घरपरती आणि त्यातील अडथळे
भारतात पहिला ख्रिश्चन धर्मोपदेशक इ.स.५२ साली केरळात आला. पहिले मुस्लिम आक्रमण इ.स.७११ मधे झाले. तेव्हापासून या धर्मियांकडून भारतात जबरदस्तीने किंवा पैशाचं आमिष दाखवून किंवा भ्रामक गोष्टी सांगून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे यथाशक्ती प्रयत्न सुरु आहेत. ऐतिहासिक काळात मुस्लिम शासकांनी प्रामुख्याने तलवारीच्या जोरावर दहशत पसरवून तर ख्रिश्चनांनी तलवार,बंदूक आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमधे गायीची चरबी लावलेले पाव टाकून कितीतरी हिंदूंचे धर्मांतर केले. याव्यतिरिक्त हिंदू धर्मातील जातीच्या पिरॅमिडमधे सर्वात तळाशी असणार्यांना तुम्हाला हिंदू धर्मात सन्मानाची वागणूक मिळत नाही; आमचा धर्म दयाळू आहे.
मिसळपाव