजुरी गडी जो बैसला मर्दुनी मणीमल्लाला नमन पुढे आराध्य देवाना संत माउलीना आणि सत्पुरुषांना विठोबा, ज्ञानबा, तुकारामाला चोखोबा, सावता, नामदेवाला नमन माझे भवानी मातेला अंबाबाई, यमाई, रेणुकेला आदिशक्ती जगदंबेला वरदायिनी मातृदेवतेला नमन माझे शिवबाला संभाजी, बाजी, शाहूला देशाचा मान ज्यांनी राखला स्वरुज्या स्थापुनी धर्म राखला नमन माझे गुरुमाउलीला मातापिता, बंधू भगिनींना वाढवूनी ज्यांनी पोसला श