Skip to main content

इतिहास

पावनखिंडीतली लढाई - ३५०वा स्मृतीदिन - २७ जुलै २०१०

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 04/07/2010 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी ही माहिती कळली. ती इथे प्रसिद्ध करायची विनंती झाली म्हणून हे प्रकाशित करत आहे. *** नमस्कार, येत्या २७ जुलैला पावनखिंडीतील रणसंग्रामाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने मी पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड असे पालखी घेऊन पदभ्रमण करायचे ठरविले आहे. आपल्या सहकार्यानेच हा ३५० वर्षांपूर्वींचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे. ह्या मोहिमेत सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करूया. सानथोर सर्व शिवप्रेमी ह्या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. सर्वांनाच तो ऐतिहासिक प्रसंग अनुभवता यावा असेच मोहिमेचे नियोजन केलेले आहे. तसेच आपल्या मित्रमंडळींना सुद्धा ह्या कार्यक्रमाची माहिती द्यावी.

फ्रेंच पर्लहार्बर

लेखक पुष्करिणी यांनी रविवार, 04/07/2010 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
फ़्रेंच लोकं थोडी ओळखीची झाली आणि इकडचं तिकडचं बोलायला लागली की कायम इंग्लीश किती वाइट, विश्वासघातकी, स्वार्थी आहेत यावर पोट्तिडकीन एकदा तरी भाष्य होतच...वॉटर्लू होउन जवळ जवळ २ शतकं लोटली, किती दिवस उगाळणार तेच... असं एकदा शेवटी म्हटल मी...झालं आजोबांनी त्यांच्या आजोबांची गोष्ट सांगितली, दुसया महायुद्धाच्या वेळची . मला ही घटना माहित होती पण इतिहासातली केवळ १ तारिख म्हणून. घटना एकच पण दोन कंगोरे आहेत ( नेहमीप्रमाणेच) आणि दोन्ही त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर त्यांच्या त्यांच्या ठिकाणी बरोबर वाटतात. १० मे ला विन्स्टन चर्चिल ब्रिटन चे पंतप्रधान होउन ७० वर्ष झाली.

पदरगड ऊर्फ कलावंतीणीचा महाल

लेखक बज्जु यांनी शुक्रवार, 02/07/2010 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
पदरगड उर्फ़ कलावंतीणीचा महाल आतापर्यंत भिमाशंकरला १५-१६ वेळा गेलो असेन. एका वर्षीतर एकाच महिन्यात सलग ३ शनिवार-रविवार भिमाशंकरला गेलो होतो घरच्यांना शंका पण यायला लागली हा भिमाशंकरी मुलगी आणतो की काय घरात? असो. पण भिमाशंकरला चिकटुनच असलेल्या पदरगडावर जायचा योग काही आजवर आला नव्ह्ता. गेल्या रविवारीच मी आणि गिरीश साठे कुठे जायच कुठे जायचं असा विचार करत होतो आणि दोघेही एकदम बोललो पदरगड. ठरल तर मग पदरगड फ़ायनल, कोणीही नाही आलं तरी आपण दोघच जाऊ पण तेवढ्यात तात्या आणि पराग भावे सुध्दा येतो बोलले. शनिवारी संध्याकाळीच खाण्याचं सामान घेतलं. रविवारी पहाटे ५.०० ला मारुती ऒम्नीने निघालो.

विष्णुगुप्त २

लेखक पुष्कर यांनी गुरुवार, 01/07/2010 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
(पार्श्वभूमीकरिता वाचा - विष्णुगुप्त-१) (मागच्या भागात - चालता चालता विष्णू नगराच्या बर्‍यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला. त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलिकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्‍या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता.

(कित्तीदा)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 01/07/2010 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
बुधवारी मी प्यायलो कितीदा तारेत मी टंकलो कितीदा! त्यांची नजर, त्यांचेच व्यनी जालात मी मुरलो कितीदा! मागितली मी तिच्याशी मयतरी मालकांस मी णडलो कितीदा! दिले धडे मी संतुलनाचे डिलीटूनी मी टाकले कितीदा! त्याचे पोट, त्याचे स्थूलसे सत्यात मी लाथाडले कितीदा --पुण्याचे पेशवे १५ तास ३१ मिनिटे, तात्याच्या कविते पश्चात
काव्यरस

पारध

लेखक सहज यांनी बुधवार, 30/06/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
वस्ती पाखरांची स्थिरावलेली होती हाव पारध्याची उफाळलेली होती नशा हो सत्तेची नित्य चढत होती भूक जुगार्‍याची चाळवलेली होती गात्रे पाखरांची फुलली देखील नव्हती तरी पसरुनी जाळी सर्वत्र टाकली होती पिसे कापण्याची ही चाल धूर्त होती बहेलियानेच त्यांची तोंडे बांधली होती नव्या पाखरांच्या शाळा पुन्हा बहरती जुन्या पारध्याची ओळख त्यांना नव्हती
काव्यरस

वंशावळी : एक ओळख

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 29/06/2010 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
वंशावळी : एक ओळख मागच्या आठवड्यात मी सकाळी घरी होतो त्यावेळी एक जोडपे घरी आले. ते वडिलांना त्यांचे आडनाव विचारत तुम्ही अमक्याचे नातेवाईक, तमक्याचे भाऊ, येथून तुम्ही येथे आले वैगेरे वैगेरे सांगत असलेले मी ऐकले. मी ताबडतोब समजलो की ते एक भाट आहेत, व ते आता वंशावळ वाचणार आपल्या समाजात अनेक जाती आहेत. या प्रत्येक जातीच्या वंशाची माहीती भाट समाज ठेवत असतो. असलीच कामे वडिलोपार्जीत व्यवसाय म्हणून करणारे ब्रम्हभट - श्री. कैलास रामदेवराय ब्रम्हभट हे होत. Kailas Bramhabhata श्री.

मास्टर मदन - जगाला पडलेले एक अद्‌भूत स्वप्न !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 23/06/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मास्टर मदन मास्टर मदन (जन्म २८-१२-१९२७. मृत्यू :६-६-१९४२) २८ डिसेंबरला परमेश्वराच्या हातून एक मोठी चूक घडली. त्या चुकीसाठी मला नाही वाटत तो स्वत:ला कधी माफ करु शकेल. या दिवशी त्याने त्याच्या विश्वातल्या एका गाणार्‍या स्वर्गिय गंधर्वाला चुकून या मर्त्य जगात पाठवले. ते साल होते १९२७. अवघ्या १४ वर्षाच्या आयुष्यात गायनाच्या कुठल्या पातळीवर तो पोहोचला होता ते आता आपण बघुया. हा शापीत गंधर्व पंजाबमधल्या जालंदर लिल्ह्यातल्या एका खानेखाना नावाच्या गावात एका शीख कुटूंबाच्या घरात अवतीर्ण झाला. त्याचे नाव “मास्टर मदन”.