Skip to main content

इतिहास

आज मराठवाडा मुक्तिदिन

लेखक मितान यांनी शुक्रवार, 17/09/2010 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
आज मराठवाडा मुक्तिदिन ! देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा मात्र हैद्राबादच्या निजामाच्या राजवटीत भरडला जात होता. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदासांच्या या भूमीत मुस्लिम रझाकारांनी हैदोस घातला होता. त्यावेळी काँग्रेस पुढार्‍यांपैकी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ उभारली गेली. शेवटी सैनिकी कारवाईत निजामाला शरणागती पत्करावी लागली. १७ सप्टेंबर १९४८ पासून मराठवाडा स्वतंत्र भारताचा घटक झाला. माझे या विषयातले ज्ञान फार तोकडे आहे. कृपया इतिहासाच्या जाणकारांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या महत्त्वाच्या पानावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.

एका तेलियाने (पुस्तक परिचय)

लेखक संदीप चित्रे यांनी गुरुवार, 16/09/2010 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
ekaa teliyaane ’शेख अहमद झाकी यामानी !’ नाव ऐकलंय? किंवा ऐकल्यासारखं वाटतंय ? ’एका तेलियाने’ हे पुस्तक वाचण्याआधी ’शेख अहमद झाकी यामानी’ या नावाशी कधी थेट संबंध आला नव्हता. सौदी अरेबिया, तिथली राजेशाही, तेलामुळे मिळणारा आणि ऐषोआरामासाठी पाण्यासारखा वाहणारा त्यांच्याकडचा पैसा ह्याबद्दल इथून-तिथून किस्से / कहाण्या ऐकल्या / वाचल्या होत्या. लंडनच्या नाइटक्लब्जमधे एकेका रात्रीत लाखो डॉलर्स उधळणाऱ्या राजपुत्रांबद्दलही वाचलं होतं.

कातीन हत्याकांड ... दडवलेला इतिहास...

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 15/09/2010 03:26 या दिवशी प्रकाशित केले.
आन्द्रे वायदा (http://en.wikipedia.org/wiki/Andrzej_Wajda) नामक पोलिश दिग्दर्शकाचा हा २००७ सालातला सिनेमा. ( या सिनेमाला २००८चं फ़ॊरीन फ़िल्मसाठीचं ऒस्कर नॊमिनेशन होतं) कातीन हत्याकांड हा दुसर्‍या महायुद्धातला ( त्या मानानं कमी प्रसिद्ध पण ) प्रचंड अस्वस्थ करणारा इतिहास...

Paths of Glory

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 14/09/2010 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही चित्रपट पाहुन झपाटल्यासारखे होते. मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटते. आपण नि:शब्द होतो. स्टेनली कुब्रिक दिग्दर्शित पाथ्स ऑफ ग्लोरी हा असाच एक चित्रपट. लोलिता, आइज वाइड शट, क्लोकवर्क ऑरेंज असे एकापेक्षा एक वादग्रस्त आणि भडक चित्रपट बनवणार्‍या कुब्रिकने पाथ्स ऑफ ग्लोरी सारखी दर्जेदार कलाकृती देखील सादर केली आहे. पाथ्स ऑफ ग्लोरी याच नावाच्या Humphrey Cobb लिखीत कादंबरी वर आधारीत आहे. चित्रपटाला पहिल्या महायुद्धातील जर्मनी आणि फ्रान्स यांच्यामधल्या एका लढाईची पार्श्वभूमी आहे. पण हा युद्धपट मात्र नाही. लढाईमागचे राजकारण हाच या चित्रपटाचा विषय आहे.

शिवराज्याभिषेक

लेखक जिप्सी यांनी गुरुवार, 09/09/2010 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
शिवराज्याभिषेकाचे वर्णन आपण अनेकदा वाचले असेल पण एखाद्या प्रत्यक्षदर्शीकडून यावर लेखन फार क्वचितच झाले असेल. खास महाराजांच्या राज्याभिषेकासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या एका डच वकीलाने लिहिलेले हे वर्णन.हा वकील वेंगुर्ल्यातल्या डच वखारीतला असावा,त्याने हे पत्र बटेव्हियातल्या (?) आपल्या वरिष्ठास लिहिलेले आहे. त्याचा हा गोषवारा. संदर्भ :- डच रेकॉर्डस्,शिवकालीन पत्रसारसंग्रह खं.२ पुष्कळ दिवस तयारी होऊन जुनच्या सुरुवातीला राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झाली. ब्राह्मण्,विद्वान व इतर मिळून सुमारे ११ हजार लोक रायगडावर जमा झाले.

भंभागिरी

लेखक हेम यांनी बुधवार, 01/09/2010 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
'सकाळी सहाऐवजी साडेसहाला हुतात्मा स्मारकाबाहेर जमायचे आहे' राहुलचा रात्री मेसेज मिळाल्यावर सुट्टीची साखरझोप अजून अर्ध्या तासाने वाढली. पहाटे खुडबुडत सॅक भरून अशोकस्तंभावर गाडी लावली. दिवाळी, गुढीपाडवा, दसरा, २६ जाने. यादिवशींच्या पहाटवेळांत खूप वेगळं चैतन्य असतं, त्यापैकीच एक १५ ऑगस्टचीही असते. एरवी दिसतात ते पोटार्थी (म्हणजे पोटासाठी कामाला लागलेले आणि पोट कमी करण्यासाठी नाईलाजाने चालणारे/ धावणारे). लहान मुलांची झेंडावंदनासाठी कडक कपड्यांत शाळेत जाण्याची लगबग सुरू होती.

इतिहास

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी रविवार, 29/08/2010 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल असं होत नाही; पण भालचंद्र नेमाड्यांच्या कादंबरीवरच्या धाग्यात प्रतिक्रिया देता-देता हात आवरला आणि झोपी गेलो. झोपेतल्या-झोपेत ह्या खालच्या ओळी बडबडत होतो म्हणे; कुणीतरी त्या लिहून घेतल्यात, मी त्या इथं टाकतो. आता जिथे प्रतिक्रिया द्यायची होती तो धागाच सापडत नाहीय (सवय होईपर्यंत असंच होणार).
काव्यरस