Skip to main content

इतिहास

पुस्तक परिचय : "आत्मा ते जनुक"

लेखक मुक्तसुनीत यांनी मंगळवार, 22/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेच्या एकंदर स्थितीचा विचार करताना ज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांमधला गहन आशय सोप्या भाषेत परंतु विषयाची यथायोग्य ओळख करून देणार्‍या पुस्तकांच्या अभावाचा उल्लेख येतो. इंग्रजीच्या तुलनेमधे या गोष्टीमधे नक्की तथ्य आहे; परंतु त्याचवेळी जे काम चालले आहे त्याचा वेधसुद्धा घेणे महत्त्वाचेच. मराठीमधे अर्थातच अशा प्रकारचे लिखाण होत असते. थोडा शोध घेतला तर आपल्याला जाणवते की अशा प्रकारच्या लिखाणाला आता मराठीमधे बाजारपेठही चांगली आहे. विविध प्रदर्शनांमधे, पुस्तकांच्या दुकानांमधे अशा पुस्तकांना ग्राहकवर्ग मिळताना दिसतो. आज या प्रकारच्याच एका पुस्तकाची ओळख करून द्यावी म्हणतो.

लुई़ज बूर्ज्वा - खोडसाळ, 'डेंजर' स्त्री शिल्पकार

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 08/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
लुई़ज बूर्ज्वा - छायाचित्र - रॉबर्ट मॅपलथॉर्प या संस्थळावर पूर्वी काही कर्तबगार स्त्रियांची चरित्रे वाचली होती. नुकत्याच मरण पावलेल्या लुई़ज बूर्ज्वाची कहाणी त्या माळेत शोभावीशी आहे. शास्त्रज्ञांचे जग जसे पुरुषप्रधान आहे, तसेच दृश्यकला क्षेत्रही विसाव्या शतकाआधी स्त्रियांना फारशी भीक घालीत नव्हते. त्यात ती स्त्री बंडखोर असेल, तर तिला अधिकच त्रास होत असे. आजही भारतीयांना पाश्चिमात्य स्त्री कलाकार फारच क्वचित परिचयाचे असतात.

डंकर्क

लेखक पुष्करिणी यांनी रविवार, 06/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
डंकर्क हून लाखो ब्रिटीश - फ़्रेंच सैनिकांची जर्मनांच्या तावडीतून झालेल्या सहीसलामत सुटकेला काल ( ४ जून ) ७० वर्षं झाली, दुसया महायुदधाच्या घटनाक्रमातील एक अत्यंत महत्वाची घटना. १९३९ पासून फ़्रेंच आणि ब्रिट्ननं जर्मनीविरूद्ध युद्ध पुकारलं. ब्रिटीश सैन्य फ़्रेंच हद्दीत तळ ठोकून बसलय आणि तिकडे जर्मन सैन्य युद्धाची कसून तयारी करतय अशी अवस्था.. १० मे ला चर्चिल पंतप्रधान झाले आणि जवळजवळ त्याच मुहूर्तावर हॉलंड,लक़्झंबर्ग आणि बेल्जियम वर जर्मनीचा हल्लाबोल झाला.

शिवाजी महाराज-एक धीरोदात्त राजा.

लेखक चिन्या१९८५ यांनी गुरुवार, 03/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
शिवजयंतीनिमित्त्य शिवरायांवर मी लिहिलेले एक भाषण येथे लिहित आहे.अर्थातच श्रोते मंडळी इतिहासाची अभ्यासक नसल्याने फार खोलात जाउन लिहिलेले नाही.
  • गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
  • शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
  • धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
  • अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार
छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महा

सॉक्रेटीसचा मृत्यू : ३९९ बी.सी.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 30/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सॉक्रेटीसचा मृत्यू : ३९९ बी.सी. मग रक्तरंजित क्रांती झाली. मरणाला न घाबरता, आपापल्या विचारांशी ठाम रहात लोकांनी मृत्यूलाही कवटाळायला कमी केले नाही. या युध्दामधे लोकशाहीवाद्यांचा विजय झाला, तेव्हाच सॉक्रेटीसचे भवितव्य ठरले गेले. कारण स्पष्ट होते. तो एक बुध्दीवादी आणि तरुणांना बिघडवणारा तत्वज्ञानी होता ना ! तरूणांना वादविवादांची धुंदी त्याच्या शिकवणीमुळेच तर चढली होती. तरूणांची बुध्दी व मती भ्रष्ट करणार्‍या माणसाला जगण्याचा आधिकार द्यायचा प्रश्नच उद्‌भवत नव्हता.

दिले नादान तुझे हुआ क्या है.......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 29/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दिले नादान तुझे हुआ क्या है.... ही ग़ालीबची गज़ल माहीत नसणारा माणूस भारतात मिळणे कठीण. याचा अर्थ खरच समजवून घ्यायचा असेल तर आपल्याला सुफी संप्रदायाबद्दल थोडीशी माहीती करुन घ्यायला लागेल. आपण ही माहीती या सारख्या गज़लेच्या आणि गालीब सारख्या कवींच्या बाबतीतच फक्त करुन घेऊ. सुफी संप्रदायावर मी लवकरच www.jayantpune.wordpress.com वर लिहीणार आहे त्यात आपल्याला अधिक माहीती मिळेळ. सुफी संप्रदायाच्या मते आपल्या अध्यात्माच्या प्रवासात आपल्याला सात टप्पे ओलांडावे लागतात. या प्रवासाला ते “मार्ग” म्हणतात आणि जो हे करायचा प्रयत्न करतो त्याला सालिक म्हणतात.

घरगुती सावरकर

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 28/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

सुढाळ ढाळाचें मोती.....

लेखक रामदास यांनी गुरुवार, 27/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
रत्ने, मणी, खडे - एक संकलन -हा लेख काल मीमराठीवर वाचला आणि चर्चा सुरु झाली ती वेगवेगळ्या रत्नांवर. खरे सांगायचे तर मूळ धागा होता रामायण कालीन रत्ने, मणी- खडे या विषयावर .प्रतिसाद लिहीताना असे वाटले की विषयांतर होते आहे म्हणून आज वेगळेसे टिपण लिहीले. या टिपणाच्या सुरुवातीला काल लिहीलेला प्रतिसाद टाकतो आहे .त्यांनतर आजचा धागा पुढे लिहीला आहे. बसरा मोतीनिदान भारतात तरी आता मिळत नाही.जुन्या दागीन्यातून काढून एखादा जव्हेरी विकत असेल तरच . बाकी बसरा मोती बगदाद मधून आपल्याकडे यायचे असे जाणकार सांगतात.मध्ये एकदा व्यापार्‍याने खरा बसरा मोती दाखवला होता.

पोवाडा मर्द मावळ्याचा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 27/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पोवाडा मर्द मावळ्याचा खण खण खणाण खण खण खण खण खण खणाण खणाणखण वाजे तलवार शिवाजीचा अवतरला अवतार शत्रूंना दिले उत्तर बाणेदार साथ दिली मावळ्यांनी भरपूर अशा राजा शिवाजीस करूनी नमन शाहिर सचिन बोरसे करतो पोवाडा मर्द मावळ्याचा जीर हा जी जी जी जी जी ... अनेक युद्धे शिवाजी राजांनी खेळीले अनेक किल्ले राजांनी जिंकीले अनेक शत्रू त्यांनी मारीले मराठी राज्य त्यांनी स्थापिले शिवाजीमहाराज छत्रपती जाहले याकारणे साथ दिली अनेकांनी तानाजी, येसाजी, बाजी, सुर्याजी अशा शुरांनी अहा ... { गद्य : यवनी सत्येच्या विरूद्ध लढाया करून शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात मराठी राज्य स्थापन केले.
काव्यरस

आजच backward रुपवेडं जग...

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 26/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
इ.पवार ह्यांचा "....तुझे देख के मेरी मधुबाला.....!!!!" हा धागा वाचला आणि मग प्रतिक्रिया दील्याशिवाय राहवल नाही...........ती प्रतिक्रीया जशीच्या तशी ईथे टाकतो(?) आहे. राग मानु नका व मनावरही घेउ नका(प्रतिक्रियेचा नी आपला संबधच नाही अस म्हणा हव तर).................पण जरा ह्या प्रतिक्रियेतुन थोड मनातल लिहतोय...... एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यामुळे त्याची/तीची प्रशंसा करणे ,त्याला/तिला ईतरांपेक्षा वेगळी वागणुक देणे म्हणजे शुद्र विचार होय........असे माझे मत. अहो शारीरीक सुंदरता कोणी स्वबळावर,मेहनतीवर कमवत का??मग एखाद्या व्यक्तीची त्यासाठी प्रशंसा का?? बुद्धीमता,चांगला स्वभाव्,बोलण्,चातुर्य,मानुस