Skip to main content

इतिहास

राजमाची ट्रेनींग कॅम्प - समीट माउंटेनिअर्स (१६,१७,१८ एप्रील, २०१०)

लेखक बज्जु यांनी रविवार, 02/05/2010 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या पालकांशिवाय ३ दिवस दुर रहाण्याची बहुतेक मुलांची ही पहिलीच वेळ होती. मुलं गाडीत निट चढ्तील कि नाही?, नीट रहातील ना? जेवतील कि नाही? रात्रीची रड्णार तर नाहीत ना? अशा शेकडो शंका पालकांना. त्यामुळे १६ तारखेला सकाळी ६.३० ला ठाणे स्टेशनला मुलांना सोडायला आलेल्या पालकांच्या चेहर्‍यावरच जास्त काळजी दिसत होती. मुलं एकदम बिनधास्त. मोहिमेचे आयोजक सुजीत साठे यांनी पालकांना आणि मुलांना सर्व सुचना दिल्या आणि ४१ मुलं आणि १० इन्सट्र्क्टर असे आम्ही ५१ जणं इंटरसिटी एक्स. पकड्ण्यासाठी ५ नं. प्लॅट्फार्म कडे रवाना झालो. रिपोर्टींग साठी पहाटे ६.३० ला ठाणे स्टेशन १ नं.

अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 21/04/2010 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यपूर्व आशिया हा संपूर्ण जगासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचा, कुतूहलाचा नि विवादांचा ठरलेला भूप्रदेश. प्राचीन काळी जेव्हा पौर्वात्य नि पाश्चिमात्य जगाचे ऋणानुबंध मध्यपूर्वेतून खुष्कीच्या मार्गे होणार्‍या व्यापारातून जुळले, तेव्हापासून ते आज अगदी इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, इराकवर युद्ध (नि लोकशाही!) लादणे, दुबईमधील समुद्रकिनार्‍यांवर उन्हात चिंब होऊन पडणे, तिथल्या बुर्ज दुबईच्या गच्चीवरून सगळ्या पृथ्वीकडे डोळे भरून पाहणे अशा येनकेनप्रकारेण जुळलेलेच राहिले आहेत.

ज्वालामुखी आणि इतिहास

लेखक Nile यांनी शुक्रवार, 16/04/2010 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच झालेल्या आईसलँडमधील ज्वालामुखीने घातलेला गोंधळ आपण वाचलाच असेल. अश्याच काही ऐतिहासिक ज्वालामुखींची माहिती पाहुयात. सुपरव्होल्कॅनो: सुपर व्होल्कॅनो कमीत कमी ३०० क्युबिक किलोमीटर अ‍ॅश (मॅग्मा) वातावरणात पसरवते. १००० क्युबिक किलोमीटर अ‍ॅशमुळे एक किलोमीटर रुंदीच्या लघुग्रहाने(अ‍ॅस्टेरॉइड) च्या धडकेने जितके नुकसान होईल त्याच्याशी तुलना करता येते. साधारणपणे एक लाख वर्षांत असा एक सुपर वोल्कॅनो होतो. अश्या सुपर वोल्कॅनोंमुळे अनेक प्रजाती नष्ट होउन पृथ्वीचा इतिहासच बदलु शकतो.

बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री - अक्कामहादेवी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 10/04/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
अक्कामहादेवी! एक बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री! बाराव्या शतकातील एक अत्युच्च भक्तीच्या मार्गाचा प्रसार करणारी, आगळी वेगळी स्त्री! कन्नड संत साहित्यात तिने आपल्या भक्ती वचनांची जी अनमोल भर घातली आहे त्यासाठी ती कायम स्मरणात राहील. शिवाय ज्या अनोख्या पद्धतीचे आयुष्य ती त्या काळात जगली ते पाहता तिच्या धैर्याची, निश्चयाची, भक्तीची व अलौकिकतेची दादच द्यावी लागेल! तिला बसवण्णा,चेन्न बसवण्णा, किन्नरी बोम्मय्या, अल्लमा प्रभू, सिद्धराम ह्यांसारख्या इतर लिंगायत/ वीरशैव संतांनी ''अक्का'' म्हणजे मोठी बहीण ही उपाधी देऊ केली ते तिच्या सन्मानाचेच प्रतीक आहे.

