Skip to main content

हे ठिकाण

निवेदन...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 18/04/2010 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मायबापहो, गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणाने मी मिपापासुन दूर आहे. माझ्याही आयुष्यात बर्‍याच त्रासदायक गोष्टी घडल्या/ घडत आहेत. येणारे काही दिवस मी या गोष्टींतच व्यस्त असेन असे वाटते. या आणी अश्याच अजून काही कारणांमुळे मला मिसळपावच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणे शक्य होणार नाही असे दिसते. दिवसेंदिवस येणारे नवनवीन लेखकांचे तसेच प्रस्थापितांचे लेखन मिपाला समृद्ध करत आहे हे पाहून अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्वजण मिपाला असेच समृद्ध करत राहाल अशी आशा करतो. यापुढे माझ्याऐवजी नीलकांत सर्व व्यवस्थापन पाहील असे मी येथे जाहीर करत आहे.

मिसळपाव आणि ओर्कुट.

लेखक इंटरनेटस्नेही यांनी रविवार, 04/04/2010 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना सांगण्यास आनंद होतो की मिपा चा सभासद झाल्या मुळे आता माझ्या ओर्कुट आणि तत्सम सोशल वेब साईटच्या वाऱ्या कमी झाल्या आहेत . पूर्वी जणू काही मला या साईटसचे व्यसनच होते. मात्र मिपा वरील शुचीताई, टारझन, आदी थोर लेखकांचे लेखन वाचणे हे जास्त आनंददायी वाटते. अशी सुंदर वेब साईट बनविल्याबद्दल तात्या अभ्यंकर यांचे मनः पूर्वक आभार. -- (उपकृत) इंटरनेटप्रेमी.

..

लेखक प्रियाली यांनी शुक्रवार, 02/04/2010 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
..

पाउस २- शिघ्र

लेखक नाद्खुळा यांनी बुधवार, 31/03/2010 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
पाउस एक चिंब अंगण पाउस म्हणजे भिजलेलं मन पावसा संगे बेभान वारा पाउस म्हणजे श्रावण धारा पाउस म्हणजे काळे ढग पावसात हरवलेल धुक्याचं जग पावसातली एक गोड मिठी पाउस म्हणजे भजी ओठी पाउस म्हणजे गोड आठवण पाउस म्हणजे मैत्रीची साठवण पावसात द्यावी भेट सप्रेम अहो पाउस ,तुमचा -आमचा अगदी सेम टू सेम --के गा

मनाचे खेळ!

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 26/03/2010 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
एक न असलेल्या अंधऱ्या खोलीतल्या दोन न असलेल्या खुर्च्या. मध्यभागी न टांगलेला दोनशे वॉटचा दिवा न हिंदोळणारा. तिथे उपस्थित न असलेल्यांच्या सावल्या तशाच मंद गतीने न हिंदोळवणारा. त्या खोलीच्या भिंती सहा इंच जाड दगडी (न असलेल्या - आता हे पुन्हा पुन्हा सांगत नाही). एका खुर्चीवरच्या व्यक्तीला खुर्चीला जखडून ठेवलेलं. तिला आपण अ म्हणू. अज्ञात, अनॉनिमस, अविचारी म्हणून... दुसऱ्या, समोरच्या खुर्चीवर तात्या. तात्या तो दिवा फिरवून त्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावर भणभणता झोत टाकतात. "शेवटचं विचारतो. बोल, कोण आहेस तू?" दुर्दैवाने त्यांना चेहेऱ्याच्या जागी एका गहन काळिम्यापलीकडे काहीच दिसत नाही.

संतू..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 15/03/2010 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
"आत्त्या.. मी काय कराय णाई..! भांडी आपोआप खाली पडल्यात.." हे असलं बोलणं म्हणजे नक्कीच संतू. कराय णाई, बगाय णाई, दिसाय णाई.. अशी क्रियापदांची धिरडी हा संतूच करू जाणे.. संतू!! खरं नाव चंद्रकांत ढवणे(ढवने). याची मोठी बहीण माझ्या मामाकडे कामाला होती. मामाकडेच लहानपणापासून राहिलेली तिथेच वाढलेली. आमचं बिर्‍हाड जेव्हा इचलकरंजीहून कोल्हापूरला हललं तेव्हा माझ्या आईच्या मागे लागून हीने याला आमच्यासोबत कोल्हापूरला पाठवून दिला. "तुमच्या घरी कामाल राहुदे.. तिथे काहीतरी शिकेल आणि र्‍हाईल.." असं म्हणून तिने त्याला आमच्यासोबत पाठवून दिलं.

गमन !!

लेखक टारझन यांनी रविवार, 14/03/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स ,,, येस .. "गमन" म्हणजे मिपावर डावीकडे मार्गदर्शक रकाण्यातला लॉग आउटचं बटण नव्हे... गमण .. म्हणजे "गमनं" च ! आज मिसळपाव होमपेज वरचा फोटू आणि तात्यानं केलेलं वर्णन पाहिलं आणि एक किस्सा आठवला . बारावी नंतर काही सरकारी कागदपत्रांच्या कामासाठी मला गणेशपेठ मधे जावं लागे. अर्थात त्या काळी ऑटो फिटो चे खर्च परवडत नसायचे .. बस ने जाण्या ऐवजी एखाद वडापाव चापता येईल म्हणुन बसने ही जाणे टाळायचोच ! कॉर्पोरेशन ला उतरलं की पदयात्रा. वाटेत पुण्याचा "फोरास रोड" लागत असे. त्या वयात ह्या गोष्टींच भलतंच आकर्षण असे. पण तिकडे जाणे कधी स्वप्नातही आणले नव्हतं. एक कुतुहलवजा आकर्षण मात्र असायचं ..

कोल्हापुर

लेखक नाद्खुळा यांनी शुक्रवार, 12/03/2010 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्या कामातून मित्रानो ,थोडा वेळ काढूया एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया रंकाळ्यावरचा मस्त वेळ एकदम झक्कास टी टाइम भेळ पुन्हा एकदा खाऊया एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया युनिवर्सिटीताली सुखद संध्याकाळ पन्हाळ्यातली प्रसन्न सकाळ पुन्हा एकदा पाहूया एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया मिसळेचा जेवढा झटका माणुसकीची तेवढीच गोडी पुन्हा एकदा चाखूया एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया कट्ट्यावरची मस्ती खासबाग ची कुस्ती पुन्हा एकदा खेळूया एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया -के गा