या प्रकरणात दृष्टांत आणि सिद्धींविषयक भगवान रमण महर्षींचा अभिप्राय आपण जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
ध्यानधारणेमुळे होणारे अवांछित परिणाम काही वेळा साधकांना विस्मयचकित करतात. ध्यानावस्थेत असताना अकस्मात देव देवतांचे दर्शन झाल्याची, अद्भुत सुगंध दरवळल्याची तसेच क्वचित प्रसंगी अतिंद्रिय सिद्धी (उदा. सुदूर असलेल्या गोष्टींचे दर्शन होणे, इतर व्यक्तींच्या मनातले विचार ओळखता येणे, हवी ती वस्तू प्राप्त होणे इ. ) प्राप्त झाल्याची नोंद कित्येक साधकांनी करून ठेवलेली आहे.
आयुष्याच्या वाटेवर एखादा अजाणता क्षण ज्यावेळी कठोरपणे थांबलेला असतो..
आणि काही प्रारब्धातील प्रश्नांची उत्तर शोधायला ही पर्याय नसतो..
त्यावेळी अचानक एखादा पर्याय उभा दिसतो..
त्यावेळी फक्त तूच आठवतोस..
अनादी ...अनंत..
जेव्हा, सगळं जग सोबत असतानाही आम्ही एकटे असतो..
आणि संसारिक दुःखात आम्ही पराजित होत असतो..
तेव्हा आमच्या रथाचा सारथी म्हणून तू समोर दिसतो..
त्यावेळी फक्त तूच आठवतोस..
अनादी ...अनंत..
मी पणा सोबत घेऊन जेव्हा आम्ही तुला शोधत असतो..
दानपेटीत दान टाकून , तुला जणू विकतच घेत असतो..
आणि तरीही तुझ्यावरचा विश्वास जेव्हा आमचा डळमळीत होत असतो..
त्यावेळी फक्त तूच आठवत
या प्रकरणापासून 'प्रचिती' या पाचव्या विभागाची सुरूवात होते. अध्यात्म हा वास्तविक पाहता प्रचितीचाच प्रांत आहे. या विभागातल्या पहिल्या प्रकरणात समाधीविषयीचा रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
ध्यानसाधनेच्या प्रगत टप्प्यावर आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे सजग भान येणे किंवा ध्यान साधत असताना अत्यंत उत्कटपणे ध्येय वस्तूत (उदा. नाम, प्रतिमा, मूर्ती इ.) अखंडपणे लीन होणे ही अवस्था साधकांना अनुभवता येते. पौर्वात्य जगतातल्या अध्यात्मिक साहित्यात ही प्रचिती दर्शवण्यासाठी 'समाधी' हा शब्द प्रचुरतेने वापरला जातो .
खुलासा:~ भिक्षुकी/पुरोहितपणा/भटजीगिरी, हा या अभिवाचनाचा गाभा आहे... पण तरिही,यातले अनुभव मांडणारा जो कुणी भटजी आहे,तो मी (स्वतः) नसून,आमच्यातल्या अनेक सर्वसामान्य भटजींचं ते एकत्रित व्यक्तित्व आहे असे समजावे!
"हरी ओsssम" असे मोठ्या आवाजात म्हणत रवी बाबाने चिलीम धरलेली हातांची जुडी कपाळाला लावली आणि डावीकडे बसलेल्या राजाराम बुवाने पेटवून धरलेल्या माचीसच्या दोन काड्यांजवळ तिचे टोक आणून सर केली. गांजाचा एक दमदार झुरका मारून तोंडातून धुराचे लोट सोडत चिलीम शेजारी बसलेल्या रज्जुभैय्याच्या पुढ्यात धरली.
"चल चली को चाम ले...साई बाबा का नाम ले" असा घोष करून रज्जुभैय्याने जोरकस दम मारून चिलीम बाजूच्या सागर संजयक्षीर कडे पास केली.
सर्वज्ञानी सागरने आधी तोंडावरचा N95 मास्क काढला. मग खिशातून 80% अल्कोहोल असलेल्या सॅनीटायझरची बाटली काढून दोन्ही हातांचे निर्जंतुकीकरण केले.
खुला-सा:- हे व्हिडिओ अभिवाचन फेसबुक वर सुरू केलेले आहे.ते इथे देत आहे. फेसबुक वर केलेले असल्यामुळे त्या हिशोबानी मनातून आलेली ही प्रस्तावना आहे.
आपण मिपाकरांनी माझ्या गुरुजींचे भावविश्वला अलोट प्रतिसाद दिलात. आता या वरील प्रस्तावनेसह केलेल्या पहिल्या भागाच्या अभिवाचनासाठी
आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे.
या प्रकरणात भगवान रमण महर्षींचे योगिक प्रक्रियेविषयीचे मार्गदर्शन आपण जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
ढोबळमानाने पाहता आत्मा किंवा ईश्वरी सत्तेपासून आपण विभक्त झाल्याचे (वियोग) जाणवत असल्यामुळे देह आणि मनाला वळण लावण्यासाठी नानाविध पद्धतींचा अवलंब करून आत्मतत्वाशी किंवा ईश्वरी सत्तेशी पुन्हा एकदा संलग्न होणे किंवा 'योग' साधणे हे योगमार्गी साधकांचे ध्येय असते. अंदाजे २००० वर्षांपूर्वी महर्षी पतंजलींनी रचलेल्या योगसूत्रांवर आधारित योगपद्धती 'राजयोग' या नावाने प्रसिद्ध आहे.
या प्रकरणात अध्यात्मिक साधकांच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनाविषयीचे भगवान रमण महर्षींचे मार्गदर्शन आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
हिंदू परंपरेत अध्यात्मिक साधकांसाठी आश्रम व्यवस्थेची महती सांगितली गेलेली आहे.
या प्रकरणात मंत्र, जप तसेच नामस्मरणाविषयीचे भगवान श्री रमण महर्षींचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:
दीक्षा देत असताना सद्गुरूंनी शिष्याला प्रदान केलेल्या एखादा शब्दाला किंवा श्लोकालाच मंत्राचे स्वरूप प्राप्त होते. सद्गुरूंना घडलेल्या साक्षात्कारातून किंवा त्यांनी केलेल्या ध्यानधारणेतून त्यांच्याजवळ अध्यात्मिक शक्तीचा जो संचय झालेला असतो, त्यापैकी काही भाग मंत्रस्वरूपात शिष्याकडे संक्रमित केला जातो.