Skip to main content

इतिहास

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.

Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग २ - स्पायडरमॅन एक स्वप्न

लेखक मोग्याम्बो यांनी सोमवार, 14/09/2015 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग १ डीसी साठी जे सुपरमॅन आणि बॅटमॅन चे महत्व आहे तेच स्थान स्पायडरमॅनला मार्वल मध्ये आहे. डीसी कॉमिक्स साठ च्या दशकात वॉर्नर ब्रदर्स ने विकत घेतल्यामुळे त्यांना सुपरहिरो वर चित्रपट निर्माण करायला जास्त त्रास झाला नाही. त्यांनी ८०च्या दशकापर्यंत सुपरमॅन वर आधारीत तीन चित्रपटांची निर्मितीही केली आणि मार्वल कडून अजुन काहीच हालचाल होत नव्हती. तिसऱ्या सुपरमॅन चित्रपटास म्हणावे तसे यश मिळाले नाही.

भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 09/09/2015 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख.

या पाच गोष्टी कायम कराव्यात

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 08/09/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

"येडाय का तु?"

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 06/09/2015 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
कुटीबाहेर रविकिरणांची तांबुस सकाळ पसरली. हरीतालिकेचा गाभारा रामप्रहरी दणाणला. तपोवनातल्या वैराग्याचा निद्राभंग झाला. कुटीबाहेर येऊन सुर्यस्नान करत तो उकिडवा बसला. कुळस्वामीनी कोवळ्या ऊन्हात आन्हिकं उरकत होत्या. गायींच्या गळ्यातल्या घंटा मंद किणकिणत होत्या. कळप घेऊन बालगोपाळ अरण्यात निघाले. कान्हा पण आला असेल त्यांच्यात, मंत्रमुग्ध बासुरी घेऊन. यशोदेला चुकवुन. पाणवठ्यावर गौळणींची लगबग चालली होती. गोपिका खिदळत बाजाराला निघाल्या होत्या.

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

सागरमंथन

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शनिवार, 05/09/2015 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
काळे गोरे पिवळे गोळा झाले सगळे दाढ़ीवाले इकडे गाडीवाले तिकडे घुसळ घुसळ घुसळ दम लगा के हइया मंथन झाले सुरु मजा बघाया आला काठावर बसला बनला जगद्गुरु एक दोन तीन चार एजेंट ऑरेंज रत्नहार पाच सहा सात आठ मुजाहिदीन कंठात घुसळ घुसळ घुसळ दम लगा के हइया वाजू लागली थंडी लोकशाही ज़िंदाबाद विळाहातोडा मुर्दाबाद दुनिया सब्जीमंडी नऊ दहा अकरा बारा खाड़ीत शिरला वारा तेरा चौदा पंधरा सोळा स्मशानी भूते गोळा घुसळ घुसळ घुसळ दम लगा के हइया कंठात झाला गळू दिवाळीत होळी होळीत दिवाळी मोकाट सुटला वळू सतरा अठरा एकोणवीस मेंदूचा पाडला कीस वीस एकवीस बावीस खाड़ी आली भरतीस घुसळ घुसळ घुसळ जोर लगा के हइया पुन्हा घुसळण सुरु

Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग १

लेखक मोग्याम्बो यांनी शुक्रवार, 04/09/2015 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
Avengers: Age of Ultron ह्या बहुचर्चित चित्रपटाने जगातील सर्व बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले. हा चित्रपट निर्मिती करणारी Marvel Studio ही संस्था सगळ्यांना परिचित आहे. Comic Books मधील पात्रांवर चित्रपट तयार करण्यामध्ये ही सध्या अग्रगण्य आहे. पण ही कंपनी एकेकाळी दिवाळखोरी जाहीर करणार होती असे म्हटले तर? Marvel Comics सन १९३९ साली स्थापन झाली. तिचा पहिला वहिला मालक होता "मार्टिन गुडमन". पण Marvel ला २००५ साल येईपर्यंत कधीच स्थैर्य लाभले नाही. त्याचे कारण म्हणजे प्रत्यके गोष्टीमध्ये ते DC Comics च्या मागेच राहिले. "ह्युमन टोर्च " आणि "नेमोर" ह्या दोन पात्रांनी मार्वेल कॉमिक्स ची सुरवात झाली.

मेडीटेशन्स - चिंतने - मार्कस ऑरेलियस - भाग १

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 03/09/2015 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
"मेडीटेशन / चिंतन " म्हणले की डोळ्यासमोर तीन माणसे आणि त्यांची तीन पुस्तके उभी रहातात : १) मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी - रेने देकार्त ( कार्टेशियन जॉमेट्री फेम ) २) मेडीटेशन्स - मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस ( ग्लॅडीयेटर फेम ) ३) द ऑरेंज बूक ऑफ मेडीटेशन्स - ओशो - आचार्य रजनीश ( संभोगातुन समाधीकडे फेम ) ( पहिल्या काही पानांच्या वाचनावरुन ) देकार्त एकुणच ज्ञान म्हणजे काय ? जाणणे म्हणाजे काय ? असणे म्हणजे काय ?

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.