Skip to main content

इतिहास

पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/05/2010 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे लेखक: प्रा: डॉ. प्रल्हाद नरहर देशपांडे, विद्यावर्धीनी महाविद्यालय, धुळे. प्रकाशक: सुषमा प्रकाशन, धुळे. मुद्रक: स्वस्तीक मुद्रणालय, पुणे. प्रकाशित: १९८३ मुल्य: रू. ६५/- छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे म्हणजे त्यांनी लिहीलेली पत्रे नव्हेत. त्या काळी शिवाजी महाराजांच्या वतीने त्यांच्या कारकुनांनी, अधिकार्‍यांनी लिहीलेली पत्रे जी त्यांच्या त्यांच्या कचेरीतून पाठवली जात ती. या पुस्तकात विविध २०० च्या वर पत्रे संपादित केलेली आहेत. लेखकाने विविध संदर्भ घेवून हि पत्रे शोधली आहेत.

शिवाजी महाराजांवर ई-बुक

लेखक अस्मी यांनी शुक्रवार, 21/05/2010 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
सारंग माडगुळकर यांनी शिवाजी महाराजांवर King Shivaji -the spiritual quest म्हणून एक ई-बुक मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत लिहिले आहे... शिवइतिहासामध्ये 'मिर्झाराजांची मोहीम' व 'आग्रा भेंट' ही दोन प्रकरणे चुकीची लिहिली गेली आहेत, असं त्यांच मत आहे. भाग १ मिर्झाराजे जयसिंह प्रकरणाचे सत्य स्वरूप ! ...

~*~*~*~ राजीव'जींना भावपूर्ण श्रद्धांजली ~*~*~*~

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 21/05/2010 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
राजीव गांधी!... आपल्या सर्वांचं एक आदरणीय आणि लाडकं व्यक्तिमत्व! भारताचे यशस्वी -माजी पंतप्रधान! २१ मे १९९१, रोजी रात्री, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तामिळनाडू येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्ब-हल्ल्यात झालेला राजीव'जींचा मृत्यू केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण विश्ववासीयांना मोठा मानसिक आघात देऊन गेला!..... राजीवजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! ..... *~*~*~* STILL WE MISS YOU.... RAJEEV'JI...... LOVE YOU.......

अलिपूर/माणिकतोळा अभियोग पर्व (मे १९०८-मे १९०९)

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 16/05/2010 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
जुलुमी परकिय सत्तेचे अत्याचार व अन्याय जेव्हा जनतेच्या सहनशक्तिची सीमा ओलांडतात तेव्हा असंतोषाचा भडका उडतो आणि क्रांतीच्या ज्वाला धगधगतात. १९०५ साली बांगालची फाळणी झाली. या फाळणीच्या विरोधात सारा बंगाल पेटला. आणि अर्थातच विरोध दडपून टाकण्यासाठी ईंग्रजांनी जनतेवर अमानुष अत्याचार सुरू केले. या अपमानाचा आणि अत्याचाराचा प्रतिशोध घेण्यासाठी बगालचे छावे ’ वंदे मातरम’ च घोष करीत जीवावर उदार झाले. स्वत:ला कर्दनकाळ समजणाऱ्या मदांध ईंग्रज अधिकाऱ्याना कंठस्नान घालुन सरकारला प्रत्त्युत्तर देण्यासाठी क्रांतीकारी संघटनांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या, खलबते शिजु लागली, शस्त्रे परजु लागली.

परीक्षा असत्या तर...... एक भयनिबंध!!!

लेखक प्रमोद काळे यांनी शुक्रवार, 14/05/2010 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
दि. १३/०४/२०३५, पुणे, आजचा होमवर्क : मराठी: निबंध लिहा : विषय : परीक्षा असत्या तर...... आज सरांनी हा भंगार विषय निबंध लिहायला म्हणून दिला. मुळात निबंध लिहायचाच का हेच आम्हाला कळत नाही. त्याही पेक्षा मुळात च्यायला लिहायचंच का ? वर्गात या,काय ते बोला आणि घंटा वाजल्यावर जा की..... आम्हाला काय हवं ते आम्ही घेऊ. बाकीचं सोडून देऊ. मुळात भाषा ही काय शिकायची गोष्ट आहे ? आता सायन्स, गणित, कॉम्प्यूटर वगैरे ठीक आहे. पण भाषा ! बोललेलं समजलं समोरच्याला की बास.... त्यात ते काय.... व्याकरण हवंय कोणाला ? पण सरकारला काय समजत नाय असं पप्पा म्हणतातच ना.... इंग्लिश, हिंदी, मराठी आणि शिवाय एक जागतिक भाषा.....

प्रतापगड जीर्णोद्धार कार्य

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 10/05/2010 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतापगड जीर्णोद्धार कार्य
प्रतापगड जीर्णोद्धार कार्य ">
महाराष्ट्र ही भूमी शिवछत्रपतींच्या अलौकिक कर्तृत्वाची. मराठमोळ्या, रांगड्या महाराष्ट्रातील सह्याद्री हा शिवकाळात मराठ्यांच्या पाठीशी असलेला जणू स्वराज्याचा कणा. सह्याद्रीतील आणि सागरातील किल्ले हे मराठंयाच्या पराक्रमाचे साक्षीदार. प्रतापगड हा ह्यातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला.

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 08/05/2010 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

मै ऐसा क्यूं हूं?

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 03/05/2010 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून घरात पुस्तकंच पुस्तकं असायची. त्यामुळे मला वाचनाची मुद्दाम सवय लावावी वगैरे लागली नाही कुणाला. मला अगदी लहानपणचं जे आठवतंय त्यापैकी एक असं... रात्रीची वेळ. सगळे जेवायला बसले आहेत. आणि मी काही तरी पुस्तक वाचतो आहे. आई जेवायला बोलवून बोलवून थकली आहे आणि शेवटी आता वाचन पुरे म्हणून एक धपाटा घालून जेवायला नेलं मला. :) बरं पुस्तकं खूप म्हणजे किती असावीत? अक्षरशः घरात माणसांच्या अगदी बरोबरीने पुस्तकांची दाटी असावी. घरात आजोबा, आजी, आई, बाबा, दोन काका, एक आत्या, ताई आणी सगळ्यात लहान मी. एवढी माणसं. प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं.