Skip to main content

इतिहास

(नोटा)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 12/12/2017 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा सांगायलाच पाहिजे का दर वेळी? चालः- गे मायभू तुझे मी नोटा नोटा कितीक असती हजार पाचशेच्या नाही कुणास मुल्य कागद वाटती साऱ्या दूरस्थ आयकर विभाग ठाऊक पाहतो मजला डोळ्यांत् कॅशियरच्या अनुकंप दाटलेला झालो विवश परंतु बोलणार काही नाही निःशब्द भावनांना होळीच साक्षी राही अत्यंत भित्रे 08112016 पैजारबुवा,

आता ई-बुक मोडी लिपीतही! जाणून घ्या पहिल्या मोडी ई-बुक निर्मिती मागची धडपड

लेखक कौशिक लेले यांनी सोमवार, 11/12/2017 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मी मराठी भाषेतील पण मोडी लिपीतील जगातील पहिलेच ईबुक वाचले. जयसिंगराव पवार लिखित "राजर्षी शाहू छत्रपती महाराज" हे पुस्तक नवीनकुमार माळी यांनी मोडी लिपीत लिप्यंतरित करून ईबुक स्वरूपात सादर केले आहे. ई-बुक वाचून पूर्ण केले आणि नेहमीप्रमाणे माझ्या पुस्तक परिक्षणाच्या ब्लॉगवर त्याबद्दल लिहिले. नेहमी पुस्तक परीक्षणाबद्दल मिपावर लिहीत नाही पण नेहमीच्या पुस्तकांपेक्षा हे वेगळं आहे म्हणून म्हटलं चोखंदळ मिपाकरांना या बद्दल सांगावं.

निवडुंग तरारे इथला....

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 10/12/2017 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
In Flander's Fields ही एक प्रसिद्ध युद्धकविता. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान डॉक्टर, सैनिक व कवी असलेल्या डॉ. जॉन मॅक-क्रे यांनी बेल्जीयम मधल्या Ypres इथल्या युद्धात मरण पावलेल्या आपल्या मित्राच्या स्मरणार्थ लिहिलेली. एका अनाम युद्धक्षेत्रावर लढताना वीरगती मिळालेल्या अनाम सैनिकांचं हे भावविभोर मनोगत. युद्ध निषेधार्ह असतं, घातक असतं, निरर्थक असतं हे सर्व जरी खरं असलं तरी अजूनही ते आधुनिक जगातलं एक अटळ वास्तव आहे. म्हणूनच ही कविता आजही वाचताना मनाला चटका लावून जाते. ही मूळ कविता व तिचा मी केलेला भावानुवाद.

शिवकाल-निर्णय

लेखक सरनौबत यांनी शुक्रवार, 10/11/2017 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
शिवकाल-निर्णय दिनांक १० नोव्हेंबर, २०१७. आज अफ़जलखानाच्या वधाला ३५८ वर्षे पूर्ण झाली. सहज म्हणून 'कालनिर्णय' पाहिलं तर ह्या दिवशी 'कालभैरव जयंती' असल्याचं समजलं. ह्या 'कालभैरव जयंती' खेरीज अफजलखान नावाच्या ‘काळभैरवाची पुण्यतिथी' देखील नमूद करायला हवी होती असं वाटलं. 'कालभैरव जयंती' शिवाय 'पाटीलबुवा गोविंद झावरे पुण्यतिथी' देखील कालनिर्णय मध्ये ह्याच दिवशी लिहिली आहे. गावो-गावच्या लहान-मोठ्या महाराजांच्या जयंती, पुण्यतिथी आणि सणवार इतपत मर्यादित माहिती आपल्या कॅलेंडर्स मध्ये असते.

इंडीयन डिमन डे -३०१६ कहाणी एका सणाची !

लेखक रामदास यांनी बुधवार, 08/11/2017 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
१००० वर्षांनंतर भारतात साजरा होणार्‍या एका सणाचे हे वर्णन आहे." मुलांच्या पुस्तकातला हा धडा अर्थातच इंग्रजीत आहे. मुलांनो, आपण दरवर्षी इंडियन डीमन डे साजरा करतो. खरे म्हणजे हा डीमन डे म्हणजे दैत्याचा दिवस असा गैरसमज तुमच्या मनात झाला असेल तर तो काढून टाका.

इतिहास व्याख्यान - पाक्षिक सभा

लेखक मनो यांनी शनिवार, 28/10/2017 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी भारत इतिहास संशोधक मंडळात काही गोष्टींविषयी शुक्रवार दि. ०३ नोव्हेंबर २०१७ संध्याकाळी ६.३० वाजता एक व्याख्यान देतो आहे. इतिहासात रस असलेल्या सर्वानी जरूर या, तुमचे स्वागतच आहे. इतर तपशील, विषय, स्थळ इत्यादी ===================== श्री राजा शिवछत्रपती महाराज आणि ज्ञानियांचा राजा श्री ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राचे दोन मानबिंदू. भारत इतिहास संशोधक मंडळातल्या शुक्रवार ०३ नोव्हेंबरच्या पाक्षिक सभेत या दोन्ही विषयी एकत्रित आजपर्यंत अप्रकाशित आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे कागद आणि चित्रे याविषयी श्री मनोज दाणी यांच्या व्याख्यानाचा योग जुळून येत आहे.

डंकर्क.... भाग ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 06/10/2017 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
पण त्या क्षणी तरी विजयमाला हिटलरच्या आर्देन्सच्या जंगलातून परजत येत असलेल्या चिलखती दलाच्या गळ्यात पडली होती.... पुढे चालू... Simple, Free Image and File Hosting at MediaFire अर्देन्सच्या जंगलात फ्रान्सच्या ९व्या आर्मीमागे या सेना स्वैर संचार करून त्यांना हैराण करत होत्या. फ्रान्सच्या सैन्यात गोंधळाचे व भीतीचे वातावरण पसरले होते. पराभूत मनोवृत्तीने जोर धरला होता.

भारत चीन युद्ध – १९६२! भाग१

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 24/09/2017 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
भारत चीन युद्ध – १९६२! भाग१ संदर्भ – १. न सांगण्या जोगी गोष्ट – मेजर जनरल(नि.) शशिकांत पित्रे २. An Era of Darkness: The British Empire in India- Shashi Tharoor ३. 1962: The War That Wasn't - Shiv Kunal Verma ४. ‘ माओचे लष्करी आव्हान’, - दि. वि. गोखले ५. वालॉंग ..एका युद्ध कैद्याची बखर – ले. क.