सेवाजी द रेबल

लेखक सुमीत भातखंडे यांनी गुरुवार, 08/04/2010 05:58 या दिवशी प्रकाशित केले.
मधे कुठल्याशा ऑनलाईन पेपरमधे - "संशोधकांना शिवाजी महारांजांबद्दलचा संदर्भ "लंडन गॅझेट" या पत्राच्या १६७२ च्या आव्रुत्तीत सापडला" ही बातमी वाचली होती. तेव्हापासून ""लंडन गॅझेट" च्या साईटवर याची ऑनलाईन आव्रुत्ती मिळत्ये का ते बघायचं ठरवलं होतं पण कामाच्या व्यापात विसरून गेलो.

आम्रपाली

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 08/04/2010 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज एक लेख लिहिताना आम्रपालीच्या उल्लेखापाशी नजर थबकली. बौध्द काळातील एक सौंदर्यवती, अभिसारिका, गणिका, नगरवधू आणि तिची ही अनोखी कहाणी! आम्रपालीचा जन्म कोठे झाला, तिचे माता-पिता कोण हे कायम गूढच राहिले. वैशाली नगरीच्या राजप्रासादात ती एका आम्रतरूपाशी ठेवलेली सापडली म्हणून तिचे नाव आम्रपाली! इ.स.पूर्व ५०० चा तो काळ! त्या कालात ही अनाथ कन्या जसजशी मोठी होऊ लागली तसतशी तिच्या अप्रतिम सौंदर्याची, लालित्य, कौशल्य व मोहकतेची ख्याती चारही दिशांना पसरू लागली.

श्रद्धांजली

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 05/04/2010 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर , सप्रेम नमस्कार ! ३ एप्रिल रोजी महाराजांची पुण्यतिथी होती.परंतु ऑफिसच्या कामाने बाहेरगावी असल्याने लेख पाठवू शकलो नाही , तो आज पाठवत आहे. श्रद्धांजली..... आज ३ एप्रिल ! हृदयाच्या एका कप्प्यात कायम विराजमान असणार्‍या आमच्या महाराजांची आज पुण्यतिथी !

युध्दाचा कलाविष्कार

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 02/04/2010 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजच मला एक ईमेल आले. वाचताना टचकन डोळ्यांत पाणीच आले. असे काय होते त्या ईमेलमध्ये? कसली होती ती शोकवार्ता? ती वार्ता होती युध्दाने आक्रसलेल्या जीवनाची..... घायाळ झालेल्या लाखो जीवांची....

निश्चयाचा महामेरु - शिवपुण्यतिथीच्या निमित्ताने

लेखक Manish Mohile यांनी मंगळवार, 30/03/2010 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज हनुमान जयंती. शिवाजी महाराजांची पुण्यतिथी. संपूर्ण महाराष्ट्राचे आदरस्थानच नाही तर भक्तीस्थान असलेले आपले शिवाजी महाराज. आपल्या सगळ्यांनाच शिवाजी महाराजांचा इतिहास तोंडपाठ आहे. सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ, अफजलखानाचा वध, शाइस्तेखानाची बोटे कापण्याचा प्रसंग, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक हे त्यांच्या पन्नास वर्षांच्या आयुष्यातील प्रमुख नाट्यपूर्ण प्रसंग. पण महाराजांचे मोठेपण ह्या नाट्यमय प्रसंगांपेक्षाही दिसते ते ह्या गोष्टीमुळे की सतत साडेतीनशे वर्षे गुलामगिरीत राहून मनाने गुलाम बनलेल्या महाराष्ट्राला त्यांनी जाग्रुत केले. त्यांच्या मनात अस्मिता जागी केली.