खरे सांग केव्हा तुझ्या बंद ओठी साथीदारांचे नाव केव्हा उमटायचे
किती घालायचे तुला टायरी अन किती वेळ पाण्यात बुडवायचे
तुला कोठडी लागली आवडायला आम्ही रिमांड कितीदा मागायचे
मळकट घोंगडे पुन्हा पांघरोनी तू मात्र बिनघोर झोपायचे
अरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती दिनभर नाचायचे
कोर्टातही तू अससी मुक्याने माXXXX जजनाही किती काळ झुलवायचे
कोपऱ्यात ढीग तुटक्या वेत छड्यांचा अजून किती काठ्यांना तोडायचे
कितीदा करावे रफू शर्टाला कितीदा पुन्हा तुला
भारत आधुनिक पोलोची जननी असला तरी हा क्रीडाप्रकार इथे फारसा लोकप्रियही झालेला नाही. हातात लांब स्टिक घेऊन घोड्यावर बसून खेळला जाणारा आणि हॉकीप्रमाणेच भासणारा हा क्रीडाप्रकार. हा खेळ अतिशय प्राचीन मानला जातो. या खेळाची सुरुवात नक्की कोठे झाली याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तरीही या खेळाचे उगमस्थान भारतच असल्याचे संकेत देणारे काही पुरावे उपलब्ध आहेत. भारतात असलेल्या जगातील सर्वात जुन्या पोलो क्लबच्या स्थापनेला या वर्षी 160 वर्षे पूर्ण झाली आहेत.
भारतात मणिपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या सगोल कांग्जेई या क्रीडाप्रकाराला पोलोचे उगमस्थान मानले जाते.
स्वीडन नाटो मध्ये जाणार ह्या बातमीने स्वीडन देशाचे नाव खूप वेळा बातम्यांत आले. फिनलंड सुद्धा चर्चेत होता. कदाचित NOKIA मुळे भारतीयांना फिनलंड ची अगदी चांगली ओळख असेल. कारण नोकिया ११०० सारखे फोन १००% त्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. एकदा माझा नोकिया चुकून कपड्यासोबत वॉशिंग मशीन मध्ये पडला. दुसऱ्या दिवशी मी तांदळात ठेवला आणि २४ तासांनी तो मी नव्हेच प्रमाणे चालू झाला. कितीदा हा फोन खिशांतून पडला, मी किती वेळा फेकून मारला इत्यादी मला आठवत सुद्धा नाही. फिनिश लोक ह्या फोन प्रमाणेच चिवट आणि राकट आहेत. ह्या देशांतील सर्वच गोष्टी नोकिया प्रमाणेच अगदी भक्कम बनवलेल्या असतात.
तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे. मला त्यांना शेवटी भेटता आले नाही आणि कोणतीही मदत करता आली नाही यांची खंत वाटते.
मटामधील श्रध्दांजली
https://maharashtratimes.com/maharashtra/thane/chandrashekhar-abhyankar-passed-away/articleshow/69346718.cms
---------------------------
त्यांचे काही निवडक साहित्य येथे देत आहे, नवीन लोकांना ओळख होण्यास मदत होईल.
मुंबईहून दिल्लीला रेल्वेने जाण्या-येण्यासाठी आजही पहिली पसंती असलेली 12951/52 राजधानी एक्सप्रेस येत्या 17 मेला 50 वर्षांची होत आहे. आज ही रेल्वेगाडी हायटेक झाली असली तरी तिच्यात येत्या काळात अजूनही सुधारणा होत जाणार आहेत.
विविध राज्यांच्या राजधान्या देशाच्या राजधानीशी जलद आणि आरामदायक रेल्वेसेवेने जोडण्यासाठी राजधानी एक्सप्रेस ही संकल्पना आणली. त्यानुसार भारतातील पहिली राजधानी एक्सप्रेस सुरू झाली 1 मार्च 1969 ला नवी दिल्ली आणि हावड्यादरम्यान. संपूर्ण वातानुकुलित असलेल्या या वेगवान रेल्वेगाडीत विमानाप्रमाणे सेवा पुरवण्यात येत असल्याने पुढील काळात ही संकल्पना लोकप्रिय होत गेली.
( नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त दैनिक संचार मध्ये प्रकाशित झालेला लेख)
महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल जर कोणी विचारले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचा उल्लेख केल्याशिवाय आपण राहणार नाही. जुलमी मुघलांच्या तावडीतून महाराजांनी महाराष्ट्र भूमीला परकीय दास्यत्वातून मुक्त केले, हि विजय कथा माहित नसणारी व्यक्ती महाराष्ट्रात शोधुनही सापडणार नाही. परंतु महाराष्ट्राचा इतिहास हा फक्त यापुरताच मर्यादित नाही.
मुंबईतील बोरीबंदर ते ठाणेदरम्यान आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली 16 एप्रिल 1853 रोजी. त्या ऐतिहासिक घटनेचे आता 170 वे वर्षे सुरू झाले आहे. यंदाच्या 170व्या वर्षाच्या निमित्ताने 20 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी भारतीय रेल्वेचे 150वे वर्ष सुरू झाले होते. त्या निमित्ताने 16 एप्रिल 2002 रोजी मुंबईत एका वेगळ्याच घटनेचे साक्षीदर होण्यासाठी लाखो मुंबईकरांनी बोरीबंदर ते ठाणेदरम्यानच्या लोहमार्गांच्या दुतर्फा, जिथे जागा मिळेल तिथे गर्दी केली होती. अगदी 16 एप्रिल 1853 ला केली होती तशीच.
सगळेच जण ज्या दिवसाची वाट पाहत होते तो खास दिवस अखेर उजाडला होता.
पॅरिसमध्ये एलिझे पॅलेस (फ्रेंच भाषेतील नाव – Palais de l’Élysée) उभारला जाईपर्यंत तो परिसर गुरांना चरण्यासाठीचे माळरान म्हणूनच वापरला जात होता. 17व्या शतकात या जागेचा मूळ मालक अर्मांद-क्लाऊद मोलेत याने ही जागा हेंरी लुईस दे ला तूर द’आउव्हर्गन याला विकली. त्यानंतरची अनेक वर्षे या परिसराची मालकी वेगवेगळ्या व्यक्तींकडे जात राहिली. त्यामुळे त्या जागी 17व्या शतकात उभारलेल्या टाऊन हॉलच्या रचनेमध्येही सतत बदल होत राहिले. या राजवाड्याचे अगदी अलीकडचे नुतनीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर करण्यात आले होते.
सोळाव्या लुईकडे या राजवाड्याची मालकी आल्यावर येथे विशेष राजदुतांच्या निवासाची सोय करण्यात आली होती.
भारताचे शीत (पेय)युद्ध!
इंग्रजांनी भारत जिंकला तो मराठा शीख मोगल अशा एतद्देशीय सत्तांना हरवून. पण नंतर त्यांच्या सत्तेला आव्हान देणारे वासुदेव बळवंत फडके, चापेकर, सावरकर असे क्रांतिकारक किंवा टिळक,गांधी,पटेल ह्यांच्या सारखे पुढारी मात्र समाजातल्या सर्वसामान्यवर्गातून, म्हणजे पूर्वी सत्ताधारी नसलेल्या वर्गातून पुढे आले. भारतातल्या शीतपेयांच्या इतिहासाचे स्वरूप काहीसे असेच आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21 फेब्रुवारी 2022 ला विशाखापट्टणम येथे भारताच्या नाविकशक्तीचे अवलोकन करत आहेत.
आपल्या नाविक इतिहासाची आणि परंपरांची माहिती करून देतानाच नौदलाच्या शक्तीची झलक दाखवणारा ‘राष्ट्रपतींचे ताफा निरीक्षण’ (Presidential Fleet Review) हा समारंभ. तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असतो.