Skip to main content

इतिहास

कामणदुर्ग

लेखक बज्जु यांनी सोमवार, 29/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कामणदुर्ग ठाणे जिल्ह्यातील उंचीत माहुलीनंतर दुसर्‍या क्रमांकावर असलेला हा किल्ला (उंची साधारण २२०० फुट). तीन साडेतीन तासांचा खडा चढ, जंगल, कड्यात खोदलेल्या पायर्‍या, सोप्या श्रेणीचे कातळटप्पे या ट्रेकर्सना आकर्षीत करणार्‍या सर्व गोष्टी असुनही, केवळ माथ्यावर पाणी आणि निवारा नसल्यामुळे दुर्लक्षीत राहिला आहे. प्राचीनकाळी उल्हासनदीतुन चालणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच कल्याण-भिवंडी मार्गावर ताबा ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली असावी. तर अश्या या दुर्लक्षीत किल्ल्याला भेट देण्यासाठी आम्ही चौघे जण या रविवारी (दि.२८ मार्च, २०१०) सकाळी ६.३० ला बाईकवरुन निघालो.

आमचे काही पूर्व-जन्म....

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे काही पूर्वजन्मः आणखी काही पूर्वजन्म पुन्हा कधीतरी...... १६२४ साली इंग्लंड मधील एक लढवय्या..... एक संस्थानिक..... अर्धांगिनीसहः

चित्रगुप्ताची कैफ़ियत : दस्तुरखुद्दांचि अजब, अनोखी, दिलकश दास्तान

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 25/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे. -शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक. चित्रगुप्ताची कैफ़ियत दस्तुरखुद्दांचि अजब, अनोखी, दिलकश दास्तान : भाग १. नमस्कार मंडळी, मी चित्रगुप्त......

किल्ले दुर्ग आणि धाकोबा

लेखक बज्जु यांनी गुरुवार, 25/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
किल्ले दुर्ग आणि ढाकोबा (मुरबाड परिसर) शनिवारी पहाटे ५.०० च्या सुमारास ठाण्याहुन बाईकवरुन निघालो. दोघेच. मुरबाड एस्.टी. स्टॅन्डवर आलो तेव्हा ७.३० वाजत आले होते. वाफाळलेला चहा घेतला आणि रामपुर या दुर्गच्या पायथ्याशी असलेल्या गावात जाण्याचा रस्ता विचारुन घेतला. स्टॅन्डच्या बाजुनेच जो रस्ता धसईला जातो त्याच रस्त्यावर पुढे रामपुर लागते. रामपुरला येईपर्यंत ८.३० वाजत आले. रामपुर गावात एका घराच्या अंगणात बाईक लावली आणि जरा वाट दाखवायला कोणी मिळ्तय का त्याची चौकशी सुरु केली. रामभाऊ नावाचे एक मामा वाट दाखवायला तयार झाले. लगेच निघालो.

मेरा रंग दे बसंती चोला

लेखक बेभान यांनी मंगळवार, 23/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज २३ मार्च भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा ७९ स्मृतीदिन. भ्रष्ट राज्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचणा-या या महात्म्यांना विनम्र अभिवादन...इन्किलाब जिन्दाबाद.. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है.. ’लिजंड ऑफ भगतसिंग’ मधील हे ए. आर.

लुटा लुत्फ विसापुरचा अर्थात वाटा चुकत चुकत केलेल्या ट्रेकचा वग

लेखक झकासराव यांनी रविवार, 21/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मध्ये लोहगडला जाउन आलो. दुवा तेव्हाच विसापुर बघुन तिकडे जायच नक्की केल. पण ह्या ना त्या कारणाने ते पुढे ढकलतच गेल. मग एके दिवशी काही मित्रानी बाहेर जाउन खा खा खादाडी करण्याचा कार्यक्रम करुया का अस विचारल होत. त्यावर मी माझ्या वाढलेल्या ढेरीकडे बघत त्याआधी एक किल्ला बघुन येवु मगच खादाडी करु अशी एक "पोट"सुचना (:D) दिली. चारजण तयार झाले. आणि मग रविवारी सकाळी ७ चा मुहुर्त (मीच) ठर(व)ला. आणि मीच ७:३० ला निगडी चौकात गेलो. (पर्फेक्ट आयएसटी :D ) तिथुन निघालो.

