Skip to main content

इतिहास

बाजीराव अ‍ॅट बिठूर

लेखक मनो यांनी शुक्रवार, 02/02/2018 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी हे किस्से म्हणजे पुराव्यासकट सिद्ध करता येण्यासारखा इतिहास नव्हे. कुणी पाहिलेल्या, ऐकलेल्या, त्यात स्वतःची भर घालून सांगितलेल्या अश्या या दंतकथा आहेत. त्यामुळे त्यांना फार गंभीरपणे घेऊ नये अशी एक सूचना. यातले काही 'मंत्रावेगळा' कादंबरीकार ना. स. इनामदार यांनी लिहिले आहेत. काही विंचूरकरांच्या इतिहासात आहेत. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामांत लढलेल्या नानासाहेब पेशवे यांच्या चरित्रात काही सापडते. प्रतुलचंद्र गुप्ता या माणसाने दुसऱ्या बाजीरावावर ईस्ट इंडिया कंपनीचा पत्रव्यवहार वाचून जे अनमोल संशोधन केले आहे त्यात काही सापडते.

Sheet Anchor of Indian Chronology

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी शुक्रवार, 02/02/2018 03:16 या दिवशी प्रकाशित केले.
अलेक्झँडर, चन्द्रगुप्त मौर्य, चाणक्य, अंभी, पौरस इत्यादि नावे जी आपणास आज ठाऊक आहेत ती सर्व पश्चिमेकडील ग्रीक लोकांच्या लेखनातून उपलब्ध झाली आहेत. भारतीय प्राचीन साहित्यात एकतर अलेक्झँडर, अंभी, पौरस कोठेच भेटत नाहीत आणि 'त्या' प्रसिद्ध लढाईविषयीहि एकहि उल्लेख नाही. अर्थात लढाई झाली हे सत्य आहे कारण अनेक ग्रीक लेखनांमधून तिचा उल्लेख मिळतो पण त्या ग्रीक सैन्यामध्ये कोणी एक चन्द्रगुप्त होता ज्याने चाणक्य ह्या राजनीतिपटु ब्राह्मणाच्या सहकार्याने नंदकुलाचा नाश केला ह्यामागे काही पुरावा नाही.

पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 01/02/2018 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर" लेखिका: इंद्रायणी सावकार रिया पब्लिकेशन अजब डीस्ट्रीब्युटर्स सूचना: अलेक्झांडर = सिकंदर पोरस = पुरू = पुरुषोत्तम = पौरव देशाचा राजा चाणक्य = कौटिल्य = विष्णुगुप्त परीक्षण: नुकतेच "असा होता सिकंदर" हे पुस्तक मी वाचून पूर्ण केले. लेखिका "इंद्रायणी सावकार" यांची "लेखनशैली" काय वर्णावी? एकदम अद्भुत अशी शैली! कठीण आणि क्लिष्ट असलेला इतिहास विषय आणि त्यातल्या त्यात अलेक्झांडर सारख्या जगप्रसिद्ध प्राचीन ग्रीक व्यक्तिमत्वाबद्दल लिहायचे म्हणजे एक आव्हान होते पण इंद्रायणी यांनी कमाल केली आहे.

'नासक' नावाचा हिरा आणि दुसर्‍या बाजीरावाची संपत्ति

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी सोमवार, 29/01/2018 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या समजुतीनुसार बाजीराव आणि अन्य हिंदुस्तानी राजे-महाराजे आणि नबाब ह्यांच्याकडून ब्रिटिशांनी वेळोवेळी ज्या रकमा आणि जडजवाहीर युद्धाच्या मार्गाने मिळविले त्यांचे पुढे काय झाले ह्याबद्दल आपल्याकडे स्पष्ट अशी काहीच माहिती उपलब्ध नाही. ती संपत्ति ब्रिटिशांनी 'लुटली' एवढेच आपण म्हणू शकतो. आता बुक्स.गूगल सारख्या स्थळांमुळे १८व्या-१९व्या शतकातले छापील साहित्य आपल्याला नव्याने उपलब्ध झाले आहे आणि बाजीरावच्या संपत्तीचे काय झाले ह्याचे पुष्कळसे समाधानकारक उत्तर मिळू शकते.

सातारा छत्रपतींची २३३ हिऱ्यांची पगडी?

लेखक मनो यांनी सोमवार, 29/01/2018 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक मौल्यवान खजिने परदेशांत आहेत. दुर्मिळ चित्रे, मूळ हस्तलिखिते, पोथ्या, मूर्ती एवढेच नव्हे तर हिरे, माणके आणि सोन्याच्या वस्तूही त्यात आहेत. थोड्या दिवसांपूर्वी श्री. संकेत कुलकर्णी यांनी नाशिक-हिरा याच्याबद्दल एक संशोधन प्रसिद्द केले होते. या वेळी लंडनमध्ये नव्हें तर अमेरिकेतील अश्याच एक विशेष मौल्यवान वस्तूची ही कहाणी. आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये ही बातमी प्रसिद्ध होत आहे. माझा हा लेख इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी इथे टाकत आहे. हा लेख मूळ स्वरूपात शेवटच्या तीन पॅराग्राफ्सकट सोशल मीडियावर अथवा इतर कुठे शेअर करण्यास माझी काही हरकत नाही.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 26/01/2018 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक (मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १): https://www.misalpav.com/node/41194 पॅरिस मध्ये ‘मोनालिसा’ चे चित्र बघताना मला ती तिथून सोडवण्याची विनंती करत असल्याचा भास झाला.

गीताई माऊली माझी...

लेखक विकास यांनी सोमवार, 22/01/2018 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
​आचार्य विनोबा भाव्यांनी त्यांच्या आईला गीता ऐकण्याची इच्छा होती पण संस्कृत येत नव्हते म्हणुन, श्रीमद्भगवद्गीतेचे "गीताई"च्या रुपाने मराठीकरण केले. ते करताना, मूळ श्लोक आणि त्यांचे छंद वगैरे जसेच्या तसे ठेवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला.

पानिपतचे खलनायक - दोन नवीन चित्रे

लेखक मनो यांनी रविवार, 14/01/2018 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
चित्र १ शुजा-उद्दोला Shuja-uddola चित्र २ अहमदशाह अब्दाली Ahmadshah पानिपतच्या लढाईला १४ जानेवारी रोजी २५७ वर्षे पूर्ण होतील. या प्रसंगाच्या निमित्ताने पानिपतचा विजेता अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या बाजूने लढलेला शुजाउद्दोला या दोघांची नवीन चित्रे मला एका संग्रहात सापडली. ही चित्रे आणि त्यामागची कथा अत्यंत रोचक अशी आहे.

पहिल्या महायुद्धातील कोल्हे

लेखक अमित खोजे यांनी बुधवार, 10/01/2018 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हा हा कुत्र्याच्या जातीतील एक अत्यंत हुशार, कळपात राहणारा, आणि अत्यंत निष्ठुर प्राणी आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात १९१६-१९१७ मध्ये कडाक्याच्या हिवाळ्यात विल्नीयस आणि मिन्स्कच्या भागात जर्मन आणि रशियन सेना एकमेकांशी लढत होत्या. बर्फात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढताना दोन्हीकडच्या सैन्याची अगदी दैन्यावस्था झाली होती. तेथील बर्फाळ भागात राहणाऱ्या कोल्ह्यांनाही युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची चांगली मेजवानी मिळत होती. जिवंत माणसाच्या गरम रक्ताची चटक त्यांना लागत चालली होती. थोडा धीर दाखवून ते एकट्या दुकट्या सैनिकांवर देखील हल्ला करू लागले.

पानिपत - सदाशिवराव भाऊंच्या वीरकथा

लेखक मनो यांनी रविवार, 31/12/2017 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी श्री. जयंत कुलकर्णी यांनी "सुरजमल जाट आया भाऊके दरबार" अशी पानिपत लढाईवरती तीन भागात लेखमालिका लिहिली होती.त्यात त्यांनी श्री जोशी यांच्या एका पुस्तकाच्या आधारे पानिपत विषयी ज्या आख्यायिका त्या काळात प्रचलित होत्या, त्याविषयी लिहिले आहे. ती लेखमालिका इथे वाचायला मिळेल सुरजमल जाट आया भाऊके दरबार ती मालिका वाचून मूळ पुस्तक वाचायची उत्सुकता खूप वाढली. श्री जयंत कुलकर्णी याना व्य. नि. करून विचारले पण त्यांच्याकडे पहिली पाने गेली असल्यामुळे पुस्तकाचे नाव नव्हते.