रायरेश्वर आणि केंजळगड

लेखक बज्जु यांनी सोमवार, 15/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ठाण्याहून रात्री १२.०० ची महाड्-पिंपळ्वाडी एस्.टी. पकड्ली. पहाटे ५.०० ला महाड्ला आलो. महाड आणि पूणे यांना जोडणार्‍या वरंधा घाटातून पुढे जाणार्‍या एस्.टी. ने हिरडोशीला आलो. साधारण ८.३० वाजले होते. ईथूनच आमच्या ट्रेकला सुरूवात होणार होती.

बाळाजी विश्वनाथ भट यांची मुत्सद्देगीरी

लेखक नितिनकरमरकर यांनी रविवार, 14/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
बाळाजी विश्वनाथ भट "पेशवे" होण्या पूर्वीची ही कथा आहे. नक्की काळ माहीत नाही परंतू संभाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर ही घटना घडली असावी. कदाचीत राजाराम महाराजांच्याही म्रुत्युनंतर असावी. औरंगजेबाचे प्रचंड सैन्य महाराष्टात धुमाकूळ घालत होते. जवळ्जवळ सर्व किल्ल्यांना वेढे होते किंवा ते मुगलांच्या ताब्यात तरी होते. बरयाच वेळा मराठे स्वता: किल्ला मुगलांच्या ताब्यात देत असत आणि थोड्या दिवसांनी परत जिंकून घेत असत! असाच सिंहगडाला वेढा पडला होता. मुगलांचा किल्ला घेण्याचा उत्साह फारच होता! एक एक वेढा वर्ष वर्ष चालत असे. किल्ल्याला तशी फारशी तोशिश लागत नव्हती.

प्रति तानाजी, प्रति बाजिप्रभू

लेखक नितिनकरमरकर यांनी रविवार, 14/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सरसेनापती नेताजी पालकर यांना प्रति शिवाजी म्हणत असत हे सर्वांना माहीत आहे परंतू प्रति तानाजी आणि प्रति बाजिप्रभू फारसे कोणाला माहीत नाहीत म्हणून हा खटाटोप! तानाजी मालूसरे यांनी रात्रीच्या अंधारात कडा चढून जाऊन किल्ले सिंहगड सर केला होता त्याचप्रमाणे कानोजी (का कान्होजी) यांनी किल्ले पन्हाळा सर केला होता. आनंदराव मकाजी आणि कानोजी हे दोघे पन्हाळा सर करावयाला गेले होते. सिद्दी जोहर ला पन्हाळा द्यावा लागला हे शल्य शिवरायांना सारखे सलत होते! त्यामूळे ही मोहीम हाती घेण्यात आली होती.

चंद्रगड आणि ऑर्थरसीट

लेखक बज्जु यांनी गुरुवार, 11/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रगड आणि ऑर्थरसीट चंद्रगड आणि ऑर्थरसीटचा ट्रेक म्हणजे महाबळेश्वर आणि जावळी खोर्‍यांमध्ला एक नितांत सुंदर ट्रेक. सदाहरित जंगलाचा हा प्रदेश. तर अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, आणि निर्सगरम्य परिसरातून ट्रेक करणं म्हणजे एक अविस्मरणिय अनुभवच. थोडक्यात इतिहासः- जावळी खोर्‍यावर वर्चस्व असलेले सूर्यराव/चंद्रराव मोरे सहजासह्जी स्वराज्यात सामील होत नाहीत हे पाहून महाराजांनी त्यांच्याकडे असलेला रायरीचा किल्ला म्हणजे रायगड स्वारी करुन स्वराज्यात सामील करुन घेतला. जिवाच्या भितीने मोरे जावळीखोर्‍यात असलेल्या चंद्र्गडावर लपून राहिला.